राष्ट्रीय
राष्ट्रसेवा आणि राष्ट्रीय सुरक्षेतील अतुलनीय योगदानाचा सन्मान!
राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित पुणे, दि. 1 ऑगस्ट : केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शाह यांच्या हस्ते आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांना आज ‘लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार 2026’ प्रदान करण्यात आला. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार,
महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्न सोडविण्यासाठी सर्वतोपरी लढा सुरूच राहणार : मुख्यमंत्री फडणवीस
मुंबई, दि. 8 जुलै : महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नी महाराष्ट्र सरकार सीमाभागातील मराठी बांधवांच्या पाठीशी ठामपणे उभे असून, त्यांच्या न्याय्य हक्कांसाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरूच राहतील. सीमाभागातील मराठी बांधवांच्या न्याय्य हक्कांचे संरक्षण करण्यासाठी सरकार सर्वतोपरी प्रयत्न करेल अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिली. फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज विधान भवन, मुंबई येथे महाराष्ट्र-कर्नाटक सीमा प्रश्नाबाबत उच्चाधिकार समितीची
जागृत हिंदू समाजामुळे देशात सकारात्मक परिणाम : सरसंघचालक डॉ. मोहन भागवत
‘कार्यकर्ता विकास वर्ग-द्वितीय’चा नागपुरात समारोप विख्यात उद्योगपती पद्मभूषण कुमार मंगलम बिर्ला यांची प्रमुख उपस्थिती नागपूर, दिनांक 4 जून : भारताचे भवितव्य ज्याच्या खांद्यावर आहे तो हिंदू समाज आता मोठ्या प्रमाणात जागृत होत असून, त्याचे सकारात्मक आणि चांगले परिणाम देशात समोर येत असल्याचे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी केले. नागपूर येथील रेशीमबागस्थित
संघाच्या ‘कार्यकर्ता विकास वर्ग 2’चा आज समारोप, कुमार मंगलम् बिर्ला प्रमुख अतिथी
नागपूर, दि. 4 जून : 11 मे 2026 रोजी सुरू झालेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या ‘कार्यकर्ता विकास वर्ग – 2’ चा समारोप समारंभ आज सायंकाळी 6:30 वाजता संपन्न होत आहे. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे सुप्रसिद्ध उद्योगपती आणि पद्मभूषण कुमार मंगलम् बिर्ला असतील. तसेच या प्रसंगी सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांचे मार्गदर्शनपर भाषण होईल. या कार्यक्रमाचे
भगवान बिरसा मुंडा यांच्या 150 व्या जयंतीनिमित्त दिल्लीत ‘जनजाती सांस्कृतिक समागम’
24 मे रोजी देशभरातून दीड लाख तर महाराष्ट्रातून १० हजार बांधव एकत्र येणार पुणे, दि. 22 मे : जनजाती सुरक्षा मंचच्या वतीने येत्या रविवारी दि. २४ मे रोजी नवी दिल्ली येथील ऐतिहासिक लाल किल्ला मैदानावर ‘जनजाती सांस्कृतिक समागम २०२६’ या भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. जनजाती अस्मितेचे प्रतीक भगवान बिरसा मुंडा यांच्या १५० व्या
व्यक्तीनिर्माणातून राष्ट्रनिर्माण हाच संघाच्या कामाचा गाभा : सुमंत आमशेकर
अहिल्यानगरमध्ये ‘संघ शताब्दी संवाद’ अहिल्यानगर, 25 एप्रिल : व्यक्तीनिर्माणातून राष्ट्रनिर्माण हाच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कामाचा मूळ गाभा आहे. डॉ. हेडगेवारांनी मांडलेली हिंदुराष्ट्र संकल्पना आणि संघ विचारांशी बांधिलकी ठेवून काम करणाऱ्या ३७ हून अधिक संघटना आज राष्ट्रउभारणीत मोठे योगदान देत आहेत,” असे प्रतिपादन रा. स्व. संघाचे क्षेत्र प्रचारक सुमंत आमशेकर यांनी केले. अहिल्यानगर येथील पटेल मंगल
छ. शिवरायांचे किल्ले म्हणजे संस्कृतीचे चैतन्यमय तीर्थाटन : डॉ. सुधांशु त्रिवेदी
पुणे, दि. 2 एप्रिल : भारतीय संस्कृतीत पाश्चिमात्य संकल्पनेतील ‘पर्यटना’पेक्षा ‘तीर्थाटना’ला अधिक महत्त्व आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी उभारलेले किल्ले हे केवळ दगडधोंड्यांच्या वास्तू नसून ते आपल्या संस्कृतीचे चैतन्यमय तीर्थाटन आहेत,” असे प्रतिपादन खासदार डॉ. सुधांशू त्रिवेदी यांनी केले. श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळाच्या वतीने चैत्र पौर्णिमा, हनुमान जयंती, शके १९४८, दि. १ आणि २ एप्रिल
संघ शताब्दीत पश्चिम महाराष्ट्रात दहा लाखांहून अधिक कुटुंबाशी संवाद
समाजातर्फे आयोजित तीन हजार ‘सकल हिंदू संमेलनांत’ संघाचाही सहभाग पुणे, १६ – ‘राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा विस्तार म्हणजे संघ आणि समाज यांनी एकरूप होऊन राष्ट्रकार्यासाठी सज्ज होणे` याच उद्दिष्टाने संघ शताब्दीनिमित्ताने देश व राज्यभरात विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. पश्चिम महाराष्ट्रात ७ शासकीय जिल्ह्यांमधून समाजातील विविध संस्था- संघटनांतर्फे तीन हजारांहून अधिक ‘सकल हिंदू संमेलनांचे आयोजन करण्यात
कुराणातील निवडक आयातींवरून इस्लामला सहिष्णू ठरवणे चूक : प्रा. शेषराव मोरे
प्रख्यात लेखक व ज्येष्ठ अभ्यासक प्रा. शेषराव मोरे यांच्या पुण्यातील व्याख्यानास प्रचंड प्रतिसाद पुणे, दि. 11 मार्च : “सहिष्णू हिंदू समाजामध्ये इस्लामबद्दल कमालीचे अज्ञान आहे. कुराणातील आयतांचा अर्धवट संदर्भ देऊन केवळ सहिष्णूता दाखवण्याचा प्रयत्न केला जातो; मात्र प्रत्यक्षात इस्लाममध्ये केवळ अल्लावरचीच श्रद्धा मान्य आहे, इतरांची नाही. त्यामुळे मूलभूत इस्लामचे सहिष्णू समाजासमोर मोठे आव्हान उभे ठाकले
पेसा कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीत महाराष्ट्र राज्य देशात प्रथम क्रमांकावर
मुंबई, दि. 25 फेब्रुवारी : 77 व्या प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला, 25 जानेवारी, 2026, रोजी नवी दिल्ली येथे आयोजित पंचायत प्रतिनिधींच्या गौरव सोहळ्यात केंद्रीय पंचायती राज राज्यमंत्री प्रा. एस. पी. सिंह बघेल यांनी सन 2024-25 वर्षाकरिता पेसा संकेतक क्रमवारी प्रसिद्ध केली; या मध्ये पाचव्या अनुसूचीअंतर्गत येणाऱ्या व पेसा कायद्याची अंमलबजावणी लागू असणाऱ्या राज्यांमध्ये पेसा कायद्याच्या प्रभावी

