शेतकरी आत्महत्या प्रतिबंधासाठी राज्यस्तरीय टास्क फोर्सची स्थापना
महाराष्ट्र राज्य ठरले पहिले राज्य आंतरराष्ट्रीय कृषी समाजशास्त्रज्ञ डॉ. विनायक हेगाणा यांची विशेष सदस्य म्हणून नियुक्ती पुणे, दि. १८ फेब्रुवारी : राज्यातील शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी तसेच हवामान बदलामुळे निर्माण होणाऱ्या आपत्तींच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांच्या मानसिक, सामाजिक व आर्थिक समस्यांवर प्रभावी उपाययोजना राबवण्यासाठी महाराष्ट्र शासनाने कृषी विभागांतर्गत राज्यस्तरीय टास्क फोर्स स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. या टास्क
ज्ञान हे दडपून टाकण्याचे ‘शस्त्र’ नाही तर सर्वांना सुखी करणारे ‘शास्त्र’ : जे. नंदकुमार
आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके स्मृती व्याख्यान पुणे, दि. 17 फेब्रुवारी : “पाश्चात्य परंपरेत इतरांना दडपून टाकण्यासाठी शस्त्र म्हणून ज्ञानाचा विचार केला जातो. भारतीय परंपरेत मात्र प्रत्येक व्यक्तीला श्रेष्ठ, सुखी, संपन्न, निरामय बनवण्यासाठीचे शास्त्र म्हणून ज्ञानाकडे बघितले जाते. आपल्या परंपरेत ज्ञान लादले जात नाही तर व्यक्तीच्या ठायी असलेल्या ज्ञानाची जाणीव त्याचा करून दिली जाते,
जगद्गुरु अभंगगाथावन लोकचळवळ व्हावी : अतुल लिमये
देहू, दि. 17 फेब्रुवारी : वृक्षदाई प्रतिष्ठान निर्मित जगद्गुरु अभंगगाथावन महत्वपूर्ण उपक्रम असून गावोगावी असे अभंगवन, ज्ञानेश्वरीवन तयार झाले पाहिजेत, ही लोकचळवळ व्हावी असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसहकार्यवाह अतुल लिमये यांनी केले. श्रीक्षेत्र देहू येथील अभंगवनात वृक्षारोपण कार्यक्रमात ते बोलत होते. कार्यक्रमप्रसंगी श्रीक्षेत्र देहू नगरपंचायतच्या नगराध्यक्षा पूजा दिवटे, श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समिती पंढरपूरचे
भारत-फ्रान्स भागीदारी जागतिक स्थैर्य आणि प्रगतीसाठी महत्त्वपूर्ण : नरेंद्र मोदी
मुंबई, दि. 17 फेब्रुवारी : फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्या मुंबई भेटीदरम्यान प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि मॅक्रॉन यांच्यात लोकभवन येथे बैठक झाली. त्यानंतर माध्यमांशी संवाद साधताना दोन्ही नेत्यांनी या द्विपक्षीय सहकार्याला नव्या उंचीवर नेण्याचा निर्धार व्यक्त केला. यावेळी भारतामध्ये एअरबस एच 125 हेलिकॉप्टरसाठी टाटा अॅडव्हान्स्ड सिस्टिम्सच्या असेंब्ली लाईनचे दूरदृश्यप्रणालीद्वारे उद्घाटन करण्यात आले. यावेळी परराष्ट्र व्यवहार
छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त 19 फेब्रुवारी रोजी पुण्यात ‘भव्य पदयात्रा’
पुणे, दि. 17 फेब्रुवारी : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त 19 फेब्रुवारी 2026 रोजी पुणे येथे ‘भव्य पदयात्रा’ आयोजित करण्यात येणार आहे. युवा कार्यक्रम व खेळ मंत्रालय, भारत सरकार तसेच ‘माय भारत (मेरा युवा भारत)’ यांच्या निर्देशानुसार महाराष्ट्र राज्यात हा उपक्रम राबविण्यात येत आहे. राष्ट्र व राज्याच्या शाश्वत विकासात युवकांचे मोलाचे योगदान आहे. युवकांमध्ये नेतृत्वगुण,
‘इंडिया एआय इम्पॅक्ट समिट-2026’मध्ये महिला समृध्दीचा निर्धार
महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणाला एआयची जोड मिळाल्यास त्यांचा शाश्वत विकास शक्य, विजया रहाटकर यांचा आशावाद नवी दिल्ली, दि. १६ फेब्रुवारी : आजच्या वेगाने बदलणाऱ्या तंत्रज्ञानाच्या युगात आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआय) हे केवळ एक तांत्रिक साधन नसून शिक्षण, प्रशासन आणि उद्योग क्षेत्राचा केंद्रबिंदू ठरत आहे. आगामी काळात एआयमुळे रोजगाराच्या संधी आणि स्वरूप मोठ्या प्रमाणात बदलणार असून महिलांनी या
शिवसेनेमध्ये इनकमिंग सुरूच, विविध पक्षांच्या नेते-कार्यकर्त्यांचा शिंदेंच्या उपस्थितीत पक्षप्रवेश
मुंबई, दि. १६ फेब्रुवारी : राज्यभरात सध्या कोणतेही निवडणुकीचे वातावरण नसतानाही एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेत राज्यभरातून इनकमिंग अद्याप सुरूच आहे. सामान्यपणे निवडणुकांच्या तोंडावर अशाप्रकारचे पक्षांतर पाहायला मिळते. मात्र कोणतीही निवडणूक नसतानाही हे इनकमिंग सुरूच असल्यामुळे आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. गेल्या काही दिवसांमध्ये मराठवाड्यातील विविध जिल्ह्यांतील विविध पक्षांच्ये नेते-कार्यकर्त्यांनी मुख्य नेते एकनाथ शिंदे यांच्या
मुंबई क्लायमेट वीक 2026 : हरित भविष्यासाठी जागतिक संकल्प!
मुंबई, दि. १७ फेब्रुवारी : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आणि केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांच्या प्रमुख उपस्थितीत आज मुंबई येथे ‘मुंबई क्लायमेट वीक’चे उदघाटन संपन्न झाले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले की, ‘मुंबई क्लायमेट वीक’ भारतातील पर्यावरणीय कृतीसाठी समर्पित असे पहिले व्यापक व्यासपीठ आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारताने आर्थिक विकास आणि पर्यावरणीय
भारताची वाढ ही योगायोग नसून संरचनात्मक परिवर्तनाचे फलित : देवेंद्र फडणवीस
बहुध्रुवीय जगात विश्वासाचा केंद्रबिंदू : भारत आणि महाराष्ट्र! मुंबई, दि. १७ फेब्रुवारी : जागतिक आर्थिक व्यवस्थेची नव्याने पुनर्रचना सुरू असताना भारताची वाढ ही योगायोग नसून संरचनात्मक परिवर्तनाचे फलित आहे असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री डॉ. एस. जयशंकर यांनी आज मुंबई येथे ‘ग्लोबल इकॉनॉमिक को-ऑपरेशन 2026’ च्या उदघाटन
संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी मार्गातील विसावा क्र. २ चे लोकार्पण
पालखी विसावा क्र. २, कळसगाव, दि. १६ फेब्रुवारी : वारकरी संप्रदायाचा पाया रचणारे थोर संत, संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांच्या पारंपारिक पालखी सोहळ्यातील विसावा क्रमांक २ च्या ठिकाणाचे लोकार्पण केंद्रीय राज्यमंत्री व पुण्याचे खासदार मुरलीधर मोहोळ व औसा संस्थेचे ह.भ.प. गुरुबाबा महाराज औसेकर यांच्या हस्ते करण्यात आले. आळंदी रोड येथील कळसगाव येथे हा विसावा क्रमांक २

