पुणे महानगरात 58 स्थानांवर होणार संघाचे पथसंचलन; हजारो स्वयंसवेकांचा सहभाग
पुणे, दिनांक 8 : राष्ट्रीय स्वयंसेवक संघ पुणे महानगराच्या वतीने विजयादशमीला शनिवारी (ता.12) 58 स्थानांवर पथसंचलन आयोजित करण्यात आले आहे. संघदृष्ट्या महानगरातील नऊ भागांमध्ये पूर्ण गणवेशात स्वयंसेवकांचे हे शिस्तबद्ध संचलन पार पडेल. विजयादशमीच्याच दिवशी नागपूरातील मोहिते वाड्यात 1925 मध्ये संघाची स्थापना झाली होती. त्यामुळे दरवर्षी विजयादशमीला संघाचे स्वयंसेवक देशभरात पथसंचलनांचे आयोजन करतात. यंदा संघ शताब्दी
‘महाराष्ट्राची उद्योग भरारी’ कार्यक्रमास उद्योजकांचा मोठा प्रतिसाद
उद्योगस्नेही धोरणामुळे परकीय गुंतवणूकीत महाराष्ट्र प्रथम क्रमांकावर : उद्योगमंत्री उदय सामंत पुणे, दि. २९ : राज्य सरकारने उद्योग क्षेत्राच्या विकासासाठी घेतेलेले निर्णय, राबविण्यात आलेल्या योजना, उद्योजकांना उपलब्ध करुन दिलेल्या उच्च दर्जाच्या सुविधा, औद्योगिक वसाहतीत केलेली पायाभूत सुविधांची कामे यामुळे उद्योग क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर परकीय गुंतवणूक आली असून उद्योगस्नेही धोरणामुळे महाराष्ट्र राज्य परकीय गुंतवणूकीत प्रथम क्रमांकावर
“चाईल्ड पोर्नोग्राफी” पाहणे पोक्सो अंतर्गत गुन्हा – सर्वोच्च न्यायालय
ठाणे, 28 सप्टेंबर : सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी एक महत्त्वपूर्ण निर्णय देत स्पष्ट केले आहे की, “चाईल्ड पोर्नोग्राफी” डाऊनलोड करणे, पाहणे किंवा बाळगणे, पोक्सो कायदा आणि माहिती तंत्रज्ञान कायद्यानुसार गुन्हा ठरतो. बालकांचे लैंगिक शोषण ही एक गंभीर विकृती आहे, जी भारतासह संपूर्ण जगासाठी चिंताजनक बाब आहे, असे सर्वोच्च न्यायालयाने या निकालामध्ये स्पष्ट केले आहे. मद्रास उच्च
कृषी पुरस्कारांचे उद्या राज्यपालांच्या हस्ते वितरण – कृषीमंत्री धनंजय मुंडे
मुंबई, दि. २८ : कृषी विभागामार्फत कृषी, फलोत्पादन आणि संलग्न क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शेतकरी, व्यक्ती, संस्था तसेच अधिकारी व कर्मचारी यांचा कृषी पुरस्कार प्रदान करून गौरव करण्यात येणार आहे. रविवार (२९) रोजी सायं. ५ वा. मुंबई येथील नॅशनल स्पोर्ट्स क्लब ऑफ इंडिया (डोम) वरळी येथे आयोजित केल्याची माहिती कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी दिली
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते करमाळा विधानसभा मतदासंघातील विविध विकास कामांचा शुभारंभ
सोलापूर, दिनांक २४ : राज्य शासनाने करमाळा विधानसभा मतदारसंघातील विविध विकास कामांसाठी भरघोस निधी मंजूर केलेला आहे. यामध्ये सोलापूर जिल्हा एकात्मिक पर्यटन विकास आराखडा अंतर्गत 282.75 कोटी निधी असलेली विविध कामे, 34 कोटी 68 लाख निधी मंजूर असलेल्या करमाळा शहरातील नवीन प्रशासकीय इमारत तर करमाळा तालुक्यात हॅम अंतर्गत 271 कोटीच्या रस्ते कामांचा समावेश आहे.
संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान पुरस्कार वितरण सोहळा
गाव आणि मन कायम स्वच्छ ठेवा – पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील छत्रपती संभाजीनगर, दि. २३ : स्वच्छता व त्यामाध्यमातून लोकांचे आरोग्य चांगले राखण्यासाठी संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान सुरु करण्यात आले. स्पर्धेमुळे गावा गावांत स्वच्छतेसाठी चढाओढ लागली, ही एक चांगली बाब आहे. मात्र केवळ स्पर्धेपुरते गाव स्वच्छ ठेवू नका. गाव आणि मन स्वच्छ
आबासाहेब मुजुमदारांचे कार्य दीपस्तंभासारखे – प्रदीप रावत
पुणे : थोर इतिहास संशोधक व कला, साहित्य संगीत क्षेत्रात मोलाचे कार्य करणारे सरदार कै. गंगाधर नारायण उर्फ आबासाहेब मुजुमदार स्मृती पुरस्कार वितरण सोहळा भारत इतिहास संशोधक मंडळात २० सप्टेंबर २०२४ रोजी पार पडला. ज्येष्ठ विचारवंत व माजी खासदार प्रदीपदादा रावत यांच्या हस्ते इतिहास संशोधक महेश तेंडुलकर यांना आबासाहेब मुजुमदारांच्या नावाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
सेवा वस्तीतील ३१ जोडप्यांनी केली गणपतीची सपत्नीक आरती
पुणे, दि. १९ सप्टेंबर : गणेशोत्सवानिमित्त पुणे महानगरातील सर्व भागातील सेवा वस्तीतील ३१ नागरिकांनी सपत्नीक समरसता आरती केली. महानगर समरसता गतिविधीच्या माध्यमातून या आरतीचे आयोजन करण्यात आले होते. कसबा, मंडई, केसरीवाडा, दगडूशेठ हलवाई, गुरुजी तालीम या मंडळांमध्ये ‘आरती समरसतेची’ या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. तसेच कुमठेकर रोड वरील ऐतिहासिक वारसा असलेल्या विंचूरकर वाड्यातील गणपती
संविधान अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त सातारा शहरात सामाजिक संवाद मेळावा संपन्न
सातारा, दि. १५ सप्टेंबर : भारतीय संविधानाच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्ताने विवेक विचार मंच आणि सहयोगी संघटनांच्या वतीने समाजातील वंचित घटकांमध्ये कार्य करणाऱ्या सामाजिक नेतृत्व व संस्था संघटनांच्या प्रतिनिधींचा “‘सामाजिक संवाद मेळावा” सातारा मध्ये संपन्न झाला. या मेळाव्यातून अनुसूचित जाती आणि वंचित घटकांचे प्रश्न, सद्यस्थिती, भारतीय संविधान, आरक्षण, सामाजिक न्याय तसेच अन्याय अत्याचारच्या विविध घटना, घडामोडी, शासकीय
धर्म हीच आपल्या राष्ट्राची जीवनशक्ती – सरसंघचालक डॉ. मोहन भागवत
तंजावरचे मराठे पुस्तकाचे प्रकाशन पुणे, दि. ९ सप्टेंबर : महाराष्ट्रातील मराठे तमिळनाडूत परके ठरले नाही. कारण स्थानिक समाजजीवनाला त्यांनी समृद्ध केले. आपल्यातील हा एकतेचा धागा धर्मातून येतो. सत्यातून येणारा हाच हिंदू धर्म भारतीय राष्ट्राची प्रेरणा आहे,तीच आपली जीवनशक्ती आहे असे मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी व्यक्त केले. कोथरूड येथील बालशिक्षण मंदिरात

