नसरापुरात मानवतेला काळिमा फासणारी घटना; चार वर्षाच्या मुलीचा बलात्कार करून खून

1 मे, नसरापूर (जि. पुणे) : पुणे जिल्ह्यातील नसरापूर येथे ब्राह्मण समाजातील एका तीन वर्षांच्या चिमुरडीवर भीमराव/भिमाजी कांबळे नामक 60 वर्षीय नराधमने बलात्कार करून तिची दगडाने ठेचुन निर्घृण हत्या केली आहे. माणुसकीला काळिमा फासणाऱ्या या घटनेचा सर्व स्तरातून तीव्र शब्दांत निषेध होत आहे. बलात्कारी नराधमाला भर चौकात फाशी द्यायला हवी अशी मागणी पीडित मुलीच्या कुटुंबियांनी केली आहे. याच मागणीकरिता आज पीडित मुलीच्या कुटुंबियांनी व समाजबांधवांनी पुणे-बंगळुरू महामार्गावर ठिय्या आंदोलन केले होते. मात्र पोलिसांनी लाठीचार्ज करत आंदोलन उधळून लावले त्यामुळे आंदोलकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.

दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या घटनेबद्दल तीव्र संवेदना व्यक्त केल्या आहेत. या दुर्दैवी घटनेतील नराधमाला अटक झाली असून त्याला अधिकाधिक कठोर शिक्षा मिळण्यासाठी सरकार प्रयत्न करेल असे फडणवीस माध्यमांशी बोलताना म्हणाले. याच नराधमाने यापूर्वीही अशी कृत्ये केल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली.

या घटनेच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी आज पुणे येथील धायरी येथे जाऊन पीडित मुलीच्या पालकांची भेट घेतली. यावेळी त्यांनी कुटुंबीयांचे सांत्वन करत त्यांच्याशी संवाद साधला. शासन त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे असून नराधम आरोपीवर कठोर कारवाई करण्यात येईल, असा विश्वास त्यांना दिला.

या भेटीदरम्यान उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी घटनास्थळावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी दूरध्वनीवर संपर्क साधून संपूर्ण घटनेची माहिती दिली. या प्रकरणात खटला फास्टट्रॅक न्यायालयात चालवून आरोपीला कठोरात कठोर शिक्षा मिळावी, अशी मागणी केली. यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही सदर खटला फास्टट्रॅक कोर्टात चालवून आरोपीला मृत्युदंडापर्यंतची शिक्षा होण्यासाठी शासन सर्वतोपरी प्रयत्न करेल असे सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *