महाराष्ट्र राज्य
पत्रकार दिनासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता या भविष्यवेधी संकल्पनेची निवड योग्य : राज्यपाल
‘महाराष्ट्राची पहिली आर्टिफिशियल इंटेलिजन्स मीडिया हॅकेथॉन’चे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांच्या हस्ते उद्घाटन पुणे, दि. ५ : पत्रकार संघटनेने या वर्षीच्या पत्रकार दिनासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) ही नाविन्यपूर्ण आणि भविष्यवेधी संकल्पना निवडली आहे; आज ‘एआय’ ही माध्यमांसहित सर्व उद्योगांमध्ये एक परिवर्तनकारी शक्ती म्हणून उदयास आली असताना ही निवड योग्य वेळी आणि महत्त्वाची आहे, असे मत
सार्वजनिक आरोग्य सेवा अधिकाधिक दर्जेदार होण्यासाठी प्रयत्न करणार : आरोग्य मंत्री
आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांची औंध जिल्हा रुग्णालय आणि येरवडा मनोरुग्णालयाला भेट पुणे, दि. ३ : आरोग्य सेवा अधिकाधिक दर्जेदार होण्यासाठी आपण प्रयत्न करणार असून गरजू रुग्णांना तात्काळ आरोग्य सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी सार्वजनिक आरोग्य यंत्रणांनी नेहमी तत्पर रहावे, अशा सूचना सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिल्या. औंध जिल्हा रुग्णालय आणि
राष्ट्रीय सुरक्षिततेच्याबाबत भारतीय सैन्यदल सक्षम : मुख्यमंत्री
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ‘नो युवर आर्मी’मेळाव्याचे उद्धाटन पुणे, दि. ३: भारत देश राष्ट्रीय सुरक्षिततेच्या अनुषंगाने अंतर्गत आणि बाह्यबाजूने मजबूत आहे; भारतीय सेना जगातील उत्तम सेनेपैकी एक असून भू, जल व वायू अशा कोणत्याही मार्गाने होणाऱ्या हल्ल्यास प्रतिकार करण्यास सैन्यदल सक्षम आहे, असे गौरवोद्गार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काढले. ‘समर्थ भारत सक्षम सेना’ या
समाजात बंधुता रुजवण्यासाठी एकदिलाने काम करुया !” – प्रदीप रावत
डॉ. आंबेडकरांनी भेट दिलेल्या संघस्थानावर बंधुता परिषदेचे आयोजन कराड, २ जानेवारी : “इतिहासाच्या सागरातून कोळसा उगळायचा की चंदन हे आपण ठरवायचं. खऱ्या अर्थाने आपल्या प्रत्येक कृती मधून बंधुता जोपासून आपण चंदनाचा सुगंध सर्वत्र पसरविण्यासाठी प्रयत्न करुया, आपली गावकी एक आहे पण भावकी सुद्धा एक झाली पाहिजे, असे प्रतिपादन बंधुता परिषदेचे अध्यक्ष माजी खासदार प्रदीपदादा रावत
दुर्गम आणि नक्षलग्रस्त भागांच्या विकासासाठी महाराष्ट्र सरकारच्या प्रयत्नांचे पंतप्रधान मोदींकडून कौतुक
नवी दिल्ली 2 : राज्यातील दुर्गम आणि नक्षलग्रस्त भागांच्या सर्वांगीण विकासासाठी महाराष्ट्र सरकारने घेतलेल्या पुढाकाराचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विशेष कौतुक केले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या समाजमाध्यमावरील पोस्टला उत्तर देताना पंतप्रधानांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या. पंतप्रधान मोदी म्हणाले, “महाराष्ट्र सरकारने दुर्गम आणि नक्षलग्रस्त भागाच्या विकासासाठी केलेल्या प्रयत्नांचे मी अभिनंदन करतो. हे प्रयत्न लोकांच्या जीवनात
सेवाधर्मच मानव धर्म – सरसंघचालक डॉ. मोहन भागवत
पुणे : हिंदू धर्म हा शाश्वत धर्म असून, या चिरंतन व सनातन धर्मातील आचार्य सेवाधर्माचे पालन करतात, हा सेवा धर्म म्हणजेच मानव धर्म आहे, असे गौरवोद्गार राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डाॅ. मोहन भागवत यांनी काढले. हिंदू आध्यात्मिक सेवा संस्थेच्या वतीने शिक्षण प्रसारक मंडळीच्या महाविद्यालयाच्या मैदानात हिंदू सेवा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. येत्या २२ डिसेंबर
धर्माचे एकत्व व्यवहारातून प्रकट व्हावे : सरसंघचालक डॉ. मोहन भागवत
मोरया गोसावी संजीवन समाधी सोहळ्याचा शुभारंभ चिंचवड, दिनांक १७ : व्यक्ती, समाज आणि निसर्ग यांचे जीवन परमेष्ठीकडे नेण्याचे कार्य धर्म करतो. समाजाच्या एकत्वाचा आधार असलेला हा धर्म व्यवहारातून प्रकट व्हायला हवा, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी केले. चिंचवड येथील श्रीमन् महासाधू श्री मोरया गोसावी महाराज संजीवन सोहळ्याच्या उद्घाटन कार्यक्रमात ते
बांगलादेशातील हिंदूंवरील अत्याचारांविरुद्ध पुण्यात निदर्शने
पुणे : बांगलादेशमधील हिंदू समाजावर होणाऱ्या वाढत्या अत्याचारांच्या निषेधार्थ मंगळवारी पुण्याच्या कोथरूड येथील हुतात्मा राजगुरू चौकात निदर्शने करण्यात आली. या निदर्शनांमध्ये विविध हिंदू संघटनांसह मोठ्या प्रमाणात हिंदू नागरीक सहभागी झाले होते. आंदोलकांनी बांगलादेशमधील हिंदू आणि इतर अल्पसंख्यकांवरील होणाऱ्या मानवाधिकार उल्लंघनाचा तीव्र निषेध केला. हातात फलक घेऊन आणि घोषणांच्या माध्यमातून त्यांनी हिंदूंवर होणारे हल्ले तातडीने थांबवून
हिंदुत्वाचे आत्मभान हेच विकसित भारताचे सूत्र : शेफाली वैद्य
नांदेड सिटी मध्ये नवरात्रि उत्सवानिमित्त विशेष प्रबोधनपर कार्यक्रम पुणे, दि. ०७ : “देश टिकला तरच संस्कृती टिकेल, हे सत्य आपण लक्षात ठेवायला हवे. अनेक देशांमध्ये आपल्याप्रमाणेच संस्कृती विकसित झाल्या होत्या. मात्र कालौघात त्या नष्ट झाल्या. पेरु देशात असलेली समृद्ध इंका सभ्यता स्पेनच्या आक्रमणानंतर केवळ ५२ वर्षात नष्ट झाली, मात्र दुसरीकडे भारतात गोव्यामध्ये ४५० वर्षांच्या पोर्तुगीज
पुणे महानगरात 58 स्थानांवर होणार संघाचे पथसंचलन; हजारो स्वयंसवेकांचा सहभाग
पुणे, दिनांक 8 : राष्ट्रीय स्वयंसेवक संघ पुणे महानगराच्या वतीने विजयादशमीला शनिवारी (ता.12) 58 स्थानांवर पथसंचलन आयोजित करण्यात आले आहे. संघदृष्ट्या महानगरातील नऊ भागांमध्ये पूर्ण गणवेशात स्वयंसेवकांचे हे शिस्तबद्ध संचलन पार पडेल. विजयादशमीच्याच दिवशी नागपूरातील मोहिते वाड्यात 1925 मध्ये संघाची स्थापना झाली होती. त्यामुळे दरवर्षी विजयादशमीला संघाचे स्वयंसेवक देशभरात पथसंचलनांचे आयोजन करतात. यंदा संघ शताब्दी

