गुरू तेग बहादुर यांच्या बलिदानातून धर्म, स्वातंत्र्य आणि मानवतेच्या रक्षणाची प्रेरणा : मुख्यमंत्री

नांदेड येथे ‘हिंद-दी-चादर’ गुरुतेगबहादुर साहिबजी यांचा 350 वा ऐतिहासिक शहीदी समागम संपन्न नांदेड, २५ जानेवारी २०२६ : गुरू तेग बहादुर साहिब जी यांनी दिलेले बलिदान हे केवळ शीख धर्मासाठी नव्हते, तर या देशाची संस्कृती, सभ्यता, विचारधारा आणि धर्म यांच्या रक्षणासाठी होते अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरू तेग बहाद्दुर यांचे पुण्यस्मरण केले. शिख पंथाचे

Read More

भारत समजून घेण्यासाठी संस्कृत भाषा समजून घ्यावी लागेल : भैय्याजी जोशी

संस्कृतशिवाय भारतीयत्व अपूर्ण : भैय्याजी जोशी संस्कृत भाषेतील १० पुस्तकांचे प्रकाशन पुणे, दिनांक २२ जानेवारी २०२६ : भारतातील कोणतीही भाषा संस्कृतशिवाय नाही. त्यामुळे भारतीय तत्त्वज्ञान, विज्ञान, चिंतन आणि जीवनमूल्ये समजून घेण्यासाठी संस्कृत भाषेशिवाय पर्याय नाही. खऱ्या अर्थाने संस्कृतशिवाय भारतीयत्व अथवा हिंदुत्व अपूर्ण आहे, असे मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखिल भारतीय कार्यकारिणी सदस्य भैय्याजी जोशी यांनी

Read More

तंत्रज्ञान समाजाच्या भल्यासाठी वापरावे, त्याचे गुलाम होता कामा नये : सरसंघचालक डॉ. मोहन भागवत

छत्रपती संभाजीनगर येथे युवा उद्यमींशी झालेल्या संवादात सरसंघचालकांचे प्रतिपादन छत्रपती संभाजीनगर : “तंत्रज्ञान ही अपरिहार्य गोष्ट आहे. स्वदेशीचा वापर म्हणजे तंत्रज्ञान नाकारणे असे नाही. परंतु आपण तंत्रज्ञानाचे गुलाम होता कामा नये. आपण उद्योग केवळ आपल्या नफ्यासाठी नाही, समाजाच्या भल्यासाठी करतो” असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी केले. ते युवा उद्यमी संवाद

Read More

दिव्यांगांकडे पाहण्याचा समाजाचा दृष्टिकोन बदलत आहे : डॉ. हिरेमठ

पुणे – दिव्यांगांकडे पाहण्याचा समाजाचा दृष्टिकोन बदलत आहे. त्यांच्याकडे सहानुभूतीने न पाहता सन्मानाने पाहिले जात आहे. दिव्यांगांनी प्रधानमंत्री व मुख्यमंत्री सहायता निधीद्वारे सन्मानाने स्वतःचा रोजगार करावा. तसेच इतरांनाही रोजगार देण्यासाठी सक्षम व्हावे असे आवाहन डॉ. राजेंद्र हिरेमठ यांनी केले. सक्षमचे पुणे महानगराचे एक दिवसीय अधिवेशन नुकतेच भावे प्रशालेत पार पडले त्यावेळी ते बोलत होते. ते

Read More

‘भारत को जानो’ स्पर्धेतून भारताचे अंतरंग उलगडले : डॉ.विजय भटकर

२५ वी अखिल भारतीय ‘भारत को जानो’ स्पर्धा उत्साहात दि. ११ जानेवारी, पिंपरी चिंचवड : भारत विकास परिषद आयोजित अखिल भारतीय ‘भारत को जानो’ ही केवळ स्पर्धा नसून विद्यार्थ्यांना भारताची विविधतेतील एकता व आपल्या महनीय भारताचे अंतरंग जाणून घेण्याची संधी आहे. भारतीय मूल्यांवर विश्वास ठेऊन, ध्येय ठरवून सातत्याने त्या दिशेने चालत राहिल्यास भारताचे सक्षम, संस्कारित

Read More

संघाने राष्ट्रभाव जागवण्याचे कार्य केले : गजानन निमदेव

‘समर्पणाचा शतकोत्सव’ : विदर्भ हुंकारच्या संघ शताब्दी विशेषांकाचे प्रकाशन नागपूर, 28 डिसेंबर : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी प्रवासात स्वयंसेवकांनी समाजजीवनाच्या विविध क्षेत्रांत महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. नैसर्गिक आपत्ती, सामाजिक सेवा, शिक्षण, संस्कार आणि राष्ट्रनिर्मिती या प्रत्येक क्षेत्रात संघकार्य प्रभावीपणे सुरू आहे. कोणत्याही प्रकारचा भेदभाव न करता समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत पोहोचून राष्ट्रभाव जागवण्याचे कार्य संघाने केल्याचे

Read More

कराड येथे बंधुता परिषदेचे आयोजन

कराड, दि. ३१ डिसेंबर : दिनांक २ जानेवारी १९४० रोजी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी कराड मध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या भवानी शाखेस भेट दिली होती या ऐतिहासिक भेटीचे स्मरण करून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेला एकात्मतेचा संदेश समाजात रुजावा यासाठी त्याच ठिकाणी म्हणजे कराड शहरातील संघाच्या भवानी शाखेच्या मैदानावर बंधुता परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे.

Read More

‘एकशः सम्पत्’ पुस्तकाचे पुण्यात सुहासराव हिरेमठ यांच्या हस्ते प्रकाशन

पुणे, दि. ११ डिसेंबर : जगात वाईटाच्या तुलनेत चांगले प्रसंग असंख्य पटीने घडत असतात. पण ते लोकांपर्यंत पोहोचत नाहीत. चांगुलपणा लोकांपर्यंत पोहोचविणारी ‘एकशः सम्पत’सारखी पुस्तके मोठ्या प्रमाणावर निर्माण व्हावीत आणि समाजापर्यंत पोहोचवावीत, ही काळाची गरज आहे, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य सुहास हिरेमठ यांनी केले. प्रेरक लेखक व मुक्त पत्रकार दत्ता जोशी

Read More

महाराष्ट्र नक्षलवादमुक्तीच्या उंबरठ्यावर – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

नागपूर, दि. ११ डिसेंबर : केंद्राचे २०२६ पर्यंत देशातून नक्षलवाद निर्मूलनाचे उद्दिष्ट साध्य करण्यास महाराष्ट्र वेगाने पुढे जात असून राज्य नक्षलवादमुक्तीच्या उंबरठ्यावर असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. राज्य शासनाच्या धोरणात्मक उपक्रमांमुळे आणि पोलिसांच्या प्रयत्नांमुळे ही प्रगती शक्य होत असल्याचे ते म्हणाले. फडणवीस यांनी सांगितले की, नक्षलवाद पूर्णपणे संपवण्यासाठी अतिदुर्गम भागांत नवीन पोलीस चौक्या उभारून

Read More

पुणे महानगरातील 220 प्रकल्पांसाठी 32,523 कोटींची मंजुरी : मुख्यमंत्री फडणवीस

नागपूर, दि. ११ डिसेंबर : पुणे महानगर क्षेत्रातील 220 विकास प्रकल्पांना 32 हजार 523 कोटी रूपयांचा निधी मंजूर करण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. वाढत्या नागरीकरणाच्या पार्श्वभूमीवर शहरांना आवश्यक सुविधा देणे हे सरकारचे प्राधान्य असल्याचे त्यांनी सांगितले. रस्ते विकास आराखडा ठरवल्यानंतरच शहर विकासाची रुपरेषा अंतिम करावी, असेही त्यांनी सुचवले. मुख्यमंत्री फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली

Read More