बातम्या
साखर कारखान्यांच्या आर्थिक सहाय्यासाठी तातडीने राज्यस्तरीय समिती गठीत
मुंबई, दि. 24 मार्च : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज विधान भवन, मुंबई येथे साखर उद्योगाच्या प्रश्नांसंदर्भात बैठक संपन्न झाली. राज्यातील साखर उद्योग हा महत्त्वाचा उद्योग असून, त्याच्या आर्थिक सहाय्याच्या दृष्टीने राज्यस्तरावर मुख्य सचिवांनी तातडीने समिती गठीत केली आहे. या समितीला स्वयंस्पष्ट अहवाल त्वरीत सादर करण्याचे निर्देश मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी दिले. मुख्यमंत्री फडणवीस
तळेगाव ते चाकण चौपदरी उन्नत महामार्गास मान्यता
मुंबई, दि. 24 मार्च : पुणे जिल्ह्यातील तळेगाव ते चाकण क्रमांक 548-डी राष्ट्रीय महामार्गावरील 0 ते 26 किलोमीटर दरम्यान 4 पदरी उन्नत आणि 4 पदरी जमिनीस समांतर महामार्गास मान्यता देण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज विधान भवन, मुंबई येथे मंत्रिमंडळ पायाभूत सुविधा समितीची बैठक पार पडली. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी राज्यातील सुलभ
एसटी महामंडळाला मिळाले राजमाता जिजाऊंच्या नावाचे बळ
‘राजमाता जिजाऊ’ नावाने 3000 बसेस एसटीच्या सेवेत दाखल मुंबई, दि. 24 मार्च : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधान भवन, मुंबई येथे महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या 3000 ‘राजमाता जिजाऊ’ स्मार्ट बसेसचे लोकार्पण केले. या बसेसना ‘राजमाता जिजाऊ’ हे नाव देण्यामागे, राजमाता जिजाऊ माँसाहेब यांना अभिवादन करण्याची भावना आहे. एसटी बससेवेची नामकरणाची गौरवशाली परंपरा असून,
गंगाधरराव फडणवीस डायग्नोस्टिक सेंटरचे नागपुरात लोकार्पण
नागपूरला अत्याधुनिक आरोग्यसेवेची नवी दिशा नागपूर, दि. 22 मार्च : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांच्या हस्ते आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, श्रीमती सरिता गंगाधरराव फडणवीस व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत श्री सिद्धिविनायक सेवा फाउंडेशन, नागपूर द्वारा निर्मित गंगाधरराव फडणवीस मेमोरियल डायग्नोस्टिक सेंटरचे आज नागपूर येथे लोकार्पण पार पडले. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस
सर्व समाजाने मिळून राष्ट्रहितासाठी काम करणे आवश्यक : अनिल भालेराव
देवगिरी प्रांतात गृह संपर्क अभियानात १२ लाख घरांपर्यंत थेट संपर्क छत्रपती संभाजीनगर, दि. १७ मार्च : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची तीन दिवसीय अखिल भारतीय प्रतिनिधी सभेची बैठक हरियाणातील समालखा येथे संपन्न झाली. संघटनात्मक कार्याचा विस्तार, राष्ट्रहितासाठी समाजातील सज्जन शक्तीची अधिक सक्रियता आणि सामाजिक समरसतेचा संकल्प यांसह ही बैठक पार पडली. या पार्श्वभूमीवर देवगिरी प्रांताचे प्रांत संघचालक
संघ शताब्दीत पश्चिम महाराष्ट्रात दहा लाखांहून अधिक कुटुंबाशी संवाद
समाजातर्फे आयोजित तीन हजार ‘सकल हिंदू संमेलनांत’ संघाचाही सहभाग पुणे, १६ – ‘राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा विस्तार म्हणजे संघ आणि समाज यांनी एकरूप होऊन राष्ट्रकार्यासाठी सज्ज होणे` याच उद्दिष्टाने संघ शताब्दीनिमित्ताने देश व राज्यभरात विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. पश्चिम महाराष्ट्रात ७ शासकीय जिल्ह्यांमधून समाजातील विविध संस्था- संघटनांतर्फे तीन हजारांहून अधिक ‘सकल हिंदू संमेलनांचे आयोजन करण्यात
मुंबईत वॉटर मेट्रो प्रकल्पाला वेग; जलवाहतुकीत क्रांती
मुंबई, दि. 17 मार्च : मुंबईतील वाढती वाहतूक कोंडी लक्षात घेता, जलवाहतुकीच्या माध्यमातून वेगवान, सुरक्षित आणि माफक दरातील पर्यायी प्रवास व्यवस्था उभी करण्यावर भर देण्यात येत आहे. लवकरच मुंबईत आधुनिक वॉटर मेट्रोचे जाळे निर्माण होऊन नागरिकांना सुकर, पर्यावरणपूरक प्रवासाचा नवा पर्याय उपलब्ध होणार आहे. मुंबईतील जलवाहतुकीला नवे बळ देण्यासाठी वॉटर मेट्रोचे जाळे उभारण्यासंदर्भात आज विधानभवनात
नवीन तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात जागतिक स्पर्धेमध्ये महाराष्ट्र कुठेही कमी नसेल : फडणवीस
एआय, ड्रोन आणि सीसीटीव्हीच्या मदतीने सुरक्षित शहरांचा संकल्प मुंबई, दि. 17 मार्च : शहरांमध्ये निर्माण करण्यात येत असलेल्या सीसीटीव्ही यंत्रणेवर इंटिग्रेटेड कंट्रोल अँड कमांड सेंटर असावे आणि त्यात या क्षेत्रातील तज्ज्ञ व्यक्तींचा सहभाग असावा. खासगी क्षेत्राच्या माध्यमातून नवीन तंत्रज्ञानाने युक्त अशी ही केंद्रे असावीत. या संपूर्ण परिसंस्थेच्या निर्मितीमधून या क्षेत्रात जागतिक स्पर्धेमध्ये महाराष्ट्र कुठेही कमी
नायगाव बीडीडी चाळवासियांची स्वप्नपूर्ती, हक्काच्या घराचे स्वप्न साकार!
नायगाव बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पातील 864 पुनर्वसन सदनिकांचे वितरण मुंबई, दि. 16 मार्च :मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज मुंबई येथे नायगाव बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पातील ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर बीडीडी संकुला’तील 864 पुनर्वसन सदनिकांचे वितरण पार पडले. तसेच मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते 14 चाळवासियांना प्रातिनिधिक स्वरूपात सदनिकांची चावी व ताबापत्राचे वाटप करण्यात आले. मुंबईतील बीडीडी
पायाभूत सुविधांमध्ये शाश्वत गुंतवणूक केल्यास शेतकरी संकटाच्या दुष्टचक्रातून बाहेर पडू शकेल : मुख्यमंत्री
शेती आणि शेतकऱ्यांच्या सर्वांगीण प्रगतीसाठी तंत्रज्ञान आणि गुंतवणुकीचे नवे पर्व राहुरी, अहिल्यानगर, दि. 15 मार्च : शेती क्षेत्राकडे गुंतवणुकीचे क्षेत्र म्हणून पाहण्याची वेळ आली आहे. पायाभूत सुविधांमध्ये शाश्वत गुंतवणूक केल्यास शेतकरी संकटाच्या दुष्टचक्रातून बाहेर पडू शकेल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज व्यक्त केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी येथे

