बातम्या
बारामतीत अत्याधुनिक दर्जाचे पशुवैद्यकीय महाविद्यालय उभारणार-उपमुख्यमंत्री अजित पवार
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते ‘कृषिक २०२५’ कृषी प्रदर्शनाचे उद्घाटन बारामती, दि. १६: बारामतीच्या नावाला साजेसे, परिसराच्या वैभवात भर घालणारे अत्याधुनिक दर्जाचे पशुवैद्यकीय महाविद्यालय येथे उभारण्यात येईल; अशी घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली. बारामती ॲग्रीकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्ट व कृषी विज्ञान केंद्राला राज्यशासनाच्यावतीने सर्वतोपरी सहकार्य करण्यात येईल, अशीही ग्वाही त्यांनी दिली. कृषी विज्ञान केंद्र माळेगाव
सेवा भवन प्रकल्पातर्फे ‘सेवा भवन रन’ मॅरेथॉनचे आयोजन
पुणे – ‘सेवा भवन’ या पुण्यातील रुग्णसेवा प्रकल्पातर्फे ‘सेवा भवन रन’ या मूत्रपिंडाच्या स्वास्थ्या विषयी जनजागृतीपर मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले आहे. रविवारी, ९ फेब्रुवारी रोजी सकाळी ५.३० वाजता कर्वेनगरमधील महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेपासून या मॅरेथॉनला प्रारंभ होईल. ‘रन फॉर किडनी हेल्थ’ हा विचार समाजापर्यंत पोहोचवण्यासाठी या मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ
छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने आयोजित होणाऱ्या राज्यस्तरीय स्पर्धांसाठी यापुढे एक कोटींचा निधी देणार – उपमुख्यमंत्री अजित पवार
२३ व्या छत्रपती शिवाजी महाराज चषक राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते उद्घाटन बारामती, दि.१५ : गणेश वंदना, ढोलताशा पथक, ‘लेझर शो’, महाराष्ट्रीयन संस्कृतीचे दर्शन घडविणारे लोकसंगीत, लक्ष्यवेधी हीप हॉप नृत्य फटाक्यांची आतषबाजी आणि प्रेक्षकांनी भरगच्च भरलेले मैदान अशा अतिशय दिमाखदार, जोशपूर्ण व क्रीडामय वातावरणात २३ व्या छत्रपती शिवाजी महाराज चषक राज्यस्तरीय कबड्डी
राज्यातील विद्यापीठांमध्ये सायबर सुरक्षेबाबत अल्पकालीन अभ्यासक्रम राबविण्यात येईल- राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन
पुणे, दि. १२: राज्यातील सर्व कुलगुरूंची बैठक घेऊन सायबर सुरक्षेबाबत अल्पकालीन अभ्यासक्रम तयार करण्यासह सर्व विद्यापीठात राबविण्यात येईल, असे प्रतिपादन राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी केले. हे अभ्यासक्रम राबविल्यामुळे सायबर योद्ध्यांची एक नवीन पिढी तयार होईल, असेही ते म्हणाले. ‘सायबर शिक्षा फॉर सायबर सुरक्षा अवॉर्ड्स’ कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचे
भारताला ‘विश्वगुरू’च्या दिशेने नेण्यासाठी विज्ञाननिष्ठ संस्कृतीची आवश्यकता : राहुल सोलापूरकर
कोथरूड मध्ये ३५ व्या ‘सांस्कृतिक व्याख्यानमालेला’ उत्तम प्रतिसाद पुणे दि. १० जानेवारी : भारताच्या उज्ज्वल भविष्यासाठी पाश्चिमात्य विचार सोडून आपली संस्कृती आणि परंपरा कशी विज्ञाननिष्ठ आहे हे लोकांना षड्-दर्शनाच्या दृष्टीकोनातून दाखवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. तसेच, देशाला विश्वगुरूच्या दिशेने नेण्यासाठी विज्ञाननिष्ठ हिंदू संस्कृतीचीच आवश्यकता आहे, असे प्रतिपादन जेष्ठ नाट्य आणि सिने अभिनेते राहुल सोलापूरकर यांनी केले.
पारदर्शी व गतिमान शासन प्रतिमा निर्मितीसाठी महसूल यंत्रणेने कार्य करावे-महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे
शासनाच्या १०० दिवसांच्या कृती कार्यक्रमाची अधिकाऱ्यांनी प्रभावीपणे अंमलबजावणी करावी* पुणे महसूल विभागाच्या कार्याचा महसूल मंत्र्यांनी घेतला आढावा पुणे, दि.१० : महसूल खाते शासनाचा चेहरा म्हणून ओळखले जाते. लोकाभिमुख प्रशासनासाठी महसूल यंत्रणेतील जिल्हाधिकारी यांच्यासह उपविभागीय अधिकारी, तहसीलदार यांनी आठवड्यातील किमान दोन दिवस आपल्या कार्यक्षेत्रात ग्रामीण भागापर्यंत दौरे करावे आणि नागरिकांच्या प्रलंबित प्रकरणांचा आढावा घ्यावा आणि ती
मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा, अधिसूचना महाराष्ट्राला सुपूर्त
मराठी भाषा आणि उद्योग मंत्री उदय सामंत यांनी दिली माहिती नवी दिल्ली, दि. ८ : मराठी भाषेला अभिजात भाषेचा मान मिळाल्याबाबतची अधिसूचना आज केंद्रीय सांस्कृतिक मंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांनी मराठी भाषा आणि उद्योग मंत्री उदय सामंत यांच्याकडे सुपूर्त केली असल्याची माहिती सामंत यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी साहित्य संस्कृती मंडळाचे अध्यक्ष सदानंद मोरे, अभिजात
२२ जानेवारीपासून इंदापुरात सुरू होणार राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन
क्रीडामंत्री दत्तात्रय भरणे यांनी घेतला इंदापूर येथे होणाऱ्या राज्यस्तरीय कृषी प्रदर्शनाच्या तयारीचा आढावा पुणे, दि. ६ : इंदापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने २२ ते २६ जानेवारी २०२५ दरम्यान आयोजित राज्यस्तरीय कृषी-पशु प्रदर्शन, घोडे बाजार व डॉग शोच्या अनुषंगाने क्रीडा व युवक कल्याण मंत्री दत्तात्रय भरणे यांनी आढावा बैठक घेतली. यावेळी आमदार ज्ञानेश्वर कटके, विभागीय
पत्रकार दिनासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता या भविष्यवेधी संकल्पनेची निवड योग्य : राज्यपाल
‘महाराष्ट्राची पहिली आर्टिफिशियल इंटेलिजन्स मीडिया हॅकेथॉन’चे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांच्या हस्ते उद्घाटन पुणे, दि. ५ : पत्रकार संघटनेने या वर्षीच्या पत्रकार दिनासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) ही नाविन्यपूर्ण आणि भविष्यवेधी संकल्पना निवडली आहे; आज ‘एआय’ ही माध्यमांसहित सर्व उद्योगांमध्ये एक परिवर्तनकारी शक्ती म्हणून उदयास आली असताना ही निवड योग्य वेळी आणि महत्त्वाची आहे, असे मत
सार्वजनिक आरोग्य सेवा अधिकाधिक दर्जेदार होण्यासाठी प्रयत्न करणार : आरोग्य मंत्री
आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांची औंध जिल्हा रुग्णालय आणि येरवडा मनोरुग्णालयाला भेट पुणे, दि. ३ : आरोग्य सेवा अधिकाधिक दर्जेदार होण्यासाठी आपण प्रयत्न करणार असून गरजू रुग्णांना तात्काळ आरोग्य सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी सार्वजनिक आरोग्य यंत्रणांनी नेहमी तत्पर रहावे, अशा सूचना सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिल्या. औंध जिल्हा रुग्णालय आणि

