बातम्या
मराठी भाषेची ख्याती विश्वस्तरावर पोहोचवण्यासाठी विश्व मराठी संमेलनात सर्वांचा सहभाग महत्त्वाचा : उदय सामंत
विश्व मराठी संमेलनाच्या नियोजनाचा मंत्री उदय सामंत यांनी घेतला आढावा पुणे, दि. २५: मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर विश्व मराठी संमेलन पुणे येथे होत आहे. पुस्तक महोत्सवाप्रमाणेच मराठी भाषेची ख्याती विश्वस्तरावर पोहोचवण्यासाठी विश्व मराठी संमेलनात सर्वांचा सहभाग महत्त्वाचा आहे, असे प्रतिपादन उद्योग तथा मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी केले. फर्ग्युसन महाविद्यालय येथे ३१
महाराष्ट्राला 48 ‘पोलीस पदके’
नवी दिल्ली, दि. 25 : पोलीस पदकांची आज घोषणा झाली, महाराष्ट्रातील एकूण 48 पोलिसांना हा पुरस्कार जाहीर झाला आहे. यातील चार पोलीस अधिका-यांना उत्कृष्ट सेवेकरिता ‘राष्ट्रपती विशिष्ठ सेवा पदक’, तर 44 पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना ‘गुणवत्तापूर्ण सेवेसाठी पदक’ (MSM) जाहीर झाली आहेत. यातील 39 पोलीस पदके ‘गुणवत्तापूर्ण सेवे’साठी तर पाच पदके कारागृहात सेवा बजावणाऱ्या पोलीस
दावोस मध्ये महाराष्ट्राचाच बोलबाला, महाराष्ट्र भविष्यात डेटा सेंटरचे कॅपिटल : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
विक्रमी १५ लाख ७५ हजार कोटींचे करार, १६ लाख रोजगार निर्मिती; दावोस येथून मुख्यमंत्री फडणवीस यांनी पत्रकारांशी साधला संवाद मुंबई, दि. २३ : दावोस मधील वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या भारताच्या पॅव्हेलियनमध्ये महाराष्ट्राचाच बोलबाला राहिला. यामुळे महाराष्ट्राला जगभरातील विविध उद्योग क्षेत्रातील दिग्गज कंपन्यासमवेत विक्रमी १५ लाख ७५ हजार कोटी रुपयांचे गुंतवणूकीचे सामंजस्य करार करता आले. यातून राज्यात
गणित हे सर्व विज्ञानाचे विज्ञान : अविनाश धर्माधिकारी
भारतीय विचार साधनाच्या ‘अविनाशी बीज’ पुस्तकाचे प्रकाशन पुणे, दि. २० जानेवारी : गणित हे सर्व विज्ञानाचे विज्ञान आहे. इंग्रजांनी भारतीयांना स्वतःच्या संस्कृती आणि परंपरेबद्दल न्यूनगंड निर्माण होईल अशी परिस्थिती निर्माण केली. परंतु भारतीय ज्ञान प्रणालीचा अभ्यास करताना भारतीय परंपरेमधील शास्त्रशुद्ध विचार समोर येतो असे मत माजी सनदी अधिकारी अविनाश धर्माधिकारी यांनी व्यक्त केले. भारतीय विचार
कृषीमंत्री ॲड. माणिकराव कोकाटे यांच्या हस्ते ‘इंदापूर कृषी महोत्सव २०२५’ चे उद्घाटन
शेतकऱ्यांचे जीवनमान समृद्ध करण्याकरीता राज्य शासनाचा प्रयत्न : कृषी मंत्री बारामती, दि. २२ : शेतकऱ्यांचे जीवनमान अधिकाधिक समृद्ध करण्याच्या दृष्टीने कृषी विभागामार्फत शेतकऱ्यांना विविध योजनांचा लाभ देण्यासह नवनवीन तंत्रज्ञान उपलब्ध करून दिले जाईल, असे प्रतिपादन कृषीमंत्री ॲड. माणिकराव कोकाटे यांनी केले. शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च कमी करून त्यांच्या उत्पन्नात वाढ करण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील, असेही ते
हिंदुत्व हा सर्वसमावेशक विचार : भैय्याजी जोशी
पुसदमधील केशव स्मृती भवनाचे लोकार्पण पुसद, २२ जानेवारी : संघाने समाजाला एक चेहरा दिला आहे. हिंदू म्हणजे कोण हे संघाने जगाला सांगण्याचे कार्य केले आहे. ‘सर्वजन हिताय, सर्वजन सुखाय’ ही भूमिका मनात बाळगून संघाचे कार्य अखंड, अविरत सुरू आहे. बदलत्या भारतात मूक साक्षी होण्यापेक्षा, सक्रिय साक्षी होणे आणि भारताला सुपर पॉवर बनवण्यापेक्षा सुपर राष्ट्र बनवणे,
विकसित भारताचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी सर्वांना सोबत घेऊन पुढे जाणे महत्त्वाचे : राज्यपाल सी.पी.राधाकृष्णन
पर्पल जल्लोष 2025 चा समारोप उत्साहात पुणे दि. 19 : ‘विकसित भारताचे स्वप्न आपल्या सर्वांना पूर्ण करायचे आहे. जगातील सर्वात सक्षम देश म्हणून भारताला पुढे नेण्यासाठी सर्वांनी एकत्रित प्रयत्न गरजेचे आहे. आपण समाजातील प्रत्येक घटकाच्या गरजा ओळखून त्यांना एकत्रित घेऊन पुढे गेलो तर भारत निश्चितच एक आदर्श देश म्हणून जगासमोर येईल. यामध्ये प्रत्येकाचे योगदान महत्वाचे
महाराष्ट्र दुष्काळमुक्त करण्यासाठी अधिकाऱ्यांनी समर्पित भावनेने काम करावे : जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील
कोकण ते इतर नदी खोऱ्यात पाणी वळविण्यासाठीच्या नदीजोड प्रकल्पांबाबत कार्यशाळा संपन्न पुणे, दि. 17 : महाराष्ट्र दुष्काळमुक्त करण्यासाठी जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांनी समर्पित भावनेने काम करावे, असे आवाहन जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी केले. विभागासाठी सध्याची आर्थिक तरतूद पाहता प्रस्तावित नदीजोड प्रकल्प पूर्ण होण्यास 20 ते 25 वर्षे लागू शकतील असे प्रकल्प पाच वर्षात पूर्ण होण्याच्या
शिक्षण विभागाकरीता आखण्यात आलेल्या १० कलमी कार्यक्रमाची प्रभावीपणे अंमलबजावणी करा- शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे
पुणे, दि. १७ : मुख्यमंत्री यांच्या निर्देशानुसार शिक्षण विभागाकरीता आखण्यात आलेल्या १० कलमी कार्यक्रमाची प्रभावीपणे अंमलबजावणी करावी; विभागाच्या अधिकाधिक सेवा ऑनलाईन पद्धतीने उपलब्ध करण्याच्या दृष्टीने नियोजन करावे, असे निर्देश शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी दिले. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ येथे शालेय शिक्षण आयुक्तालयाच्या अधिनस्त असलेल्या विषयाबाबत आढावा बैठकीत त्यांनी सूचना
शासकीय, खासगी आस्थापनांना महिलांची लैंगिक छळवणूकीस प्रतिबंध कायद्यांतर्गत समिती स्थापन करण्याचे आवाहन
पुणे, दि. १७ : दहा किंवा दहापेक्षा अधिक कर्मचारी कार्यरत असणाऱ्या शासकीय, खासगी आस्थापनाच्या ठिकाणी नोकरी, व्यवसाय करणाऱ्या महिलांची कामाच्या ठिकाणी लैंगिक छळवणूकीस प्रतिबंध करण्यासाठी, तक्रारीची चौकशी आणि छळ करणाऱ्या व्यक्तीस शिक्षा करण्यासाठी अंतर्गत तक्रार निवारण समिती स्थापन करणे बंधनकारक असल्याचे जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालयाने कळविले आहे. कामाच्या ठिकाणी महिलांचा लैंगिक छळ

