केमिकल इंडस्ट्रीच्या प्रगतीसाठी महाराष्ट्र शासन कटीबद्ध : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मुंबई, दि. 11 मार्च : सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योगांच्या बाबतीत महाराष्ट्र हे देशाचे केंद्र आहे. या उद्योगांसाठी पायाभूत सुविधा व प्लग-अँड-प्ले सुविधा निर्माण करण्यास महाराष्ट्र शासन प्राधान्य देत असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सांगितले. फडणवीस यांनी आज ’19व्या ॲन्युअल इंडिया केमिकल इंडस्ट्री आऊटलुक कॉन्फरन्स अँड एक्झिबिशन’च्या निमित्ताने आयोजित ‘सीईओ राऊंडटेबल’ येथे उपस्थिती दर्शविली.
सर्व सामाजिक आव्हानांवर हिंदुत्व जागृती हेच एकमेव उत्तर : अभय ठकार
हिंगणे परिसरात विराट ‘हिंदू संमेलन’ संपन्न ‘तीर्थ शिवराय’ कार्यक्रमाने भारावले पुणेकर पुणे, दिनांक 8 मार्च : “राष्ट्राचे संरक्षण आणि प्रगती या दोन्हीचा विचार करणारी नित्य सिद्ध चारित्र्यवान शक्ती निर्माण करण्यासाठी डॉ. हेडगेवारांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना केली. विस्मृतीत गेलेली हिंदू ही आपली खरी ओळख पुन्हा जागृत करण्याचे कार्य संघाने गेल्या 100 वर्षांत सातत्याने केले असून,
कुराणातील निवडक आयातींवरून इस्लामला सहिष्णू ठरवणे चूक : प्रा. शेषराव मोरे
प्रख्यात लेखक व ज्येष्ठ अभ्यासक प्रा. शेषराव मोरे यांच्या पुण्यातील व्याख्यानास प्रचंड प्रतिसाद पुणे, दि. 11 मार्च : “सहिष्णू हिंदू समाजामध्ये इस्लामबद्दल कमालीचे अज्ञान आहे. कुराणातील आयतांचा अर्धवट संदर्भ देऊन केवळ सहिष्णूता दाखवण्याचा प्रयत्न केला जातो; मात्र प्रत्यक्षात इस्लाममध्ये केवळ अल्लावरचीच श्रद्धा मान्य आहे, इतरांची नाही. त्यामुळे मूलभूत इस्लामचे सहिष्णू समाजासमोर मोठे आव्हान उभे ठाकले
विकसित भारताचा मार्ग महिला सक्षमीकरणातूनच : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मुंबई, दि. 9 मार्च : आपल्याला विकसित भारत 2047 चे स्वप्न पूर्ण करायचे असेल, तर त्याचा मार्ग महिला सक्षमीकरणातून जातो, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी नेहमी सांगतात. जगाच्या पाठीवर ज्या विकसित राष्ट्रांनी आपल्या नारीशक्तीची ताकद ओळखली, त्या राष्ट्रांच्या अर्थचक्राला गती प्राप्त झाली, त्यांचा विकास झाला आणि त्यांची अर्थव्यवस्था मजबूत झाली. म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी महिला सक्षमीकरणाचे
पुणे विद्यापीठ चौकातील डबल डेकर उड्डाणपुलाला अजितदादांचे नाव
पुणे, दि. ८ मार्च : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ चौकातील डबल डेकर उड्डाणपुलाचे लोकार्पण आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्तेर आभासी (व्हर्च्युअल) पद्धतीने करण्यात आले. पश्चिम पुण्याच्या वाहतूक व्यवस्थेच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा असणाऱ्या या डबल डेकर उड्डाणपुलामुळे वाहतूक सुरळीत होण्यास मोठी मदत होणार असून या पुलाला दिवंगत उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजितदादा पवार यांचे नाव देण्यात यावे,
प्रगत उत्पादन क्षमतेच्या बळावर महाराष्ट्राची ट्रिलियन डॉलर्स अर्थव्यवस्थेकडे वाटचाल : मुख्यमंत्री
नागपूर, दि. 7 मार्च : राज्यशासनाच्या उद्योग पूरक धोरणामुळे निर्मिती क्षेत्र सकारात्मक दिशेने वळण घेत आहे. प्रगत उत्पादन क्षमतेच्या बळावर महाराष्ट्राची ट्रिलियन डॉलर्स अर्थव्यवस्थेकडे वाटचाल सुरू आहे. उद्योगाला चालना देत विदर्भाच्या विकासासाठी नागपूरला उद्योगाचे मॅग्नेट बनविण्याच्या दिशेने पाऊल टाकले असून त्यात एक्सएसआयओ कंपनीने महत्त्वाची भूमिका बजावावी, अशी अपेक्षा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व्यक्त केली. मुख्यमंत्री
कल्याण लोकसभा मतदारसंघात आता वाहतूक व्यवस्थेचा नवा पॅटर्न
खाली रस्ता, मध्ये फ्लायओव्हर आणि वर मेट्रो कल्याण, दि. 3 मार्च : कल्याण लोकसभा मतदारसंघातील विविध महत्वाकांक्षी प्रकल्पांबाबत एमएमआरडीए मुख्यालयात खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या उपस्थितीत एक महत्वाची बैठक पार पडली. यावेळी बैठकीत मतदारसंघात सुरू असलेल्या वाहतुकीच्या दृष्टीने महत्वाच्या प्रकल्पांचा आढावा घेतला. यावेळी एमएमआरडीए आयुक्त डॉ. संजय मुखर्जी, एमएमआरडीए अतिरिक्त आयुक्त अश्विन मुदगल यांची मुख्य
‘पल्स’मुळे आरोग्य क्षेत्रात महाराष्ट्राचा लौकिक वाढणार : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मुंबई, दि. 4 मार्च : या परिषदेच्या आयोजनातून जागतिक स्तरावर असणाऱ्या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून आरोग्य क्षेत्रात मोठे सकारात्मक बदल होतील. आपली संपूर्ण आरोग्य यंत्रणा सक्षम करण्यासाठी ‘पल्स परिषद’ ही मोठी संधी आहे असे मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज व्यक्त केले. मेडिकल कॉन्क्लेव्ह – ‘पल्स 2026’ कर्टन रेझर येथे फडणवीस यांनी प्रमुख उपस्थिती दर्शवली, त्यावेळी ते
देशी गाय संशोधन व प्रशिक्षण केंद्रास ‘अजितदादा पवार’ यांचे नाव
महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेच्या १२२ व्या बैठकीत निर्णय पुणे, दि. 2 मार्च : “महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी अंतर्गत देशी गाईंचे संगोपन व संवर्धन, तसेच दूध व दुग्धजन्य उत्पादने, गोमूत्र आणि शेण प्रक्रियेवरील संशोधनासाठी कार्यरत असलेल्या देशी गाय संशोधन व प्रशिक्षण केंद्राचे ‘अजितदादा पवार देशी गाय संशोधन व प्रशिक्षण केंद्र’ असे नामकरण करण्यास
दुबईत अडकलेले 111 नागरिक पुण्यात सुखरूप पोहोचले, उर्वरित 73 नागरिकांसाठी शर्थीचे प्रयत्न
पुणे, दि. 4 मार्च : मध्यपूर्व व आसपासच्या काही देशांमध्ये निर्माण झालेल्या तणावपूर्ण प्रादेशिक परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर दुबई येथे अडकलेल्या जिल्ह्यातील एकूण १८४ नागरिकांपैकी १११ नागरिक पुण्यात सुखरूप पोहोचले आहेत. तसेच १९ नागरिकांच्या विमान उड्डाणाची वेळ बदलण्यात आली असून ५४ नागरिकांना परत आणण्याची प्रक्रिया सुरु आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिली आहे. भारत सरकार

