
सातारा, दि. २ फेब्रुवारी : जिल्हा परिषद सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सातारा, सांगली आणि कोल्हापूर या जिल्ह्यांतील भाजपा पदाधिकाऱ्यांची महत्त्वपूर्ण बैठक कराड येथे संपन्न झाली. या बैठकीत पक्षातर्फे आगामी निवडणुकीची रणनीती निश्चित करण्यात आली.
मोदी सरकारने आणि भाजपा-महायुती सरकारने घेतलेले लोकहितकारी निर्णय तळागाळातील शेवटच्या माणसापर्यंत पोहोचवा, असे यावेळी भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी कार्यकर्त्यांना आवाहन केले. नगरपरिषद, नगरपंचायत, महानगरपालिका यानंतर आता जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत देखील सर्वाधिक संख्येने कमळ फुलेल, असा विश्वास चव्हाण यांनी यावेळी व्यक्त केला.

याप्रसंगी आमदार गोपीचंद पडळकर, भाजपा प्रदेश महामंत्री राजेश पांडे, माजी आमदार सुरेश हळवणकर, विभागीय संघटक मकरंद देशपांडे, पदाधिकारी विक्रम पावसकर, भाजपा सांगली जिल्हाध्यक्ष सम्राट महाडिक यांच्यासह अन्य मान्यवर, इतर पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

