महाराष्ट्र राज्य
श्रीनगर येथील लाल चौकातील गणेशोत्सव मंडळास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट
जम्मू काश्मीरवरची सर्व प्रकारची विघ्ने दूर होऊ दे! – मुख्यमंत्र्यांची प्रार्थना श्रीनगर, दि. 18 : काश्मीरच्या दोन दिवसाच्या दौऱ्यावर आलेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज श्रीनगर येथील लाल चौकातील गणेशोत्सव मंडळाला भेट दिली. येथील स्थानिक मराठी सोनार समाजामार्फत गेल्या 24 वर्षांपासून येथे सार्वजनिक गणेशोत्सव साजरा केला जातो. मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी मंडळास गणेशमूर्ती भेट दिली.
‘ऑपरेशन विजय’ मधील शहिदांचा पराक्रम ऊर्जा आणि प्रेरणादायी – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
कारागिलमधील द्रास युद्ध स्मारकाला मुख्यमंत्र्यांची भेट; शहिदांच्या स्मृतीस अभिवादन मुंबई, दि. 18 : द्रास येथील युद्ध स्मारकाला भेट दिल्यावर आणि आपल्या शूर सैनिकांच्या पराक्रमाची गाथा जाणून घेतल्यानंतर खूप अभिमान वाटला. द्रास युद्ध स्मारकाला दिलेली भेट प्रेरणादायी आणि ऊर्जा देणारी असून देशभक्तीची भावना अधिक वृद्धिंगत करणारी आहे, या शब्दात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या भावना व्यक्त
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून गणेशोत्सवाच्या शुभेच्छा
महाराष्ट्र सुजलाम्, सुफलाम समृद्ध व्हावा,गणरायांना साकडे; बाप्पांकडून सकारात्मक, नवनिर्मितीची प्रेरणा घेऊया ! मुंबई, दि. १८ :- श्री गणेशाचं आगमन आपल्या सर्वांसाठी आशीर्वादच ठरेल. बाप्पांच्या कृपाछत्रामुळे महाराष्ट्र सुजलाम्, सुफलाम आणि समृद्ध व्हावा, असे साकडे घालत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी श्री गणेश आगमनाच्या पुर्वसंध्येला राज्यातीलच नव्हे, तर जगभरातील गणेश भक्तांना शुभेच्छा दिल्या आहेत. शुभेच्छा संदेशात मुख्यमंत्री शिंदे
पंतप्रधानांनी मराठवाडा मुक्ती दिनाच्या नागरिकांना दिल्या शुभेच्छा
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नागरिकांना मराठवाडा मुक्ती दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. स्वातंत्र्यलढ्यात प्राणांची आहुती देणाऱ्या हुतात्म्यांचा अदम्य ध्यास आणि शौर्याचेही त्यांनी स्मरण केले आहे. X समाज माध्यमावर पोस्ट केलेल्या संदेशात पंतप्रधान म्हणाले : “मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाच्या शुभेच्छा. मराठवाडा मुक्तिसंग्रामामध्ये आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या सर्वांच्या स्वातंत्र्यप्राप्तीच्या अदम्य ध्यासाचे आणि शौर्याचे स्मरण करतो. या भूमीसोबत आणि येथील
राष्ट्रउभारणीच्या कार्यात प्रसार माध्यमांची भूमिका महत्वाची असून त्यांच्यामध्ये वैचारिक मंथन
बारामतीच्या माध्यम संवाद परिषदेत उमटला सूर बारामती, १७ सप्टेंबर २०२३ : विश्व संवाद केंद्र, पुणे आणि तुळजाराम चतुरचंद महाविद्यालय, बारामती यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित माध्यम संवाद परिषद मोठ्या उत्साहात पार पडली. या कार्यक्रमासाठी जगद्गुरु तुकाराम महाराज यांचे ११ वे वंशज ह.भ. प. शिरीष महाराज मोरे, अनेकान्त एज्युकेशन सोसायटीचे राहुलशेठ वाघोलीकर, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते दिपकजी पेशवे
मराठा आरक्षणासाठी सरकार कटिबद्ध – मुख्यमंत्री
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीनंतर मनोज जरांगे यांचे आमरण उपोषण सुटले जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी उपोषणास बसलेल्या मनोज जरांगे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत सरबत घेऊन उपोषण सोडले. याबाबत मुख्यमंत्र्यांनी सर्वांना धन्यवाद दिले. यावेळी केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे, महसूल मंत्री राधाकृष्ण विखे- पाटील, ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन, उद्योग मंत्री उदय
ओबीसींच्या आरक्षणासाठी राष्ट्रवादीच्या देशमुखांचा मोर्चा
राज्यात सध्या सुरू असलेल्या आरक्षणाच्या मुद्द्याचा राजकीय फायदा सर्वच राजकीय पक्ष उठवू पाहात आहेत. ओबीसी, मराठा, धनगर, कुणबी अशा विविध समाजघटकांनी आरक्षणासाठी मोर्चे काढायला सुरुवात केली आहे. हजारोंनी समाजबांधव रस्त्यावर उतरत आहेत. स्वाभाविकच याचा राजकीय फायदा घेण्यासाठी राजकीय पक्षांनीही बाह्या सरसावलेल्या दिसत आहेत. वर्धा जिल्ह्यातील समुद्रपूर येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा एल्गार मोर्चा आयोजित करण्यात आला
टिकणारे आरक्षण देण्यासाठी सरकारला हवा वेळ : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
जालना जिल्ह्यात मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे यांच्या सुरु असलेल्या आंदोलनासंदर्भात आज सर्वपक्षीय बैठक मुंबईतील सह्याद्री अतिथीगृहात पार पडली. या बैठकीला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, राधाकृष्ण विखे पाटील, छगन भुजबळ, गिरीश महाजन, दादाजी भुसे, विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे, विधानसभेतील विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार, विविध पक्षांचे निमंत्रित संभाजीराजे छत्रपती, जयंत पाटील,
मराठा आरक्षणासाठी सर्वपक्षीय बैठकीस प्रारंभ
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली मराठा आरक्षणविषयक सर्वपक्षीय बैठकीस सह्याद्री अतिथीगृह येथे प्रारंभ झाला. या बैठकीला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री सर्वश्री राधाकृष्ण विखे पाटील, छगन भुजबळ, गिरीश महाजन, दादाजी भुसे, विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे, विधानसभेतील विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार, विविध पक्षांचे निमंत्रित सर्वश्री संभाजीराजे छत्रपती, जयंत पाटील, बाळासाहेब
राज्यावरचे संकट दूर होऊन राज्य सुजलाम् सुफलाम् होऊ दे; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भीमाशंकराकडे प्रार्थना
बळीराजावरचे संकट दूर कर, राज्यभर समाधानकारक पाऊस पडू दे – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भीमाशंकराकडे प्रार्थना पुणे : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी श्री क्षेत्र भीमाशंकर मंदिरात ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेऊन विधिवत पूजा केली. बळीराजावरचे संकट दूर कर, राज्यभर समाधानकारक पाऊस पडू दे. राज्यावरचे संकट दूर होऊन राज्य सुजलाम् सुफलाम् होऊ दे; राज्यातील सर्व घटकांना सुख, समाधान