महाराष्ट्र राज्य
सौरऊर्जेच्या माध्यमातून दिवसा वीज उपलब्ध करुन देण्याचा राज्यशासनाचा प्रयत्न- उपमुख्यमंत्री अजित पवार
बारामती, दि.१६ : राज्यात पीएम-सूर्य घर: मोफत वीज योजना, मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना, मुख्यमंत्री सौरकृषी वाहिनी योजना या योजनांची प्रभावी अंमलबजावणी करुन सौरऊर्जेच्या माध्यमातून वीजनिमिर्तीवर भर देण्यात येत आहे, आगामी काळात नागरिकांच्या वीज देयकात बचत करण्याच्यादृष्टीने दिवसा वीज उपलब्ध करुन देण्यास राज्यशासन प्रयत्नशील आहे, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी
मुख्यमंत्र्यांनी मांडला शहर विकासाचा रोडमॅप
विकासाचे ग्रोथ इंजिन म्हणून शहर विकासाला शासनाचे प्राधान्य : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुणे, दि. १५ : विकासाचे ग्रोथ इंजिन म्हणून शहर विकासाला केंद्र आणि राज्यशासन प्राधान्य देत असून गेल्या १० वर्षात नागरीकरणासाठी मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करण्यात आली आहे. शहरी भागातील नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी, त्यांना उत्तम सुविधा देण्यासाठी चांगल्या योजना राबविल्यास राज्य शासनातर्फे स्थानिक स्वराज्य संस्थांना
येत्या वर्षभरात बाराशे सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करणार : आशिष शेलार
छत्रपती संभाजी महाराज जयंती निमित्त ‘जयतु शंभू’ या सांस्कृतिक कार्यक्रमाचे सासवड येथे उद्घाटन पुणे, दि. १४ : येत्या ३६५ दिवसात महाराष्ट्राची कला संस्कृती, नाट्य संस्कृती लोककला, लोकसंगीत, महान विभूतींना अभिवादन आदींचे १ हजार २०० कार्यक्रम आयोजित करण्याचा निर्णय सांस्कृतिक कार्य विभागाने घेतला आहे, असे प्रतिपादन राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार यांनी केले. धर्मवीर
पुरंदर किल्ल्यावरील छत्रपती संभाजी महाराजांच्या जन्मस्थळाचे संवर्धन व पुनर्बांधणी
पुरंदर किल्ल्यावरील छत्रपती संभाजी महाराजांच्या जन्मस्थळाचे संवर्धन व पुनर्बांधणीसाठी प्रयत्न करू सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशिष शेलार यांची घोषणा पुणे, दि. १४ : पुरंदर किल्ल्यावरील माची आणि छत्रपती संभाजी महाराजांचा जन्म झालेल्या वाड्यांच्या भिंतीची पुनर्बांधणी, संवर्धन आणि जतनाच्या अनुषंगाने लष्कराशी चर्चा करून सकारात्मक प्रयत्न करू, अशी ग्वाही राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशिष शेलार यांनी दिली. किल्ले
जगाला हेवा वाटेल असे ज्ञानपीठ आळंदीत उभारणार- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
पुणे, दि. १० : प्राचीन भागवत धर्मातील सनातन आणि कल्याणकारी विचार जगभरात पोहोचविण्यासाठी आळंदी येथे साडेचारशे एकर जागेत जगाला हेवा वाटेल असे संत ज्ञानेश्वर महाराज ज्ञानपीठ उभारण्यात येईल, अशी घोषणा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. आळंदी येथे संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज सप्तशतकोत्तर सुवर्ण महोत्सवी जन्मोत्सव सोहळ्यात ते बोलत होते. कार्यक्रमाला ह.भ.प. मारुती महाराज कुरेकर, आमदार
महाराष्ट्र देशातील पहिले बेघरमुक्त राज्य करण्यासाठी प्रयत्न करा : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
ग्रामविकास व पंचायतराज विभागाच्या कार्यशाळेत मुख्यमंत्र्यांचा अधिकाऱ्यांशी संवाद मनुष्यबळाचे योग्य व्यवस्थापन आणि तंत्रज्ञानाचा अधिक वापर करण्याचे आवाहन पुणे, दि. २६: प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत ग्रामविकास विभागाने उत्तम कामगिरी केली असून केंद्राकडून आणखी १० लाख घरांना मान्यता मिळणार आहे. घर मंजूर झाल्यावर जमीन उपलब्ध करून देण्यासाठी मोहीम स्तरावर काम करण्यासह एकही व्यक्ती बेघर राहणार नाही यासाठी प्रयत्न
गोळवलकर गुरुजी विद्यालयात सौर ऊर्जा प्रकल्पाचे उद्घाटन
पुणे, दि. ३ एप्रिल : येथील डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या माधव सदाशिव गोळवलकर गुरुजी विद्यालयात आज (३ एप्रिल २०२५ ) सौर ऊर्जा प्रकल्पाचे उद्घाटन डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे कार्यवाह डॉक्टर आनंद काटीकर यांच्या हस्ते करण्यात आलं. आजच्या विद्यार्थ्यांनी विज्ञाननिष्ठ दृष्टीकोन स्वतःमध्ये रुजवून आणि जिज्ञासू वृत्ती जोपासून प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा ध्यास घेतला पाहिजे असं प्रतिपादन डॉक्टर आनंद काटीकर
कर्तृत्वाचा आदर्श म्हणून पुण्यश्लोक देवी अहिल्याबाईंकडे पाहता येते : चंदाताई साठ्ये
पुणे, दि. ११ एप्रिल : पुण्यश्लोक अहिल्यादेवींचे काम म्हणजे आपल्या सगळ्यांच्याच आऊट ऑफ कव्हरेज आहे इतके प्रचंड काम त्यांनी केले आहे. रयतेच्या प्रती असलेली तिची निष्ठाच त्यांना अहर्निश असे लोक कल्याणकारी कार्य करण्यास प्रवृत्त करती झाली असे मत राष्ट्र सेविका समितीच्या अखिल भारतीय महिला समन्वय सहसंयोजिका चंदाताई साठये यांनी व्यक्त केले. शक्ति स्थापना दिनाच्या निमित्ताने
पौराणिक काळात हनुमान आणि आधुनिक काळात शिवाजी महाराज हे आपले आदर्श : सरसंघचालक
नागपूर, २ एप्रिल : छत्रपती शिवाजी महाराज संपूर्ण भारतवर्षात शाश्वत विजयाचे प्रेरणास्त्रोत आहेत. शिवचरित्राच्या अध्ययनाने आपले त्यांच्याशी ऋणानुबंध जोडले जातात. शिवचरित्र सतत संघर्षाची प्रेरणा देते. म्हणूनच त्यांना युगंधर, युगप्रवर्तक आणि युगपुरूष म्हटले जाते. एक व्यक्ती आणि राजाच्या रुपातील त्यांचे चरित्र म्हणूनच अनुकरणीय आहे अशा शब्दांत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा
वढू व तुळापूर बलिदान स्थळाला तीर्थक्षेत्राचा दर्जा देण्यात येणार : एकनाथ शिंदे
धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज पुण्यतिथीनिमित्त उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून वढू येथे समाधी पूजन पुणे, दि. २९ : छत्रपती संभाजी महाराज यांचे कार्य प्रेरणा देणारे असून पुढील अनेक पिढ्यांना स्फूर्ती आणि ऊर्जा देणाऱ्या त्यांच्या वढू येथील समाधी स्थळ व तुळापूर येथील बलिदान स्थळाला पर्यटन क्षेत्र नव्हे तर तीर्थक्षेत्राचाच दर्जा देण्यात येईल, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

