महाराष्ट्र राज्य
जगाला हेवा वाटेल असे ज्ञानपीठ आळंदीत उभारणार- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
पुणे, दि. १० : प्राचीन भागवत धर्मातील सनातन आणि कल्याणकारी विचार जगभरात पोहोचविण्यासाठी आळंदी येथे साडेचारशे एकर जागेत जगाला हेवा वाटेल असे संत ज्ञानेश्वर महाराज ज्ञानपीठ उभारण्यात येईल, अशी घोषणा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. आळंदी येथे संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज सप्तशतकोत्तर सुवर्ण महोत्सवी जन्मोत्सव सोहळ्यात ते बोलत होते. कार्यक्रमाला ह.भ.प. मारुती महाराज कुरेकर, आमदार
महाराष्ट्र देशातील पहिले बेघरमुक्त राज्य करण्यासाठी प्रयत्न करा : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
ग्रामविकास व पंचायतराज विभागाच्या कार्यशाळेत मुख्यमंत्र्यांचा अधिकाऱ्यांशी संवाद मनुष्यबळाचे योग्य व्यवस्थापन आणि तंत्रज्ञानाचा अधिक वापर करण्याचे आवाहन पुणे, दि. २६: प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत ग्रामविकास विभागाने उत्तम कामगिरी केली असून केंद्राकडून आणखी १० लाख घरांना मान्यता मिळणार आहे. घर मंजूर झाल्यावर जमीन उपलब्ध करून देण्यासाठी मोहीम स्तरावर काम करण्यासह एकही व्यक्ती बेघर राहणार नाही यासाठी प्रयत्न
गोळवलकर गुरुजी विद्यालयात सौर ऊर्जा प्रकल्पाचे उद्घाटन
पुणे, दि. ३ एप्रिल : येथील डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या माधव सदाशिव गोळवलकर गुरुजी विद्यालयात आज (३ एप्रिल २०२५ ) सौर ऊर्जा प्रकल्पाचे उद्घाटन डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे कार्यवाह डॉक्टर आनंद काटीकर यांच्या हस्ते करण्यात आलं. आजच्या विद्यार्थ्यांनी विज्ञाननिष्ठ दृष्टीकोन स्वतःमध्ये रुजवून आणि जिज्ञासू वृत्ती जोपासून प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा ध्यास घेतला पाहिजे असं प्रतिपादन डॉक्टर आनंद काटीकर
कर्तृत्वाचा आदर्श म्हणून पुण्यश्लोक देवी अहिल्याबाईंकडे पाहता येते : चंदाताई साठ्ये
पुणे, दि. ११ एप्रिल : पुण्यश्लोक अहिल्यादेवींचे काम म्हणजे आपल्या सगळ्यांच्याच आऊट ऑफ कव्हरेज आहे इतके प्रचंड काम त्यांनी केले आहे. रयतेच्या प्रती असलेली तिची निष्ठाच त्यांना अहर्निश असे लोक कल्याणकारी कार्य करण्यास प्रवृत्त करती झाली असे मत राष्ट्र सेविका समितीच्या अखिल भारतीय महिला समन्वय सहसंयोजिका चंदाताई साठये यांनी व्यक्त केले. शक्ति स्थापना दिनाच्या निमित्ताने
पौराणिक काळात हनुमान आणि आधुनिक काळात शिवाजी महाराज हे आपले आदर्श : सरसंघचालक
नागपूर, २ एप्रिल : छत्रपती शिवाजी महाराज संपूर्ण भारतवर्षात शाश्वत विजयाचे प्रेरणास्त्रोत आहेत. शिवचरित्राच्या अध्ययनाने आपले त्यांच्याशी ऋणानुबंध जोडले जातात. शिवचरित्र सतत संघर्षाची प्रेरणा देते. म्हणूनच त्यांना युगंधर, युगप्रवर्तक आणि युगपुरूष म्हटले जाते. एक व्यक्ती आणि राजाच्या रुपातील त्यांचे चरित्र म्हणूनच अनुकरणीय आहे अशा शब्दांत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा
वढू व तुळापूर बलिदान स्थळाला तीर्थक्षेत्राचा दर्जा देण्यात येणार : एकनाथ शिंदे
धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज पुण्यतिथीनिमित्त उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून वढू येथे समाधी पूजन पुणे, दि. २९ : छत्रपती संभाजी महाराज यांचे कार्य प्रेरणा देणारे असून पुढील अनेक पिढ्यांना स्फूर्ती आणि ऊर्जा देणाऱ्या त्यांच्या वढू येथील समाधी स्थळ व तुळापूर येथील बलिदान स्थळाला पर्यटन क्षेत्र नव्हे तर तीर्थक्षेत्राचाच दर्जा देण्यात येईल, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
शताब्दीनिमित्त पंचपरिवर्तनासाठी संघ कटिबद्ध : नाना जाधव
शताब्दी पर्वात देशभरात एक कोटींहून अधिक संघ कार्यकर्ते होणार सहभागी देशभरात एकूण सव्वा लाखांहून अधिक शाखा मंडलांमधील संघ विस्तारात ६७ टक्क्यांची वाढ संघ स्वयंसेवक समाजसेवा, कामगार संघटना, शेतकऱ्यांसह समाजातील विविध घटक कार्यरत पुणे, दि. २४ : राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यावर्षी विजयादशमीला शंभर वर्षे पूर्ण करत आहे. शताब्दी वर्षात संघ कार्याचा विस्तार व समाज परिवर्तन यावर
शांतता व संयम पाळत धार्मिक सण साजरे करा : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मुंबई, दि. १८ : महाराष्ट्र हे ‘प्रगतिशील राज्य’ असून या ठिकाणी जातीभेदाला थारा नाही. नागपूर शहरामध्ये १७ मार्च रोजी राज्याची सामाजिक घडी विस्कटणारी घटना घडली. या घटनेमुळे राज्याच्या शांततेला धक्का बसला. सध्या सर्वधर्मियांचे सण सुरू आहेत. नागरिकांनी संयम बाळगून शांतता राखत हे सण साजरे करावेत, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत नागपूर घटनेवर आधारित
औरंगजेबाची कबर ताबडतोब हटवावी; विहिंप आणि बजरंग दलाची मागणी
पुणे, दि. १५ मार्च : शिवछत्रपींच्या हिंदवी स्वराज्याचा शत्रू, छत्रपती शंभू महाराजांची हत्या करणाऱ्या औरंगजेबाची कबर महाराष्ट्र शासनाने तातडीने हटवावी अशी मागणी आज विश्व हिंदू परिषद व बजरंग दलामार्फत करण्यात आली. विश्व हिंदू परिषद व बजरंग दलातर्फे आज पुण्यात पत्रकार परिषद घेण्यात आली. परिषदेचे प्रांत मंत्री किशोर चव्हाण, बजरंग दलाचे प्रांत संयोजक नितीन महाजन यांच्यासह
आंबेडकर, सावरकर व अण्णा भाऊ साठे हे आंतरराष्ट्रीय किर्तीचे नेते : पद्मश्री दादा इदाते
निगडी (पुणे), दि. १० मार्च : “स्वातंत्र्यवीर सावरकर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर व अण्णा भाऊ साठे हे आंतरराष्ट्रीय किर्तीचे नेते होते. स्वातंत्र्यवीर सावरकरांवर भारतीय स्वातंत्र्य चळवळीसाठी इंग्लंडमधून भारतात पिस्तुल पाठवल्या प्रकरणी त्यांना इंग्लंड मधून अटक करुन भारतात समुद्रामार्गे आणत असताना सावरकरांनी फ्रान्सजवळ बोटीतून समुद्रात उडी मारुन फ्रान्सच्या हद्दीत जाण्याचा प्रयत्न केला. पण ब्रिटीश पोलिसांनी त्यांना पकडले.

