बातम्या
पंतप्रधानांनी गोव्यामध्ये केले 37व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांचे उद्घाटन
नवी दिल्ली, 26 ऑक्टोबर 2023 : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज गोव्यामध्ये मडगाव येथे पंडित जवाहरलाल नेहरू स्टेडियममध्ये 37 व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांचे उद्घाटन केले. 26 ऑक्टोबर ते नऊ नोव्हेंबर या कालावधीत या क्रीडा स्पर्धा होणार असून यामध्ये 28 स्थानांवर होणाऱ्या 43 क्रीडा प्रकारांमध्ये देशभरातील दहा हजार पेक्षा जास्त खेळाडू सहभागी होतील. यावेळी उपस्थितांना संबोधित
अमृत भारत, वंदे भारत आणि नमो भारत ही त्रिसूत्री आधुनिक रेल्वेचे प्रतीक – पंतप्रधान
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज उत्तर प्रदेशात गाझियाबाद येथे दिल्ली-गाझियाबाद-मीरत आरआरटीएस मार्गिकेच्या प्राधान्यक्रम टप्प्याचे उद्घाटन केले. त्यांनी याच कार्यक्रमात भारतातील प्रादेशिक वेगवान स्थानांतरण यंत्रणेचा (आरआरटीएस)प्रारंभ करताना साहिबाबाद ते दुहाई डेपोदरम्यान धावणाऱ्या नमो भारत रॅपिडएक्स गाडीला झेंडा दाखवून रवाना देखील केले. तसेच पंतप्रधानांनी यावेळी बेंगळूरू मेट्रो सेवेच्या पूर्व-पश्चिम मार्गीकेतील दोन टप्प्यांचे लोकार्पण केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी
समलिंगी विवाहाला कायदेशीर मान्यता नाकारली, ५ न्यायाधीशांच्या खंडपीठाचा निर्णय
सर्वोच्च न्यायालयाने आज समलैंगिक विवाहांना कायदेशीर मान्यता देण्यास नकार दिला आहे. पाच न्यायाधीशांच्या खंडपीठासमोर झालेल्या सुनावणीत हा निकाल सुनावण्यात आला. समलिंगी विवाहाला कायदेशीर मान्यता देण्याबाबत पाच न्यायाधीशांच्या खंडपीठाच्या निर्णयाचे प्रमुख निष्कर्ष:- १. समलिंगी विवाहाला कायदेशीर मान्यता नाही. २. सरकारने समलिंगी जोडप्यांच्या (सामायिक बँक खाते, वैद्यकीय गरजा, पेन्शनमधील नॉमिनी इ.) यांच्या चिंतांवर विचार करण्यासाठी एक समिती
७५ वर्षांत प्रथमच… काश्मिरात ऐतिहासिक शारदा मंदिरात नवरात्र पूजा
काश्मीरच्या ऐतिहासिक शारदा मंदिरात वर्ष 1947 पासून यावर्षी प्रथमच नवरात्रीची पूजा होत आहे याला फार मोठे अध्यात्मिक महत्त्व आहे – केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांचे प्रतिपादन नवी दिल्ली, 16 ऑक्टोबर 2023 : केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांनी सांगितलं 1947 पासून यावर्षी पहिल्यांदाच काश्मीरच्या शारदा मंदिरात होत असलेल्या नवरात्रीच्या
५४ व्या ‘इफ्फी’साठी नोंदणी सुरु
भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव अर्थात इफ्फी या महोत्सवासाठी सर्व प्रकारची नोंदणी सुरू झाली आहे. प्रेक्षक, विद्यार्थी, पत्रकार, चित्रपट निर्माते अशा सर्वच प्रकारांतील लोकांनी ऑनलाईन पद्धतीने ही नोंदणी करण्यासाठी इफ्फीच्या संकेतस्थळावर सुरुवात झाली आहे. हा महोत्सव भारत आणि जगभरातील समकालीन आणि क्लासिक चित्रपटांमधील उत्कृष्ट चित्रपट प्रदर्शनांसाठीचा भव्य सोहळा आहे. इफ्फी-५४ मधील माध्यम प्रतिनिधींना जगातील सर्वोत्तम चित्रपट
देशभरातून भारतरत्न नानाजी देशमुख यांना वाहिली गेली आदरांजली
पंतप्रधानांनी, भारतरत्न नानाजी देशमुख यांना जयंतीनिमित्त वाहिली आदरांजली आपले संपूर्ण आयुष्य देशासाठी व समाजासाठी अर्पित करणाऱ्या ज्येष्ठ समाजसेवक नानाजी देशमुख यांची आज जयंती. यानिमित्त देशभरातून त्यांना आदरांजली वाहण्यात आली. त्यांचे स्मरण करण्यात आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतरत्न नानाजी देशमुख यांना त्यांच्या जयंतीनिमित्त आदरांजली वाहिली आहे. नानाजी देशमुख यांनी आपले जीवन देशातील गावे आणि आदिवासी
भारत-फ्रान्स डिजिटल तंत्रज्ञान सहकार्य वाढणार
भारत आणि फ्रान्स यांच्यातील डिजिटल तंत्रज्ञान क्षेत्रातील सहकार्याबाबतच्या सामंजस्य कराराला केंद्रीय मंत्रिमंडळाने दिली मंजुरी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील केंद्रीय मंत्रिमंडळाने भारतीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय आणि फ्रेंच प्रजासत्ताकाचे अर्थव्यवस्था, वित्त आणि औद्योगिक आणि डिजिटल सार्वभौमत्व मंत्रालय यांच्यातील डिजिटल क्षेत्रातील तंत्रज्ञानाच्या सहकार्यावरील सामंजस्य करारावर स्वाक्षरी करण्यास मान्यता दिली आहे. अधिक तपशील या सामंजस्य कराराचा
भारताचा ऑस्ट्रेलियाविरुद्ध दणदणीत विजय, विश्वचषकात दिली विजयी सलामी
विश्वचषक क्रिकेट सामन्यात यजमान भारताने आज ऑस्ट्रेलियाचा दणदणीत पराभव केला. भारताचा आज विश्वचषकातील पहिलाच सामना होत. ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करत निर्धारित ५० षटकांत केवळ १९९ धावा केल्या. रवींद्र जडेजा याने ३ बाद केले तर जस्मित बुमराह व कुलदीप यादव यांनी प्रत्येकी २ फलंदाज बाद केले. भारतीय संघासाठी हे आव्हान खूपच सोपे ठरले व ४१ षटकं
पंतप्रधानांच्या ‘मन की बात’ या कार्यक्रमाची 9 वर्षे पूर्ण
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी,‘मन की बात’ या आपल्या मासिक रेडीओ कार्यक्रमाला आज 9 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्ताने मन की बात मध्ये समाविष्ट असलेल्या काही महत्वपूर्ण संकल्पना आणि त्यांचा सामाजिक परिणाम यावर प्रकाश टाकणारा अभ्यास सामायिक केला आहे. स्टेट बँक ऑफ इंडिया आणि आयआयएम बेंगळुरू यांनी केलेल्या संशोधन कार्यात पंतप्रधानांच्या मन की बात या कार्यक्रमाच्या 105 भागांच्या
स्वच्छता अभियान केवळ कागदावर न राहता प्रत्यक्षात अंमलबजावणी व्हावी – मुख्यमंत्री
राज्यात ‘मुख्यमंत्री सक्षम शहर स्पर्धा’ आणि ‘मुख्यमंत्री सक्षम वॉर्ड स्पर्धा’ मुंबई, दि. २६: स्वच्छता अभियान ही ‘लोकचळवळ’ झाली पाहिजे, हे अभियान केवळ कागदावर न राहता त्याची प्रत्यक्षात अंमलबजावणी झाली पाहिजे असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले आहे. गांधी जयंतीच्या आदल्या दिवशी १ ऑक्टोबर रोजी प्रत्येकाने आपला एक तास स्वच्छतेसाठी द्यावा या राज्य सरकारच्या उपक्रमाचा

