गलवान चकमकीनंतरही चीनने दोनदा केला होता हल्ल्याचा प्रयत्न

जून २०२० मध्ये गलवान खोऱ्यात भारत व चीन यांच्यात झालेल्या संघर्षानंतरही तब्बल दोन वेळा चीनने भारतावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला होता. परंतु जागरूक भारतीय सैन्याने तो प्रयत्न हाणून पाडला आणि आपल्या सीमेचे रक्षण केले. नुकताच झालेल्या एका सैन्याच्या पुरस्कार वितरण सोहळ्यामध्ये ही बाब समोर आली. अर्थात याबाबत सैन्य अथवा संरक्षण मंत्रालयाकडून कोणतेही स्पष्टीकरण देण्यात आलेले

Read More

मुख्यमंत्र्यांचे झ्युरिकमध्ये जोरदार स्वागत, दावोस परिषदेसाठी मुख्यमंत्री दाखल

झुरीकमध्ये मुख्यमंत्री शिंदे यांचे मराठी बांधवाकडून उत्साही स्वागत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नुकताच स्वित्झर्लंडमधील दावोस येथे दाखल झाले आहेत. जागतिक आर्थिक परिषद २०२४ ची गुंतवणूक परिषद स्वित्झर्लंडच्या दावोस येथे आजपासून सुरु झाली आहे. या परिषदेमध्ये सहभागी होण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सध्या परदेश दौऱ्यावर आहेत. स्वित्झर्लंडमध्ये त्यांचे आगमन होताच तेथील भारतीयांनी त्यांचे जंगी स्वागत केले. भल्या

Read More

सुशासनाचे सर्वोच्च प्रतीक म्हणजे प्रभू श्रीराम : नरेंद्र मोदी

समाजजीवनातील सुशासनाचे सर्वोच्च प्रतीक म्हणजे प्रभू  श्रीराम आहेत; त्यांचे जीवन, प्रेरणा आणि श्रद्धा यांची व्याप्ती भक्तीच्या पलिकडे आहे असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. पंतप्रधान आज आंध्रप्रदेशच्या दौऱ्यावर होते. लेपाक्षी येथील वीरभद्र मंदिरात त्यांनी देवाचे दर्शन घेतले. त्यानंतर त्यांनी नॅशनल अकॅडमी ऑफ कस्टम्स, इनडायरेक्ट टॅक्सेस अँड नार्कोटिक्स अर्थात एनएसीआयएनचे उद्घाटन केले. त्यावेळी उपस्थितांना संबोधित

Read More

रश्मी शुक्ला यांची महाराष्ट्राच्या पोलीस महासंचालक पदी नियुक्ती

मुंबई, ४ जानेवारी – आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांची महाराष्ट्राच्या पोलीस महासंचालक आणि महानिरिक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. यामुळे त्या महाराष्ट्राच्या पहिल्या महिला पोलीस महासंचालक होणार आहेत. फोन टॅपिंग प्रकरणामुळे त्या गेल्या दोन वर्षांत चर्चेत आल्या होत्या. याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हाही दाखल झाला होता. मात्र नंतर ते गुन्हे रद्द करण्यात आले होते. राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री

Read More

गृहमंत्र्यांनी घेतला जम्मू-काश्मीरमधील सुरक्षा स्थितीचा आढावा

नवी दिल्ली, ३ जानेवारी – जम्मू-काश्मीर हा केंद्रशासित प्रदेश झालेला असला तरीही नुकत्याच झालेल्या दहशतवादी कारवायाच्या पार्श्वभूमीवर अधिक सजगपणे कारवाई करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केले. जम्मू-काश्मीरमधील सुरक्षा परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी त्यांनी काल बैठक घेतली त्यावेळी ते बोलत होते. दहशतवाद्यांच्या संपूर्ण इको सिस्टीमचे कंबरडे मोडण्यासाठी सर्व त्या मार्गांचा अवलंब करून कठोर

Read More

शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी कीर्तन-प्रवचनाच्या माध्यमातून प्रबोधनाचे कार्य व्हावे – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

ठाणे, दि. 2 :- शासनाने शेतकऱ्यांसाठी बनविलेल्या टास्क फोर्सचे पुनर्गठन लवकरच केले जाणार आहे. विविध संत-महात्मे या राज्यात समाज प्रबोधनाचे काम करतात. राज्यातील ज्या भागात शेतकरी आत्महत्येचे प्रमाण जास्त आहे, त्या भागात आपले प्रबोधनाचे कार्य कीर्तन-प्रवचनाच्या माध्यमातून व्हावे. शेतकऱ्यांच्या मनात सकारात्मक विचार यावेत, त्यांच्यात विचार परिवर्तन व्हावे, यासाठी आपण प्रयत्न करावेत, यासाठी शासन सर्वतोपरी मदत

Read More

आपला देश आणि आपली संस्कृती नेहमीच ज्ञानाभोवती केंद्रित राहिली आहे – पंतप्रधान

पंतप्रधानांनी तामिळनाडूमधील तिरुचिरापल्ली येथील भारतीदासन विद्यापीठाच्या 38 व्या पदवीदान समारंभाला केले संबोधित नवी दिल्‍ली, २ जानेवारी २०२४ : “आपला देश आणि त्यातील नागरी संस्कृती नेहमीच ज्ञानाभोवती केंद्रित राहिली आहे. आपले तरुण विद्यार्थी ज्ञानाच्या त्या महान ऐतिहासिक परंपरेचा भाग आहेत” अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय संस्कृतीमध्ये ज्ञानाला असलेले महत्त्व अधोरेखित केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी

Read More

नववर्षाच्या पहिल्याच दिवशी गुजरातमध्ये सूर्यनमस्काराचा विश्वविक्रम

१०८ ठिकाणांवर सूर्यनमस्कार करण्याचा जागतिक विक्रम केल्याबद्दल पंतप्रधानांनी गुजरातचे केले अभिनंदन मेहसाणा, दि. १ जानेवारी : एकाच वेळी १०८ ठिकाणी ४००० पेक्षा अधिक लोकांनी सूर्यनमस्कार करण्याचा अनोखा विश्वविक्रम आज गुजरातमध्ये करण्यात आला. गुजरातमधील मेहसाणा जिल्ह्यातील मोढेरा सूर्यमंदिरासह राज्यात विविध ठिकाणी हे सूर्यनमस्कार प्रात्यक्षिक केले गेले. या उपक्रमामुळे गुजरातचे नाव गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डस् यामध्ये

Read More

कोळसा उत्पादन पोहचले ६६४.३७ दशलक्ष टनांपर्यंत

आर्थिक वर्ष २०२३-२४ दरम्यान २५ डिसेंबरपर्यंत कोळसा उत्पादन पोहचले ६६४.३७ दशलक्ष टनांपर्यंत कोळसा मंत्रालयाच्या ताज्या आकडेवारीनुसार, एप्रिल २०२३ ते २५ डिसेंबर २०२३ या आर्थिक वर्षात कोळसा उत्पादनातील एकत्रित कामगिरीने ६६४.३७ दशलक्ष टनाचा (एमटी) टप्पा गाठला आहे. गेल्या वर्षीच्या याच कालावधीतील ५९१.६४ एमटीच्या तुलनेत ही १२.२९% ची लक्षणीय वाढ दर्शवते. कोळसा पाठवण्याच्या बाबतीत, एप्रिल २०२३ ते

Read More

अयोध्येतील श्रीराम मंदिर लोकार्पण सोहळ्यानिमित्त अक्षता वितरण आणि निमंत्रण अभियान

पुणे महानगर समिती १ ते १५ जानेवारी दरम्यान ११ लाख घरी संपर्क करणार पुणे दि.२८ – अयोध्येत प्रभू श्रीरामांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा २२ जानेवारी २०२४ रोजी होते आहे. त्यानिमित्त श्रीराम जन्मभूमि तीर्थक्षेत्र न्यास, अयोध्यातर्फे पुणे महानगर समितीच्यावतीने घरोघरी जाऊन श्री रामलला प्रतिष्ठापना सोहळ्याच्या अक्षता वितरण व निमंत्रण अभियान राबविण्यात येणार आहे. १ ते १५ जानेवारी २०२४

Read More