बातम्या
जहाल नक्षलवादी वरवरा रावच्या उदात्तीकरणाचा कार्यक्रम रद्द
विवेक विचार मंचच्या हस्तक्षेपानंतर वरावरा रावच्या उदात्तीकरणाच्या कार्यक्रम रद्द मुंबई, दि. १५ ऑक्टोबर : मुंबईतील सोमय्या विद्याविहार विद्यापीठात जहाल नक्षलवादी वरवरा राव याच्या उदात्तीकरणाचा कार्यक्रम रद्द करण्यात विवेक विचार मंचाला अखेर यश आले आहे. येत्या १६ ऑक्टोबर रोजी “Civilisation Seminar Series” अंतर्गत “An Electric Wire is Better than a Poet: The Poetry of Varavara Rao”
जातीच्या चुकीच्या नोंदींमुळे होलार समाजाचे नुकसान : ॲड. एकनाथ जावीर
पुणे, दि. १३ ऑक्टोबर : अखिल भारतीय होलार समाज संघटनेच्या वतीने उद्योजकता मेळावा पद्मश्री डॉ. मिलिंद कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली लोकशाहीर अण्णा भाऊ साठे सभागृहात संपन्न झाला. यावेळी मंचावर सामाजिक समरसता मंचाचे प्रांत प्रमुख डॉ. रमेश पांडव, समाज नेते ॲड. एकनाथ जावीर, संघटक ज्ञानेश्वर जावीर, राष्ट्रीय महासचिव डॉ. सुनील भंडगे आदी उपस्थित होते. डॉ. कांबळे यांच्या
शाश्वत शेतीचा अवलंब देशातील शेतकऱ्यांसाठी आदर्श ठरू शकतो – पंतप्रधान
नवी दिल्ली, दि. १२ ऑक्टोबर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १२ ऑक्टोबर रोजी नवी दिल्ली येथील भारतीय कृषी संशोधन संस्थेत आयोजित कृषी कार्यक्रमात शेतकऱ्यांशी संवाद साधला. हा कार्यक्रम शेतकऱ्यांचे कल्याण, कृषी स्वावलंबन आणि ग्रामीण पायाभूत सुविधा बळकट करण्याबाबत पंतप्रधानांच्या सातत्यपूर्ण वचनबद्धतेला अधोरेखित करतो. पंतप्रधान मोदी यांनी सार्वजनिक कार्यक्रमात सहभागी होण्यापूर्वी शेतकऱ्यांशी प्रत्यक्ष संवाद साधला. यावेळी
भारत-ब्रिटन वाढत्या भागीदारीतून एका उज्ज्वल भविष्याची निर्मिती करू – पंतप्रधान नरेंद्र मोदी
मुंबई, 9 ऑक्टोबर : भारत आणि ब्रिटन नैसर्गिक भागीदार आहेत. लोकशाही, स्वातंत्र्य आणि कायद्याचे राज्य यांसारख्या मूल्यांवरचा परस्पर सामायिक विश्वास हाच दोन्ही देशांच्या संबंधांचा पाया आहे. संरक्षण आणि सुरक्षिततेपासून शिक्षण आणि नवसंशोधनापर्यंत प्रत्येक बाबतीत भारत आणि ब्रिटन संबंधांमध्ये भर पडत आहे असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. ब्रिटनचे पंतप्रधान कीर स्टार्मर यांच्या पहिल्या
जनसुरक्षा कायद्यामुळे शहरी माओवादी कारवायांना प्रतिबंध शक्य : प्रवीण दीक्षित
पुणे, दि. ७ ऑक्टोबर : माओवादी चळवळ देशाच्या अंतर्गत सुरक्षेसमोरील सर्वात मोठे आव्हान असून या समस्येकडे राजकीय दृष्टीतून न बघता राष्ट्रीय सुरक्षेचा प्रश्न म्हणून गंभीरतेने बघायला हवे. शहरी माओवादी संघटनांच्या समाजविघातक कारवाया रोखण्यासाठी प्रस्तावित विशेष जनसुरक्षा कायदा गरजेचा असल्याचे मत माजी पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित यांनी त्यांच्या अध्यक्षीय भाषणात व्यक्त केले. पत्रकारिता विभाग, आबासाहेब गरवारे
समाज तोडण्याचे षडयंत्र ओळखा – काडसिद्धेश्वर महाराज
भारतीय विचार साधनाच्या ‘हिंदुत्व ‘ पुस्तकांचे प्रकाशन सांगली, दिनांक ९ ऑक्टोबर २०२५ : “प्रत्येक प्रांतात बहुसंख्य असणाऱ्या समाजातील जातीच्या अस्मिता जाग्या करून त्यांना हिंदू धर्मापासून तोडण्याचे षडयंत्र ओळखा” असे आवाहन श्री क्षेत्र कणेरी मठाचे प. पू. काडसिद्धेश्वर स्वामीजी यांनी केले. भारतीय विचार साधनाच्या ‘हिंदुत्व – हिंदुराष्ट्र विकासपथ’ आणि ‘हिंदुत्व – सामाजिक समरसता; जैन, बौद्ध, शीख
सहकारातून हरित ऊर्जेची क्रांती : कोपरगावात सहकारी कॉम्प्रेस्ड बायोगॅस प्रकल्प!
केंद्रीय गृह व सहकारमंत्री अमित शाह यांच्या हस्ते सहकार कॉम्प्रेस्ड बायोगॅस प्रकल्पाचे उदघाटन अहिल्यानगर, दि. ५ ऑक्टोबर : केंद्रीय गृह व सहकारमंत्री अमित शाह यांच्या हस्ते आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत आज अहिल्यानगर येथे सहकार महर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखाना लि. व संजीवनी ग्रुपद्वारे निर्मित सहकारी कॉम्प्रेस्ड बायोगॅस प्रकल्पाचे आणि स्प्रे ड्रायर
संघाच्या प्रार्थनेत मंत्राचे सामर्थ्य : सरसंघचालक
संगीत संयोजनातून स्वरबद्ध संघ प्रार्थनेच्या अभिनव ध्वनिचित्रफितीचे लोकार्पण नागपूर, दि. २७ सप्टेंबर : संघाची प्रार्थना हा संघाचा सामुहिक संकल्प आहे. १९३९ पासून प्रार्थनेतून या संकल्पाचे उच्चारण स्वयंसेवक रोज शाखेत करत असतात. इतक्या वर्षांच्या साधनेतून या प्रार्थनेला मंत्राचे सामर्थ्य लाभले आहे आणि ही केवळ सांगायची गोष्ट नसून प्रत्यक्ष अनुभवायची गोष्ट असल्याचे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक
राज्यपाल आचार्य देवव्रत यांना महाराष्ट्राच्या राज्यपालपदाची शपथ
मुंबई, दि. १५ : गुजरात राज्याचे राज्यपाल असलेले आचार्य देवव्रत यांनी आज महाराष्ट्राच्या राज्यपालपदाची शपथ घेतली. राजभवनातील दरबार हॉल येथे झालेल्या शपथविधी सोहळ्यात मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती चंद्रशेखर यांनी त्यांना राज्यपालपदाची शपथ दिली. राज्यपाल देवव्रत यांनी संस्कृत भाषेतून शपथ घेतली. शपथविधीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यपाल देवव्रत यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन
नव संशोधनासाठी उच्च व तंत्रशिक्षण देणाऱ्या संस्थेला स्वायतत्ता देणे ही काळाची गरज : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सीओईपी तंत्रज्ञान विद्यापीठाच्या ग्रंथालय व संगणक अभियांत्रिकी विभागाच्या नूतन इमारतीचे उद्घाटन सीओईपी जीवन गौरव व अभिमान पुरस्कारांचे वितरण पुणे, दि. १४ सप्टेंबर : देशातील उच्च व तंत्रशिक्षण देणाऱ्या संस्थांना नव संशोधन आणि सक्षम मनुष्यबळ निर्माण करण्यासाठी स्वायतत्ता देणे ही काळाची गरज असून त्यादृष्टीने केंद्र व राज्य पातळीवर शासनातर्फे प्रयत्न सुरू असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री

