Wednesday, December 31st, 2025

कराड येथे बंधुता परिषदेचे आयोजन

कराड, दि. ३१ डिसेंबर : दिनांक २ जानेवारी १९४० रोजी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी कराड मध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या भवानी शाखेस भेट दिली होती या ऐतिहासिक भेटीचे स्मरण करून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेला एकात्मतेचा संदेश समाजात रुजावा यासाठी त्याच ठिकाणी म्हणजे कराड शहरातील संघाच्या भवानी शाखेच्या मैदानावर बंधुता परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे.

Read More

रामलल्लांच्या प्राणप्रतिष्ठेचा दुसरा वर्धापनदिन साजरा होणार जल्लोषात

अयोध्या, १३ डिसेंबर : श्री राम जन्मभूमी तीर्थक्षेत्राच्या बैठकीत श्री रामलल्लांच्या प्राण प्रतिष्ठेच्या दुसऱ्या वर्धापन दिनी अर्थात प्रतिष्ठा द्वादशीनिमित्त अयोध्येत विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. अंगद टीला येथे त्यानिमित्त आयोजित कार्यक्रमांमध्ये राम कथा, अनुप जलोटा, सुरेश वाडकर आणि तृप्ती शाक्य यांचे भजन तसेच कथक नृत्य नाटक यांचा समावेश आहे. श्री राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र

Read More

‘एकशः सम्पत्’ पुस्तकाचे पुण्यात सुहासराव हिरेमठ यांच्या हस्ते प्रकाशन

पुणे, दि. ११ डिसेंबर : जगात वाईटाच्या तुलनेत चांगले प्रसंग असंख्य पटीने घडत असतात. पण ते लोकांपर्यंत पोहोचत नाहीत. चांगुलपणा लोकांपर्यंत पोहोचविणारी ‘एकशः सम्पत’सारखी पुस्तके मोठ्या प्रमाणावर निर्माण व्हावीत आणि समाजापर्यंत पोहोचवावीत, ही काळाची गरज आहे, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य सुहास हिरेमठ यांनी केले. प्रेरक लेखक व मुक्त पत्रकार दत्ता जोशी

Read More

महाराष्ट्र नक्षलवादमुक्तीच्या उंबरठ्यावर – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

नागपूर, दि. ११ डिसेंबर : केंद्राचे २०२६ पर्यंत देशातून नक्षलवाद निर्मूलनाचे उद्दिष्ट साध्य करण्यास महाराष्ट्र वेगाने पुढे जात असून राज्य नक्षलवादमुक्तीच्या उंबरठ्यावर असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. राज्य शासनाच्या धोरणात्मक उपक्रमांमुळे आणि पोलिसांच्या प्रयत्नांमुळे ही प्रगती शक्य होत असल्याचे ते म्हणाले. फडणवीस यांनी सांगितले की, नक्षलवाद पूर्णपणे संपवण्यासाठी अतिदुर्गम भागांत नवीन पोलीस चौक्या उभारून

Read More

पुणे महानगरातील 220 प्रकल्पांसाठी 32,523 कोटींची मंजुरी : मुख्यमंत्री फडणवीस

नागपूर, दि. ११ डिसेंबर : पुणे महानगर क्षेत्रातील 220 विकास प्रकल्पांना 32 हजार 523 कोटी रूपयांचा निधी मंजूर करण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. वाढत्या नागरीकरणाच्या पार्श्वभूमीवर शहरांना आवश्यक सुविधा देणे हे सरकारचे प्राधान्य असल्याचे त्यांनी सांगितले. रस्ते विकास आराखडा ठरवल्यानंतरच शहर विकासाची रुपरेषा अंतिम करावी, असेही त्यांनी सुचवले. मुख्यमंत्री फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली

Read More

देशातील सर्वात मोठे शिपयार्ड महाराष्ट्रात उभे राहणार

बंदरे विभागाच्या आढावा बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश नागपूर, दि. ११ डिसेंबर : राज्याचा 720 किमी समुद्रकिनारा, निर्माणाधीन वाढवण बंदर आणि सागरी क्षेत्रातील संधी लक्षात घेऊन 2026 पर्यंत देशातील सर्वात मोठे शिपयार्ड महाराष्ट्रात उभारावे, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रिमंडळ सभागृहातील बैठकीत दिले. बैठकीस मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री नितेश राणे आणि वरिष्ठ

Read More

शताब्दी वर्षात संघ सर्वस्पर्शी व्हावा : सहसरकार्यवाह अतुल लिमये

नागपूर : संघ शताब्दी वर्षात असून, संघ कार्याची आगामी दिशा काय? तर संघ सर्वस्पर्शी झाला पाहिजे, या दृष्टीने कार्य करायचे आहे. व्यक्तीनिर्माण एका दिवसात होत नाही. ही निरंतर चालणारी प्रक्रिया आहे. संघाच्या दृष्टीने वातावरण अनुकुल आहे, पण समाज परिवर्तनासाठी आचरण महत्त्वाचे आहे, असे प्रतिपादन सहसरकार्यवाह अतुल लिमये यांनी केले. आचरण सुधारत नाही, तोपर्यंत परिवर्तन स्थायी

Read More

पंचपरिवर्तनातून समाजपरिवर्तन होईल: अरविंद कुकडे

नागपूरच्या अयोध्या भागाच्या वतीने प्रमुख जनसंगोष्टी नागपूर, 7 डिसेंबर : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षाच्या निमित्ताने आयोजित प्रमुख जनसंगोष्टी कार्यक्रमात विदर्भ प्रांत सह–संपर्क प्रमुख अरविंद कुकडे यांनी समाज परिवर्तनासाठी ‘पंचपरिवर्तन’ संकल्पनेचे महत्त्व स्पष्ट केले. संघटनेच्या 100 वर्षांच्या वाटचालीत समाजातील विविध घटकांनी संघाच्या विचारधारेचा स्वीकार करून एकात्मता, संस्कार आणि राष्ट्रीय भावनेची जपणूक करतानाच पंचपरिवर्तनाचे पालन केले

Read More

भारतीय मूल्यांवर आधारित नवा भारत उभारला जाईल : सह-सरकार्यवाह अरुण कुमार

“उत्थिष्ठ भारत” प्राध्यापकीय चर्चासत्राचा समारोप संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त नागपूर, ६ डिसेंबर: भारतीय विचारांच्या प्रकाशात एक नवीन भारत उभारला जाईल. हे साध्य करण्यासाठी, भारताने स्वतःला विसरणे, स्वतःची अधोगती आणि इतरांचे अनुकरण करण्याची प्रवृत्ती यांवर मात केली पाहिजे. आत्मविश्वास, शुद्ध देशभक्ती, संघटना, शिस्त आणि स्वाभिमानाने ओतप्रोत समाज निर्माण करून राष्ट्राचे पुनरुज्जीवन होईल. नागपुरातील सिम्बायोसिस इंटरनॅशनल (अभिमत विद्यापीठ)

Read More

कार्यावरील विश्वासामुळेच संघाला भरभरून साहाय्य : शरद ढोले

धर्मजागरण विभागाच्या कार्यालयाचे पुण्यात भूमिपूजन पुणे, ४ डिसेंबर : समाजासाठी आणि देशासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यकर्ते निःस्वार्थीपणे गेली शंभर वर्षे काम करत आहेत. या कार्यामुळेच संघाबद्दल समाजामध्ये विश्वास निर्माण झाला आहे. या विश्वासामुळे समाज संघाला भरभरून साहाय्य करत आहे, असे प्रतिपादन संघाच्या अखिल भारतीय धर्मजागरण गतिविधीचे समन्वयक शरद ढोले यांनी केले. धर्मजागरण गतिविधीचे अखिल भारतीय

Read More