‘इंडिया एआय इम्पॅक्ट समिट-2026’मध्ये महिला समृध्दीचा निर्धार

महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणाला एआयची जोड मिळाल्यास त्यांचा शाश्वत विकास शक्य, विजया रहाटकर यांचा आशावाद नवी दिल्ली, दि. १६ फेब्रुवारी : आजच्या वेगाने बदलणाऱ्या तंत्रज्ञानाच्या युगात आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआय) हे केवळ एक तांत्रिक साधन नसून शिक्षण, प्रशासन आणि उद्योग क्षेत्राचा केंद्रबिंदू ठरत आहे. आगामी काळात एआयमुळे रोजगाराच्या संधी आणि स्वरूप मोठ्या प्रमाणात बदलणार असून महिलांनी या

Read More

शिवसेनेमध्ये इनकमिंग सुरूच, विविध पक्षांच्या नेते-कार्यकर्त्यांचा शिंदेंच्या उपस्थितीत पक्षप्रवेश

मुंबई, दि. १६ फेब्रुवारी : राज्यभरात सध्या कोणतेही निवडणुकीचे वातावरण नसतानाही एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेत राज्यभरातून इनकमिंग अद्याप सुरूच आहे. सामान्यपणे निवडणुकांच्या तोंडावर अशाप्रकारचे पक्षांतर पाहायला मिळते. मात्र कोणतीही निवडणूक नसतानाही हे इनकमिंग सुरूच असल्यामुळे आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. गेल्या काही दिवसांमध्ये मराठवाड्यातील विविध जिल्ह्यांतील विविध पक्षांच्ये नेते-कार्यकर्त्यांनी मुख्य नेते एकनाथ शिंदे यांच्या

Read More

मुंबई क्लायमेट वीक 2026 : हरित भविष्यासाठी जागतिक संकल्प!

मुंबई, दि. १७ फेब्रुवारी : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आणि केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांच्या प्रमुख उपस्थितीत आज मुंबई येथे ‘मुंबई क्लायमेट वीक’चे उदघाटन संपन्न झाले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले की, ‘मुंबई क्लायमेट वीक’ भारतातील पर्यावरणीय कृतीसाठी समर्पित असे पहिले व्यापक व्यासपीठ आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारताने आर्थिक विकास आणि पर्यावरणीय

Read More

भारताची वाढ ही योगायोग नसून संरचनात्मक परिवर्तनाचे फलित : देवेंद्र फडणवीस

बहुध्रुवीय जगात विश्वासाचा केंद्रबिंदू : भारत आणि महाराष्ट्र! मुंबई, दि. १७ फेब्रुवारी : जागतिक आर्थिक व्यवस्थेची नव्याने पुनर्रचना सुरू असताना भारताची वाढ ही योगायोग नसून संरचनात्मक परिवर्तनाचे फलित आहे असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री डॉ. एस. जयशंकर यांनी आज मुंबई येथे ‘ग्लोबल इकॉनॉमिक को-ऑपरेशन 2026’ च्या उदघाटन

Read More

संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी मार्गातील विसावा क्र. २ चे लोकार्पण

पालखी विसावा क्र. २, कळसगाव, दि. १६ फेब्रुवारी : वारकरी संप्रदायाचा पाया रचणारे थोर संत, संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांच्या पारंपारिक पालखी सोहळ्यातील विसावा क्रमांक २ च्या ठिकाणाचे लोकार्पण केंद्रीय राज्यमंत्री व पुण्याचे खासदार मुरलीधर मोहोळ व औसा संस्थेचे ह.भ.प. गुरुबाबा महाराज औसेकर यांच्या हस्ते करण्यात आले. आळंदी रोड येथील कळसगाव येथे हा विसावा क्रमांक २

Read More

ज्येष्ठ शेतकरी नेते शंकर अण्णा धोंडगे यांच्या हाती भगवा, एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत प्रवेश

मुंबई, दि. १६ फेब्रुवारी : नांदेड जिल्ह्यातील लोहा-कंधार विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार तथा ज्येष्ठ शेतकरी नेते शंकर अण्णा धोंडगे यांनी भगवा झेंडा हाती घेत आज आपल्या असंख्य समर्थकांसह शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला. यावेळी शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांनी त्यांचे आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचे पक्षात स्वागत केले. एकनाथ शिंदे यांच्या नंदनवन या मुंबईतील निवासस्थानी

Read More

हिंद-दी-चादर कार्यक्रमाच्या अनुषंगाने पिंपरी चिंचवड महापालिकेत बंजारा समाजाची बैठक

पिंपरी चिंचवड, दि. १५ फेब्रुवारी : श्री गुरु तेग बहादुर साहिबजी यांच्या ३५० व्या शहीदी समागम वर्षानिमित्त नवी मुंबईतील खारघर येथे आयोजित करण्यात येणाऱ्या ‘हिंद-दी-चादर’ या भव्य कार्यक्रमाच्या अनुषंगाने संत सेवालाल जयंतीचे औचित्य साधून पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्यावतीने बंजारा समाजाच्या प्रतिनिधींची बैठक आयोजित करण्यात आली होती. पिंपरी चिंचवड शहरातील सर्व समाजघटकांनी या ऐतिहासिक कार्यक्रमात मोठ्या संख्येने

Read More

संगमनेर शहरातील १४ बेकायदेशीर कत्तलखाने उध्वस्त

शिवशंकर स्वामी यांच्या अथक प्रयत्नांना आले यश संगमनेर (अहिल्यानगर), दि. १६ फेब्रुवारी : संगमनेर शहरातील बेकायदेशीर कत्तलखाने तात्काळ उध्वस्त करण्यात यावेत यासाठी अनेक दिवसांपासून गोसेवक प्रशासनाचा पाठपुरावा करत होते. त्यासाठी २८ जानेवारीपासून मानद पशुकल्याण अधिकारी शिवशंकर स्वामी यांनी सातत्याने आणि ठामपणे पाठपुरावा केला. संगमनेर नगरपरिषदेचे मुख्याधिकारी तसेच अहिल्यानगर जिल्हाधिकारी कार्यालय येथे समक्ष भेट घेऊन लेखी

Read More

राजरत्न पुरस्कार सोहळा 2026 : परंपरा, प्रतिष्ठा आणि कर्तृत्वाचा गौरव

नागपूर, १४ फेब्रुवारी : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज नागपूर येथे, श्रीमंत राजे रघुजी महाराज भोसले (प्रथम) बहुउद्देशीय स्मृती प्रतिष्ठान व महाराजा नागपूर ट्रस्टतर्फे आयोजित ‘राजरत्न पुरस्कार सोहळा – 2026’ येथे पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी पुरस्कार प्राप्त मान्यवरांचे अभिनंदन केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले, ही अतिशय आनंदाची गोष्ट आहे

Read More

हर्षवर्धन सपकाळ यांच्याविरोधात पुण्यात गुन्हा दाखल

पुणे, दि. १५ फेब्रुवारी : हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची हिंदूविरोधी टिपू सुलतान याच्याशी तुलना करून समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याबद्दल तसेच चिथावणीखोर वक्तव्य केल्याप्रकरणी दत्तवाडी पोलिस स्थानकामध्ये काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पुणे शहर भाजप अध्यक्ष नगरसेवक धीरज घाटे यांनी यासंदर्भात तक्रार दाखल केली आहे. पुणे शहर

Read More