राष्ट्रीय
आता मोदी आहे…. तुम्हाला पूर्ण भाकरी मिळेल : पंतप्रधान नरेंद्र मोदी
भारताची अर्थव्यवस्था जगातील तिसऱ्या स्थानावर नेण्याचा संकल्प – पंतप्रधान देशात ‘गरिबी हटाव’ च्या अनेकदा केवळ घोषणा देण्यात आल्या; पण गरिबी कधीच हटली नाही. ‘आर्धी भाकरी तरी खायला मिळेल’ असेही बोलले जायचे; पण का? आता मोदी आहे, तुम्हाला पूर्ण भाकरी मिळेल, गेल्या नऊ वर्षात देशातील २५ कोटी लोक गरिबीतून बाहेर आले आहेत. हे २५ कोटी लोक
सुशासनाचे सर्वोच्च प्रतीक म्हणजे प्रभू श्रीराम : नरेंद्र मोदी
समाजजीवनातील सुशासनाचे सर्वोच्च प्रतीक म्हणजे प्रभू श्रीराम आहेत; त्यांचे जीवन, प्रेरणा आणि श्रद्धा यांची व्याप्ती भक्तीच्या पलिकडे आहे असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. पंतप्रधान आज आंध्रप्रदेशच्या दौऱ्यावर होते. लेपाक्षी येथील वीरभद्र मंदिरात त्यांनी देवाचे दर्शन घेतले. त्यानंतर त्यांनी नॅशनल अकॅडमी ऑफ कस्टम्स, इनडायरेक्ट टॅक्सेस अँड नार्कोटिक्स अर्थात एनएसीआयएनचे उद्घाटन केले. त्यावेळी उपस्थितांना संबोधित
गृहमंत्र्यांनी घेतला जम्मू-काश्मीरमधील सुरक्षा स्थितीचा आढावा
नवी दिल्ली, ३ जानेवारी – जम्मू-काश्मीर हा केंद्रशासित प्रदेश झालेला असला तरीही नुकत्याच झालेल्या दहशतवादी कारवायाच्या पार्श्वभूमीवर अधिक सजगपणे कारवाई करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केले. जम्मू-काश्मीरमधील सुरक्षा परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी त्यांनी काल बैठक घेतली त्यावेळी ते बोलत होते. दहशतवाद्यांच्या संपूर्ण इको सिस्टीमचे कंबरडे मोडण्यासाठी सर्व त्या मार्गांचा अवलंब करून कठोर
आपला देश आणि आपली संस्कृती नेहमीच ज्ञानाभोवती केंद्रित राहिली आहे – पंतप्रधान
पंतप्रधानांनी तामिळनाडूमधील तिरुचिरापल्ली येथील भारतीदासन विद्यापीठाच्या 38 व्या पदवीदान समारंभाला केले संबोधित नवी दिल्ली, २ जानेवारी २०२४ : “आपला देश आणि त्यातील नागरी संस्कृती नेहमीच ज्ञानाभोवती केंद्रित राहिली आहे. आपले तरुण विद्यार्थी ज्ञानाच्या त्या महान ऐतिहासिक परंपरेचा भाग आहेत” अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय संस्कृतीमध्ये ज्ञानाला असलेले महत्त्व अधोरेखित केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी
नववर्षाच्या पहिल्याच दिवशी गुजरातमध्ये सूर्यनमस्काराचा विश्वविक्रम
१०८ ठिकाणांवर सूर्यनमस्कार करण्याचा जागतिक विक्रम केल्याबद्दल पंतप्रधानांनी गुजरातचे केले अभिनंदन मेहसाणा, दि. १ जानेवारी : एकाच वेळी १०८ ठिकाणी ४००० पेक्षा अधिक लोकांनी सूर्यनमस्कार करण्याचा अनोखा विश्वविक्रम आज गुजरातमध्ये करण्यात आला. गुजरातमधील मेहसाणा जिल्ह्यातील मोढेरा सूर्यमंदिरासह राज्यात विविध ठिकाणी हे सूर्यनमस्कार प्रात्यक्षिक केले गेले. या उपक्रमामुळे गुजरातचे नाव गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डस् यामध्ये
कोळसा उत्पादन पोहचले ६६४.३७ दशलक्ष टनांपर्यंत
आर्थिक वर्ष २०२३-२४ दरम्यान २५ डिसेंबरपर्यंत कोळसा उत्पादन पोहचले ६६४.३७ दशलक्ष टनांपर्यंत कोळसा मंत्रालयाच्या ताज्या आकडेवारीनुसार, एप्रिल २०२३ ते २५ डिसेंबर २०२३ या आर्थिक वर्षात कोळसा उत्पादनातील एकत्रित कामगिरीने ६६४.३७ दशलक्ष टनाचा (एमटी) टप्पा गाठला आहे. गेल्या वर्षीच्या याच कालावधीतील ५९१.६४ एमटीच्या तुलनेत ही १२.२९% ची लक्षणीय वाढ दर्शवते. कोळसा पाठवण्याच्या बाबतीत, एप्रिल २०२३ ते
जम्मू-काश्मीरमधील दहशतवादी कारवायांमध्ये घट
सरकारने दहशतवादाविरुद्ध शून्य सहनशीलतेचे धोरण स्वीकारले आहे. दहशतवादाचे जाळे समूळ नष्ट करण्याचे सरकारचे धोरण आहे. जम्मू आणि काश्मीरमध्ये शांतता आणि स्थैर्य कायम राखण्यासाठी सुरक्षाविषयक उपाय योजना मजबूत केल्या जात आहेत. या संदर्भात अवलंबलेल्या धोरणांमध्ये आणि केलेल्या उपाययोजनांमध्ये मोक्याच्या मध्यवर्ती ठिकाणी चोवीस तास नाके, दहशतवादी संघटनांकडून निर्माण केल्या जाणा-या आव्हानांना प्रभावीपणे सामोरे जाण्यासाठी सीएएसओ म्हणजे घेराबंदी
देशाच्या एकता व एकात्मतेबाबत कोणताही गोंधळ असता कामा नये : सुनीलजी आंबेकर
’व्यथा हिंदुस्थानच्या फाळणीची’ पुस्तकाच्या प्रकाशन समारंभात प्रतिपादन पुणे, १९ डिसेंबर : भारताची फाळणी ही जगाच्या इतिहासातील एकमेव घटना आहे. अशी घटना पुन्हा घडू नये यासाठी देशाच्या एकता व एकात्मतेबाबत कोणताही गोंधळ असता कमा नये, ही गोष्ट सर्व धर्माच्या व सर्व विचारसरणीच्या लोकांना समजावून सांगण्याची गरज आहे. इतिहासाचे विस्मरण झालेल्यांना पुन्हा पुन्हा इतिहास सांगावा लागेल, असे
मोहन यादव मध्यप्रदेशचे नवे मुख्यमंत्री, नरेंद्र सिंह तोमर विधानसभा अध्यक्ष
माध्यमांचे व राजकीय विश्लेषकांचे सर्व अंदाज उधळून लावत पुन्हा एकदा भाजपने नवीन चेहरा राज्याचे प्रमुखपद भूषविण्यासाठी दिला आहे. भाजप आमदार मोहन यादव मध्यप्रदेशचे नवे मुख्यमंत्री होणार असल्याची घोषणा नुकताच करण्यात आली आहे. त्याच बरोबर जगदीश देवडा व राजेश शुक्ला हे दोघे उपमुख्यमंत्रीपदासाठी निवडले गेले आहेत. तर केंद्रीय मंत्री व भाजप नेते नरेंद्र सिंह तोमर विधानसभा
‘आयुर्वेद फॉर वन हेल्थ’ या संदेशासह देशभरातील ११ शहरांमध्ये युवकांची बाईकर्स रॅली निघणार
१० नोव्हेंबर रोजी देशभरात ‘आयुर्वेद दिन’ साजरा होणार नवी दिल्ली येथील बाईकर्स रॅलीमध्ये २० दिव्यांग तरुण सहभागी होणार येत्या ५नोव्हेंबर २०२३ रोजी नवी दिल्ली, लखनौ, नागपूर, चेन्नई, जयपूर, पतियाळा, ग्वाल्हेर, हैदराबाद, विजयवाडा, थिरूवनंतपुरम आणि अहमदाबाद येथे या बाईकर्स रॅलीजचे आयोजन देशभरात ‘आयुर्वेद फॉर वन हेल्थ’ या संदेशाचा प्रसार करण्यासाठी देशातील ११ शहरांमध्ये देशव्यापी बाईकर्स रॅलीजचे