जगाला हेवा वाटेल असे ज्ञानपीठ आळंदीत उभारणार- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
पुणे, दि. १० : प्राचीन भागवत धर्मातील सनातन आणि कल्याणकारी विचार जगभरात पोहोचविण्यासाठी आळंदी येथे साडेचारशे एकर जागेत जगाला हेवा वाटेल असे संत ज्ञानेश्वर महाराज ज्ञानपीठ उभारण्यात येईल, अशी घोषणा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. आळंदी येथे संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज सप्तशतकोत्तर सुवर्ण महोत्सवी जन्मोत्सव सोहळ्यात ते बोलत होते. कार्यक्रमाला ह.भ.प. मारुती महाराज कुरेकर, आमदार
जगातील सर्वांत वैज्ञानिक भाषा संस्कृत : अमित शहा
संस्कृत भारतीचे कार्य खरोखरच अतुलनीय : अमित शहा नवी दिल्ली, 4 मे : अनेक प्रख्यात जागतिक विद्वानांनी संस्कृतला सर्वात वैज्ञानिक भाषा म्हणून मान्यता दिली आहे. संस्कृत ही बहुतांश भारतीय भाषांची जननी आहे, आणि तिचा प्रचार केवळ तिच्या पुनरुज्जीवनासाठीच नव्हे, तर राष्ट्राच्या एकूण प्रगतीसाठीही आवश्यक आहे. गेल्या हजारो वर्षांपासून विविध शाखांमधील विचारमंथनातून निर्माण झालेले विपुल ज्ञान
सृजनशील क्षेत्रातील ऑरेंज इकॉनॉमीला गती देण्यासाठी उद्योजकांनी भरीव योगदान द्यावे : पंतप्रधान नरेंद्र मोदी
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विविध देशांतील गुंतवणूकदारांशी संवाद सृजन क्षेत्राच्या विकासासाठीच्या भारताच्या प्रयत्नांना उद्योजकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मुंबई, दि. १ : मुंबईमध्ये सुरू असलेल्या जागतिक दृकश्राव्य मनोरंजन परिषदेमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विविध देशांमधील प्रमुख उद्योजकांशी संवाद साधला. बांद्रा-कुर्ला कॉम्प्लेक्स येथील जिओ वर्ल्ड सेंटरमधील लोटस बॉलरूममध्ये विविध देशातील प्रतिनिधींची गोलमेज बैठक झाली. यावेळी पंतप्रधान मोदी यांनी
Waves Summit 2025 चे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शानदार उद्घाटन
मुंबई, दि. १ : भारताची ऑरेंज इकॉनॉमी म्हणजे कंटेंट, क्रिएटिविटी आणि कल्चर हे तीन स्तंभ आहेत. भारताच्या क्रिएटिव्ह इकॉनॉमीचा काही वर्षांत ‘जीडीपी’मध्ये (सकल देशांतर्गत उत्पन्न) मोठा वाटा असेल. जगातील अॅनिमेशन मार्केट ४३० अब्ज डॉलरहून अधिक असून पुढील १० वर्षांत ते दुप्पट होणार असल्याचे मानले जाते. भारताच्या अॅनिमेशन आणि ग्राफिक्स इंडस्ट्रीसाठी वेव्हज परिषदेमुळे यशाचे दार उघडले
देशाची एकजूट दहशतवादाविरुद्ध निर्णायक लढ्याचा आधार – पंतप्रधान नरेंद्र मोदी
नवी दिल्ली, २७ एप्रिल : “देशाची एकता आणि १४० कोटी भारतीयांची एकजूट हीच दहशतवादाविरुद्धच्या आपल्या निर्णायक लढाईचा आधार आहे,” असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला. ‘मन की बात’ कार्यक्रमाच्या १२१व्या भागात देशवासियांशी संवाद साधताना ते बोलत होते. २२ एप्रिल रोजी जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा उल्लेख करताना पंतप्रधान मोदी म्हणाले, “या
महाराष्ट्र देशातील पहिले बेघरमुक्त राज्य करण्यासाठी प्रयत्न करा : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
ग्रामविकास व पंचायतराज विभागाच्या कार्यशाळेत मुख्यमंत्र्यांचा अधिकाऱ्यांशी संवाद मनुष्यबळाचे योग्य व्यवस्थापन आणि तंत्रज्ञानाचा अधिक वापर करण्याचे आवाहन पुणे, दि. २६: प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत ग्रामविकास विभागाने उत्तम कामगिरी केली असून केंद्राकडून आणखी १० लाख घरांना मान्यता मिळणार आहे. घर मंजूर झाल्यावर जमीन उपलब्ध करून देण्यासाठी मोहीम स्तरावर काम करण्यासह एकही व्यक्ती बेघर राहणार नाही यासाठी प्रयत्न
भारताचे पाकिस्तानविरोधात कठोर राजनैतिक पाऊल : सिंधू करार स्थगित, पाकिस्तानी नागरिकांना 48 तासांत देश सोडण्याचे आदेश
नवी दिल्ली, 23 एप्रिल : पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानविरोधात निर्णायक राजनैतिक पावले उचलली आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी झालेल्या कॅबिनेट सुरक्षा समितीच्या (CCS) बैठकीत महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. यानुसार, 1960 मधील सिंधू पाणी करार तत्काळ प्रभावाने स्थगित करण्यात आला असून, भारतात असलेल्या पाकिस्तानी नागरिकांचे व्हिसा रद्द करत त्यांना 48 तासांत देश
पहलगाममध्ये भीषण दहशतवादी हल्ला : २७ हिंदू पर्यटकांचा मृत्यू, अनेक जखमी
बांगड्या पाहून धर्म विचारला आणि सुरू केला गोळीबार; पंतप्रधान व गृहमंत्र्यांचा तीव्र निषेध, दोषींवर कठोर कारवाईचे संकेत श्रीनगर, २२ एप्रिल : जम्मू-कश्मीरच्या अनंतनाग जिल्ह्यातील प्रसिद्ध पर्यटनस्थळ पहलगाममध्ये मंगळवारी दुपारी जिहादी दहशतवाद्यांनी एक भयावह हल्ला घडवून आणला. या गोळीबारात देशभरातून आलेल्या २७ हिंदू पर्यटकांचा मृत्यू झाला असून, अनेकजण गंभीर जखमी झाले आहेत. दुपारी सुमारे २.४७ च्या
गोळवलकर गुरुजी विद्यालयात सौर ऊर्जा प्रकल्पाचे उद्घाटन
पुणे, दि. ३ एप्रिल : येथील डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या माधव सदाशिव गोळवलकर गुरुजी विद्यालयात आज (३ एप्रिल २०२५ ) सौर ऊर्जा प्रकल्पाचे उद्घाटन डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे कार्यवाह डॉक्टर आनंद काटीकर यांच्या हस्ते करण्यात आलं. आजच्या विद्यार्थ्यांनी विज्ञाननिष्ठ दृष्टीकोन स्वतःमध्ये रुजवून आणि जिज्ञासू वृत्ती जोपासून प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा ध्यास घेतला पाहिजे असं प्रतिपादन डॉक्टर आनंद काटीकर
कर्तृत्वाचा आदर्श म्हणून पुण्यश्लोक देवी अहिल्याबाईंकडे पाहता येते : चंदाताई साठ्ये
पुणे, दि. ११ एप्रिल : पुण्यश्लोक अहिल्यादेवींचे काम म्हणजे आपल्या सगळ्यांच्याच आऊट ऑफ कव्हरेज आहे इतके प्रचंड काम त्यांनी केले आहे. रयतेच्या प्रती असलेली तिची निष्ठाच त्यांना अहर्निश असे लोक कल्याणकारी कार्य करण्यास प्रवृत्त करती झाली असे मत राष्ट्र सेविका समितीच्या अखिल भारतीय महिला समन्वय सहसंयोजिका चंदाताई साठये यांनी व्यक्त केले. शक्ति स्थापना दिनाच्या निमित्ताने

