मंदिरे समाजाची संस्कार शिदोरी : सरसंघचालक डॉ. मोहन भागवत
सोलापूर, दि. २७ जून : बाराव्या शतकापासून सातत्याने चालणाऱ्या मंगलकारी परंपरेमध्ये मंदिरे ही समाजाची केंद्रे आहेत. या परंपरेच्या निर्वहनासाठी श्रद्धेची, संस्काराची शिदोरी पिढी दर पिढी सातत्याने मिळत आल्याने समाज उत्तमरित्या जगत आला आहे. असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी केले. येथील श्री सिद्धेश्वर देवस्थानला भेट देऊन सरसंघचालक भागवत यांनी शिवयोग समाधीचे
आषाढी वारी निमित्त विविध मार्गांवर ‘जिज्ञासा’तर्फे आरोग्य सेवा शिबिरांचे आयोजन
पुणे, २७ जून: आषाढी वारी ही महाराष्ट्राच्या समृद्ध परंपरेचा मानबिंदू आहे. या वारीत येणाऱ्या वारकऱ्यांना मोफत आरोग्य सेवा पुरवण्याचे काम अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या जिज्ञासा आयामाचे विद्यार्थी मागील ९ वर्षांपासून करत आले आहेत. या वर्षीच्या वारीसाठी ठिकठिकाणाहून दिंडींने पंढरपूरसाठी प्रस्थान केले आहे. याही वर्षी जिज्ञासाचे विद्यार्थी वारीत सेवाकार्य करणार असल्याची माहिती अभाविपतर्फे पत्रकार परिषदेत देण्यात
भारताचे माजी उपपंतप्रधान भारतरत्न लालकृष्ण आडवाणी एम्समध्ये दाखल
नवी दिल्ली, २७ जून : भारताचे माजी उपपंतप्रधान व गृहमंत्री तसेच भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण आडवाणी यांची तब्येत अचानक खालावली आहे. काल रात्री त्यांना तातडीने एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सध्या त्यांना निरीक्षणाखाली ठेवण्यात आले असून पुढील उपचार सुरू करण्यात आले आहेत. वार्धक्यातून उत्पन्न झालेल्या आरोग्यसमस्यांमुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्या तब्येतीबाबत
आणीबाणी लागू केल्याने जगातील सर्वात मोठी लोकशाही झाकोळल्याचे उपराष्ट्रपतींचे प्रतिपादन
सेंट्रल इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड (सीईएल) च्या सुवर्ण महोत्सवी समारंभात उपराष्ट्रपतींचे भाषण सेंट्रल इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडला मिनीरत्न दर्जा बहाल नवी दिल्ली, २६ जून : १९७५ मध्ये आणीबाणी लागू झाल्यामुळे जगातील सर्वात मोठी लोकशाही झाकोळली असे प्रतिपादन उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी आज केले. आणीबाणीच्या काळ्या दिवसांचे स्मरण करताना आणीबाणीचे दिवस पुन्हा कधीही अनुभवावे लागणार नाहीत कारण भारतात घटनात्मक लोकशाही
ओम बिर्ला सलग दुसऱ्यांदा लोकसभा अध्यक्षपदी विराजमान
नवी दिल्ली, २६ जून : ओम बिर्ला यांची सलग दुसऱ्यांदा लोकसभेच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या पदासाठी त्यांचे नाव सुचवले. एनडीएमधील सर्व घटक पक्षांनी त्यांच्या नावाला पाठिंबा दिला. त्यानंतर आवाजी मतदानाने त्यांची या पदासाठी निवड झाली. शिवसेना (उबाठा) खासदार अरविंद सावंत यांनी काँग्रेस खासदार के. सुरेश यांची लोकसभा अध्यक्षपदी निवड करण्यासाठी
श्री स्वामी समर्थांच्या दर्शनाने प्रभावित झालो : सरसंघचालक डॉ. मोहन भागवत
अक्कलकोट, दि. २४ जून : श्री गुरु दत्तात्रयांचे अवतार सद्गुरू श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या पदस्पर्शाने अक्कलकोट भूमीसह संपूर्ण भारतातील अनेक प्रांत पावन झाले आहेत, त्यामुळे श्री स्वामी समर्थांच्या कार्याचा विस्तार संपूर्ण देशात आहे. श्री स्वामी समर्थांच्या दर्शनाने प्रभावित झालो असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी केले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक
अरुणाचल प्रदेश: इटानगरमध्ये ढगफुटी, घरे आणि वाहनांचे नुकसान झाले
ढगफुटीमुळे अरुणाचल प्रदेशच्या इटानगर शहरातील अनेक भागात रहिवाशांच्या मालमत्तेचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. पूराच्या पाण्यामुळे असंख्य घरे व वाहने खराब झाल्याची माहिती समोर आली आहे. अरूणाचल प्रदेशच्या राजधानीचे शहर असलेल्या इटानगरमध्ये भूस्खलनाच्या घटनांमुळे वाहने आणि निवासी परिसर प्रभावित झाला आहे. विपरीत हवामान परिस्थितीमध्ये स्थानिक रहिवाशांना जागरूक आणि सावध राहण्याचे आवाहन केले जात आहे. अधिकारी
विज्ञान भारतीचे सहावे राष्ट्रीय अधिवेशन येत्या २२ जून पासून पुण्यात होणार : विज्ञान भारतीचे अध्यक्ष डॉ. शेखर मांडे
पुणे, ता. २० : भारतीय विज्ञानाबद्दल जनजागृती घडवून आणणाऱ्या विज्ञान भारतीचे सहावे राष्ट्रीय अधिवेशन येत्या शनिवार व रविवारी (दि. २२ व २३ जून २०२४) पुण्यात लोणी काळभोर येथील एमआयटी-एडीटी कॅम्पसमध्ये होणार आहे, अशी माहिती विज्ञान भारतीचे अध्यक्ष आणि सीएसआयआरचे माजी महासंचालक डॉ. शेखर मांडे यांनी पत्रकार परिषदेत दिली. याप्रसंगी विज्ञान भारतीचे महासचिव प्रा. सुरेश
राज्यसभा पोटनिवडणूक : सुनेत्रा पवार यांची बिनविरोध निवड
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या बारामती लोकसभा उमेदवार राहिलेल्या सुनेत्रा पवार यांनी आज राज्यसभा उमेदवारीचा अर्ज भरला. पक्षाचे नेते प्रफुल पटेल यांच्या रिक्त झालेल्या जागेवर ही पोटनिवडणूक झाली. मात्र यावेळी सुनेत्रा पवार यांच्या व्यतिरिक्त अन्य कोणाचाही अर्ज न आल्यामुळे सुनेत्रा पवार बिनविरोध निवडून आल्या आहेत. आज हा अर्ज दाखल करत असताना प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, छगन भुजबळ
देशातील पहिले दिव्यांग मंत्रालय महाराष्ट्रात : प्रविण पुरी
सक्षमच्या दोन दिवसीय अधिवेशनाचा समारोप पुणे : देशात २०१६ मध्ये दिव्यांगांसाठी कायदा येण्यापूर्वी पुण्यातील विविध सेवा संस्था काम करत होत्या, त्यातूनच महाराष्ट्रात निर्माण झालेले दिव्यांग मंत्रालय हे देशातील पहिले मंत्रालय आहे. आता इतर देशही त्याचे अनुकरण करत आहेत, असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्याचे दिव्यांग विभागाचे आयुक्त प्रवीण पुरी यांनी केले. समदृष्टी, क्षमताविकास व संशोधन मंडळ (‘सक्षम’)

