संघाची अखिल भारतीय समन्वय बैठक १४ ते १६ सप्टेंबर दरम्यान पुण्यात
पुणे – दि. 4 सप्टेंबर – राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची दरवर्षी होणारी अखिल भारतीय समन्वय बैठक या वर्षी महाराष्ट्रातील पुणे येथे आयोजित करण्यात येत आहे. तीन दिवसांची ही समन्वय बैठक 14-15-16 सप्टेंबर 2023 रोजी होणार आहे. अखिल भारतीय पातळीवरची ही व्यापक समन्वय बैठक वर्षातून एकदा आयोजित होते. या बैठकीत पूजनीय सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत, माननीय
एम.ई.एस इंग्लिश मिडियम स्कूलच्या वतीने भव्य वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न
शिरवळ: एम.ई.एस इंग्लिश मिडीयम स्कूल व ज्युनिअर कॉलेज, शिरवळ आणि ग्रामपंचायत शिरवळ यांच्या संयुक्त विद्यमाने सामाजिक बांधिलकी जपत शिरवळ परिसरात ७५ हून अधिक देशी वृक्ष लावण्यात आले. आगामी काळात या सर्व वृक्षांच्या संवर्धनाचे नियोजनही शाळेमार्फतच केले जाणार असल्याची माहिती शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. स्वाती जोशी यांनी दिली. वृक्षारोपणाच्या या कार्यक्रमासाठी शिरवळ ग्रामपंचायतीचे शिरवळ विशेष सहकार्य लाभले.
अस्पृश्यता ही विकृतीच; ही विकृती दूर करण्यासाठी समाज एकत्रित येण्याची गरज – भैय्याजी जोशी
नागपूर,ता.३. : अस्पृश्यता ही सर्वात मोठी विकृती आहे. ही विकृती दूर करण्यासाठी सर्व समाज एकत्रित होण्याची गरज आहे. सर्व समाज एक झाला तर समाज शक्तिशाली होईल, समाज शक्तिशाली झाला तर राष्ट्र शक्तिशाली होईल, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी सरकार्यवाह भैय्याजी जोशी यांनी केले. विश्व हिंदू परिषद, सामाजिक समरसता अभियान तर्फे देवजी रावत लिखित ‘अस्पृश्यता