भारतीय संस्कृतीचा पाया असणारी कुटुंब व्यवस्था नष्ट करण्याचे षडयंत्र हाणून पाडले पाहिजे : ॲड. रोहित सर्वज्ञ
नांदेड, 8 मे 2024 : राष्ट्रीय संकल्पनांवर प्रश्नचिन्ह निर्माण करण्याचे काम सध्या होत आहे. भारतीय संस्कृतीचा पाया असणारी एकत्रित कुटुंबव्यवस्था नष्ट करण्याचे षडयंत्र सध्या मोठ्या प्रमाणावर चालू आहे. त्यासाठी मानवतावादी दृष्टिकोन असणारे विमर्श प्रस्थापित करून हे षडयंत्र हाणून पाडले पाहिजेत. चुकीचे विमर्श समाजावर थोपविले जात आहेत. त्यामुळे समाजातील प्रज्ञावंतांनी अभ्यासपूर्वक प्रकट व्हायला हवे. चुकीचे तात्विक,सैद्धांतिक
सशक्त बीजरोपणाने संघ आणि संघाचे विचार वाढले : भैय्याजी जोशी
नाशिक : स्व. नाना ढोबळे यांनी सशक्त बीजे रोवली म्हणून संघकार्य दुर्गम आदिवासी भागात पोहचले. नानांनी जे सशक्त बीजरोपण केले आहे, त्यामुळेच संघ आणि संघाचे विचार अजून वाढले. रा. स्व संघाचे ज्येष्ठ प्रचारक स्व.नानाराव ढोबळे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त नुकतेच शंकराचार्य संकुलाच्या डॉ. कुर्तकोटी सभागृह येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यानिमित्त आयोजित व्याख्यानात राष्ट्रीय स्वयंसेवक
धर्म, संस्कृती, परंपरा व मूल्यांचे रक्षण करणे म्हणजेच राष्ट्रकार्य : भैय्याजी जोशी
राष्ट्रीय स्वयंसेविका समितीच्या सेविकांना मार्गदर्शन नाशिक : धर्म, संस्कृती, परंपरा व मूल्य यांचे रक्षण करणे महणजेच राष्ट्रकार्य होय. “रात्रंदिना आम्हा युद्धाचा प्रसंग” असा मंत्र संत तुकाराम महाराजांनी सांगितला आहे.त्यामुळे आपण कठोर बनून थोडा वेळ हा राष्ट्रकार्यासाठी राखून ठेवायचा आहे, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यकारिणी सदस्य भैय्याजी जोशी यांनी येथे केले. राष्ट्र सेविका समितीच्या सेविकांसाठी
सामाजिक उन्नयनासाठी उपयुक्त पूजा प्रशिक्षण
नाशिक येथील शंकराचार्य न्यासाचा स्तुत्य उपक्रम नाशिक : हिंदू समाजातील वंचित समाजाच्या घरात बारसे, लग्नविधी आणि इतर धार्मिक विधीसाठी पुरोहित उपलब्ध होत नसल्याने त्या समाजातील तरुणांना पूजा प्रशिक्षण देण्याची आवश्यकता निर्माण झाली. शंकराचार्य न्यासाने पुढाकार घेऊन समाजात सद्भाव निर्माण होण्यास या उपक्रमाचा उपयोग होईल या हेतूने पूजा प्रशिक्षणाची जबाबदारी स्विकारली. अनादी काळापासून चालत आलेल्या हिंदू
न्यायमूर्ती अजय खानविलकर यांनी घेतली लोकपाल पदाची शपथ
नवी दिल्ली : राष्ट्रपती भवन येथे काल सायंकाळी ६ वाजता आयोजित समारंभात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी न्यायमूर्ती अजय माणिकराव खानविलकर यांना लोकपाल पदाची शपथ दिली. सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती अजय खानविलकर यांनी भारताच्या लोकपालचा पदभार स्वीकारला आहे. काही दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी, देशाचे सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते अधीर रंजन चौधरी यांचा समावेश
“नवा भारत छोटी स्वप्ने पाहत नाही” – पंतप्रधान
देशातील 554 रेल्वे स्थानकांच्या पुनर्विकासाची पायाभरणी नवी दिल्ली, २६ फेब्रुवारी : वर्तमानातील भारताने छोटी स्वप्ने पाहणे बंद केले आहे. हल्ली आम्ही मोठी स्वप्ने पाहत असून त्यांच्या पूर्ततेसाठी काम करत असल्याचे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. अमृत भारत स्टेशन योजनेंतर्गत ५५४ स्थानके आणि १५०० ओड ओव्हर ब्रिज खालच्या रस्ते पुनर्विकासाची पंतप्रधानांनी आज, सोमवारी पायाभरणी
विकसित भारताचा संकल्प सांगणारा अर्थसंकल्प : देवेंद्र फडणवीस
मुंबई, १ फेब्रुवारी – केंद्रीय अर्थमंत्री श्रीमती निर्मला सीतारामन यांनी आज मांडलेला अंतरिम अर्थसंकल्प हा विकसित भारताचा संकल्प सांगणारा अर्थसंकल्प आहे, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे. याबद्दल त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचे अभिनंदन केले, आभार मानले आहेत. केंद्रीय अर्थसंकल्पावर प्रतिक्रिया देताना ते म्हणाले की, या अंतरिम
ज्ञानवापी मंदिरात ३१ वर्षांनी निनादले आरतीचे स्वर
कोर्टाच्या आदेशानंतर ज्ञानवापीच्या तळघरात मध्यरात्री झाली पूजा वाराणसी, १ फेब्रुवारी : वाराणसी जिल्हा न्यायालयाच्या आदेशानंतर बुधवारी रात्री उशिरा ज्ञानवापी संकुलातील व्यासजींच्या तळघरात पूजा सुरू करण्यात आली. तसेच आज, गुरुवारी पहाटे मंगला आरतीही झाली. न्यायालयाने तब्बल 31 वर्षांनंतर हिंदूंना पूजा करण्यास परवानगी दिली आहे. व्यासजींच्या तळघरात सध्या सर्वसामान्य भाविकांना प्रवेश बंदी आहे. पूजेच्या वेळी फक्त पुजारी
ज्ञानवापीच्या तळघरात हिंदूंना पूजेची परवानगी
‘व्यास का तहखाना’ येथे होणार नित्य पूजा वाराणसी, ३१ जानेवारी : उत्तरप्रदेशच्या वाराणसी न्यायालयाने ज्ञानवापी मशिदीच्या तळघरात हिंदूंना पूजेची परवानगी दिली आहे. त्यानुसार ज्ञानवापी परिसरातील ‘व्यास का तहखाना’ येथे हिंदूंना आरती-पूजा करता येणार आहे.वाराणसी कोर्टाने यासंदर्भात जिल्हा प्रशासनाला सूचना केल्या असून येत्या ७ दिवसात यासंदर्भात आवश्यक व्यवस्था करुन देण्याचे आदेश दिले आहेत. यासंदर्भात हिंदू पक्षकारांचे
अयोध्येचा कायापालट : शहराचा अध्यात्मिक प्रवास आधुनिक संपर्क सुविधेसह झेप घेत आहे
अयोध्येच्या हृदयस्थानी, जिथे इतिहास अखंडपणे अध्यात्मात गुंफला जात आहे तिथे एक चिरस्मरणीय परिवर्तन घडत आहे. हे परिवर्तन राम मंदिराच्या पवित्र भूमीच्या परिसराबाहेरील क्षेत्राला देखील व्यापणारे आहे. प्रभू श्रीरामाचे भव्य मंदिर आकार घेत असताना, भारत सरकारने आपल्या दूरदर्शी वाटचालीत अयोध्येच्या संपर्क सुविधेत व्यापक फेरबदल करून या प्राचीन शहराला सुलभतेच्या नवीन युगामध्ये पोहचवले आहे. या उत्क्रांतीच्या अग्रभागी

