ईर्जिकच्या शिरपेचात मानाचा तुरा!; आंबा व्यवसायासाठी ‘अमृत’ महाराष्ट्रसोबत हातमिळवणी

ईर्जिक (EERGIC) फाउंडेशन आणि अमृत (AMRUT) महाराष्ट्र शासन उपक्रम यांच्यात सामंजस्य करार;

आंबा क्षेत्रात नव्या उद्योजकांची फळी घडवणार!

पुणे, दि. 20 फेब्रुवारी : ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना बळ देणाऱ्या आणि गुणवत्ता पूरक उत्पादनांची चळवळ चालवणाऱ्या ‘ईर्जिक (EERGIC) फाउंडेशन’ ने एक सकारात्मक पाऊल उचलले आहे. आंबा व्यवसायातील तरुण उद्योजकांना चालना देण्यासाठी ईर्जिक फाउंडेशनने महाराष्ट्र सरकारच्या ‘अमृत’ (AMRUT) संस्थेसोबत सामंजस्य करार (MOU) केला आहे.

या धोरणात्मक भागीदारीमुळे महाराष्ट्रातील तरुणांना आंबा व्यवसायात उतरण्यासाठी मोठी संधी उपलब्ध होणार आहे. ईर्जिक फाउंडेशन या नवउद्योजकांसाठी एक महत्त्वाची भूमिका बजावणार आहे.यामध्ये आंब्याची खरेदी, गुणवत्ता तपासणी, लॉजिस्टिक आणि वितरण व्यवस्थापन यांसारख्या तांत्रिक बाबींचे पूर्ण सहकार्य ईर्जिकतर्फे दिले जाईल.

या कराराचे वैशिष्ट्य : तरुणांचे सक्षमीकरण, व्यावसायिक पाठबळ, शाश्वत विकास हा आहे.

या उपक्रमाद्वारे ईर्जिक फाउंडेशन आणि अमृत (महाराष्ट्र शासन) मिळून केवळ फळविक्री करत नसून, महाराष्ट्राच्या कृषी-व्यवसाय क्षेत्राचे भविष्य घडवत आहेत. हा करार म्हणजे ईर्जिकच्या शिरपेचात मानाचा तुरा असून, यामुळे महाराष्ट्रातील आंबा बागायतदार आणि तरुण उद्योजक यांच्यात एक भक्कम दुवा निर्माण होईल असा विश्वास ईर्जिक फाऊंडेशनच्या संचालकांकडून व्यक्त करण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *