धनगर आरक्षणासाठी राज्य सरकार सकारात्मक : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई, दि. 13 मार्च : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज विधान भवन, मुंबई येथे धनगर समाजाच्या विविध मागण्यांसंदर्भात शिष्टमंडळासमवेत बैठक पार पडली. धनगर आरक्षणाबाबत कायदेशीर तोडगा काढण्यासाठी धनगर समाजाच्या शिष्टमंडळासोबत राज्याचे महाधिवक्ते यांच्यासोबत तातडीने बैठक आयोजित केली जाईल, जेणेकरून धनगर बांधवांच्या आरक्षणासंदर्भात कायदेशीर दिशा स्पष्ट होईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, महाराष्ट्रात लोकसंख्येच्या दृष्टीने मोठ्या प्रमाणात असलेल्या धनगर समाजाचे इतिहासात भरीव योगदान आहे. धनगर समाजाला आरक्षण देण्यासाठी शासन सकारात्मक आहे. हे आरक्षण कायद्याच्या चौकटीत टिकणे आवश्यक आहे. त्या दृष्टीने सर्व बाजू तपासून त्याची खातरजमा करण्यात येईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *