
संसदेच्या पाच दिवसीय विशेष अधिवेशनाला आजपासून सुरुवात झाली. स्वातंत्र्यपूर्व काळापासून अस्तित्वात असलेल्या संसदेच्या सध्याच्या इमारतीमधून कामकाजाचा आजचा शेवटचा दिवस आहे. आजच्या कामकाजाच्या सुरुवातीला लोकसभा अध्यक्ष ओमप्रकाश बिर्ला यांनी जी20 च्या यशस्वी आयोजनाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अभिनंदन केले. यावर उत्तर देताना पंतप्रधानांनी लोकसभेत यावेळी यांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला व जी20 परिषदेच्या उपलब्धीबाबत विवेचन केले.
उद्यापासून दोन्ही सभागृहांचे कामकाज नवीन संकुलात होणार आहे. हे विशेष अधिवेशन २२ सप्टेंबर पर्यंत चालणार असून अधिवेशन काळात संसदेच्या दोन्ही सभागृहांच्या एकूण ५ बैठका होणार आहे. दरम्यान हे अधिवेशन नेमक्या कोणत्या हेतूने बोलवले आहे याबद्दल अद्याप पुरेशी माहिती उपलब्ध नाही.

