लव्ह जिहाद / धर्मांतरण विरोधी कायदा करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

पुणे, दि. १३ फेब्रुवारी : सध्या अनेक राज्यांनी इस्लाम धर्माची बदलती लोकसंख्या लक्षात घेऊन वेळीच यावर उपाय करण्यास सुरुवात केली आहे. उत्तर प्रदेश, उत्तराखंड, मध्यप्रदेश व गुजराथ राज्यांनी धर्मांतरण विरोधी कायदे लागू केले आहेत. यात फसवून धर्मांतरण करणे, लग्नाचे आमिष दाखवून, धमकावून किंवा चुकीची माहिती देऊन धर्मांतरण करणे, तसेच सक्तीचे धर्मांतरण करणे यासाठी शिक्षेची तरतूद केली गेली आहे. ज्यामुळे लव्ह जिहादला आळा बसत आहे. अश्याच प्रकारचा कायदा करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने एक वर्षापूर्वी 14 फेब्रुवारी 2025 रोजी समिती गठित केली होती व मसुदा तयार करून कायदा कण्यासाठी करण्यासाठी परिपत्रक काढले गेले. परंतु आज एक वर्ष झाले तरी यावर कोणतेही ठोस पाऊल उचलले गेले नाही व कायदा अजून लागू केला नाही. या 13 फेब्रुवारी 2026 रोजी आपण सरकारला त्या GR ची आठवण करून देण्यासाठी व लवकरात लवकर कायदा करावा यासाठी निवेदन दिले गेले.
मुली व महिलांच्या सुरक्षेच्या दृष्टीने हा कायदा अत्यंत महत्त्वाचा कायदा आहे हे जाणून घेऊन पुण्यातील नामांकित शिक्षण संस्थांच्या विविध शाळा आणि महाविद्यालयातील 200 मुली एकत्र आल्या व त्यांनी पुण्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांना निवेदन दिले. या मुली जिल्हाधिकारी कार्यालयात जमल्या व त्यांनी लव्ह जिहाद विरोधात आपले मत मांडले. तसेच हा कायदा झाला पाहिजे असे निवेदन निवेदन व GR ची प्रत फ्रेम करून जिल्हाधिकाऱ्यांना दिली. अतिशय ठामपणे मुलींनी आपली मागणी प्रशासनाकडे पोहोचवली व त्याची पोहोच देखील घेतली.
दर वर्षी साधारणपणे प्रत्येक राज्यात तीन ते चार हजार केसेस होतात. म्हणजेच देशात कमीत कमी दीड लाख मुली व महिला दर वर्षी लव्ह जिहादला बळी पडतात. ही समोर आलेली आकडेवारी आहे. मात्र उघडकीस न आलेली आकडेवारी किती मोठी याचा अंदाज यावरून बांधता येऊ शकतो. या लव्ह जिहादच्या जाळ्यात मुलींना अडकविण्यासाठी खोटी हिंदू नावे वापरणे, सोशल मीडियावर खोट्या प्रोफाइल बनवून संपर्क करणे किंवा मुलींना व्यसनाधीन बनवून धर्मांतरण करण्यास भाग पाडले जाते. अनेकदा प्रेमाच्या नावाखाली लग्नाचे आमिष दाखवणे, त्यासाठी शारीरिक संबंध प्रस्थापित करून त्याचे अश्लील फोटो व्हिडिओ काढून त्याद्वारे मुलींना ब्लॅकमेल करणे हि पद्धत वापरली जाते. अनेकदा मुलींना विशिष्ट प्रकारची औषधे खायला देऊन त्यांची मानसिक स्थिती बदलवून त्यांना प्रेमाच्या जाळ्यात ओढल्याचे समोर आले आहे.
अश्या धर्मांतरणास बळी पडणाऱ्या मुलींचा वापर इस्लाम मध्ये लोकसंख्या वाढीसाठी केला जात आहे. ज्याने भारताला इस्लामी राष्ट्र बनवण्याची गझवा ए हिंद मोहीम यशस्वी होईल असा जिहादी डाव आहे असा आरोप निवेदनात करण्यात आला आहे. तसेच पुढे जाऊन या मुलींचा वापर ड्रग्स तस्करी, अवयव तस्करी, वेश्या व्यवसाय आणि दहशतवादी कारवाया करण्यासाठी केला जातो हे उघडकीस आले आहे. मुलींना धर्मांतरित करण्यासाठी जिहादी समाजाकडून मुलांना अनेकदा प्रचंड पैसा पुरवला जात असल्याचे सत्य समोर आले आहे.
या सगळ्या धर्मांतरणाच्या चालवल्या जाणाऱ्या कट्टरपंथी मोहिमेला सर्वात प्रथम केरळच्या न्यायालयाने लव्ह जिहाद हे नाव दिले व त्यावर केसेस केल्या गेल्या. तिथे हा सर्व प्रकार मोठ्या प्रमाणात समोर आला. असे मनोगत शाळा महाविद्यालयातील मुलींनी व्यक्त केले.

