परभणी, दि. 18 : बांगलादेशातील हिंदू समाजावर होणार्या हल्ल्यांसह अत्याचाराच्या निषेधार्थ सकल हिंदू समाजाच्या वतीने रविवार 18 ऑगस्ट रोजी परभणीत शनिवार बाजार मैदानावरुन दुपारी मोठा मूक मोर्चा काढण्यात आला. मागील काही दिवसांपासून बांगलादेशात हिंसाचार उफाळून आला असून बांग्लादेशातील अनेक हिंदु बांधव, भगिनीवर अमानुष आत्याचार तसेच हिंदु मंदीरावर हल्ले होत असुन हिंदु देवतांच्या मूर्तीची विटंबना करण्यात येत आहे. सदरील घटनेचा सकल हिंदुस्थानातील हिंदू बांधवाच्या भावना दुखल्या असुन याचा संबंध भारत देशात निषेध करण्यात येत आहे.
या पार्श्वभूमीवर परभणीतील सकल हिंदु समाज रस्त्यावर उतरून बांग्लादेश हिंसाचारच्या विरोधात निषेध, रोष व्यक्त करत विराट मोर्चा काढण्यात आला. यात परभणीतील सर्व स्तरातील हिंदु बांधव, महंत, युवक, व्यापारी वर्ग यांची उपस्थित लक्षणीय होती. मोर्चाच्या अनुषांगाने अनेकांनी समारोपाच्या सभेत आपले मत व्यक्त केले. केंद्र सरकारने बांग्लादेशातील हिंदु समाजवर होत आसलेल्या आत्याचार थांबावेत यासाठी संयुक्त राष्ट्र परिषदेत आवाज उठवावा, बांग्लादेशातील हिंदुना भारतात आश्रय द्यावा, भारतातील बांग्लादेशातील घुसखोरांवरती कडक कारवाई करावी अशी मागणी व्यक्त करण्यात आली. याच ठिकाणी जिल्हाधिकार्यांना मागण्याचे निवेदन सादर करण्यात आले.