देशभरातून भारतरत्न नानाजी देशमुख यांना वाहिली गेली आदरांजली

पंतप्रधानांनी, भारतरत्न नानाजी देशमुख यांना जयंतीनिमित्त वाहिली आदरांजली

आपले संपूर्ण आयुष्य देशासाठी व समाजासाठी अर्पित करणाऱ्या ज्येष्ठ समाजसेवक नानाजी देशमुख यांची आज जयंती. यानिमित्त देशभरातून त्यांना आदरांजली वाहण्यात आली. त्यांचे स्मरण करण्यात आले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतरत्न नानाजी देशमुख यांना त्यांच्या जयंतीनिमित्त आदरांजली वाहिली आहे. नानाजी देशमुख यांनी आपले जीवन देशातील गावे आणि आदिवासी भागाच्या विकासासाठी समर्पित केले. त्यांची त्याग आणि सेवेची भावना प्रत्येक पिढीसाठी प्रेरणास्रोत राहील, असेही मोदी म्हणाले.

आपल्या एक्स संदेशात पंतप्रधान म्हणाले;

“भारतरत्न नानाजी देशमुख यांना जयंतीनिमित्त माझी आदरपूर्वक श्रद्धांजली. त्यांनी आपले जीवन देशातील गावे आणि आदिवासी भागांच्या विकासासाठी समर्पित केले. त्यांची त्याग आणि सेवेची भावना प्रत्येक पिढीसाठी प्रेरणादायी राहील.

भारतीय जनता पक्षाचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष व विद्यमान केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनीही आपल्या भावना एक्स संदेशातून व्यक्त केल्या आहेत. नानाजींच्याच पदचिन्हांवर चालण्याचा प्रयत्न आपण करत असून त्यांचे विचार हे कायम देशाला दिशा देत राहतील असे त्यांनी आपल्या संदेशात म्हटले आहे.

भाजपचे विद्यमान राष्ट्रीय अध्यक्ष जगतप्रकाश नड्डा यांनीही आपल्या एक्स संदेशात नानाजींचे स्मरण केले आहे. श्रद्धेय नानाजींच्या ग्रामोदयातून राष्ट्रोदय या संकल्पनेची आज अत्यंत आवश्यकता असल्याचे त्यांनी नमूद केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *