Wednesday, February 25th, 2026

शासन व सेवाभावी संस्थांच्या माध्यमातून निरोगी महाराष्ट्राकडे वाटचाल

गुणवत्तापूर्ण आरोग्यसेवेचा संकल्प !

मुंबई, दि. 24 फेब्रुवारी : महामहिम राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते, राज्यपाल आचार्य देवव्रत आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत आज मुंबई येथे पी.डी. हिंदुजा हॉस्पिटल अँड मेडिकल रिसर्च सेंटर, मुंबईतर्फे आयोजित ‘सेव्हिंग लाइव्ह्ज. बिल्डिंग अ हेल्दियर भारत’ या राष्ट्रीय अभियानाचे उदघाटन पार पडले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले, फाळणीच्या कठीण काळानंतर सर्वसामान्य नागरिकांना गुणवत्तापूर्ण आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्यासाठी या रुग्णालयाची स्थापना करण्यात आली आणि आता देश-विदेशातून रुग्ण येथे उपचारासाठी येऊन आरोग्यसेवेचा लाभ घेत आहेत.
ड्रग-रेझिस्टंट क्षयरोगावरील (DR-TB) उपचारांसाठी या रुग्णालयाने केलेल्या नवीन उपक्रमांचा उल्लेख करत मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, क्षयरोगावरील उपचारांसाठी या संस्थेने विकसित केलेले धोरण पुढे राष्ट्रीय धोरण म्हणून स्वीकारण्यात आले. एखाद्या संस्थेचा नवोपक्रम राष्ट्रीय स्तरावर मान्य होणे ही अत्यंत महत्त्वाची बाब आहे.

याप्रसंगी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे भाषण –

https://www.facebook.com/share/v/1KjrNDEPEC/

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, गरीब व वंचित घटकांना विविध स्वरूपात मदत, मोफत उपचार आणि आरोग्यसेवा उपलब्ध करून देत सामाजिक दायित्व पार पाडण्यात हे रुग्णालय अग्रणी आहे. तसेच, हिंदुजा हॉस्पिटलसारख्या संस्थांनी हाती घेतलेल्या उपक्रमांना शासकीय योजनांशी जोडून ते अधिक व्यापक स्तरावर नेण्याचा सरकारचा मानस आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *