शिवसेनेमध्ये इनकमिंग सुरूच, विविध पक्षांच्या नेते-कार्यकर्त्यांचा शिंदेंच्या उपस्थितीत पक्षप्रवेश

मुंबई, दि. १६ फेब्रुवारी : राज्यभरात सध्या कोणतेही निवडणुकीचे वातावरण नसतानाही एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेत राज्यभरातून इनकमिंग अद्याप सुरूच आहे. सामान्यपणे निवडणुकांच्या तोंडावर अशाप्रकारचे पक्षांतर पाहायला मिळते. मात्र कोणतीही निवडणूक नसतानाही हे इनकमिंग सुरूच असल्यामुळे आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. गेल्या काही दिवसांमध्ये मराठवाड्यातील विविध जिल्ह्यांतील विविध पक्षांच्ये नेते-कार्यकर्त्यांनी मुख्य नेते एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला आहे.

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश सचिव आणि शिवाजी नागरी बँकेचे चेअरमन रवींद्र काळे, उपसचिव आणि पैठणमधील रेणुका साखर कारखान्याचे संचालक अप्पासाहेब निर्मळ, पंचायत समितीचे माजी सभापती आणि कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक सुरेश डूमाले, माजी नगराध्यक्ष जतसिंह परदेशी अशोक जाधव, दत्तात्रय फसाटे, अप्पासाहेब मिसाळ, फिरोज पठाण, अन्सर सय्यद आणि त्यांच्या असंख्य पदाधिकाऱ्यांनी काल शिवसेनेमध्ये जाहीर पक्षप्रवेश केला.

 

चौका गावचे माजी उपसरपंच अशोक वाघ, पुंडलिक पवार, शीतल लडके, शंकर बोंगाणे, लहानु वाघ, प्रमोद पडूक, राधाकिशन पडूक, छावनाथ घोडगे, शामदास पठाडे तसेच वैजापूर तालुक्यातील सत्यजीत सोमवंशी, ऋतुराज सोमवंशी, सतीश शिंदे आणि इतर पदाधिकाऱ्यांनी देखील शिवसेनेत जाहीर प्रवेश केला.

नांदेड जिल्ह्यातील लोहा-कंधार विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार तथा ज्येष्ठ शेतकरी नेते शंकर अण्णा धोंडगे यांनी देखील भगवा झेंडा हाती घेत आज आपल्या असंख्य समर्थकांसह शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला. धोंडगे यांच्यासह दत्ता आनंदराव पवार, नीलमताई खेमनर, शिवराज धोंडगे, गोविंदराव भवर, मनोहर पटवारी, लक्ष्मणराव वंजे, अनिल फंड, बबनराव गवारे, मंचकराव बचाटे, दिलीप धोंडगे, भैय्यासाहेब पाटील, मारुती जाधव, अनिल यादव आदींसह अनेक पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी देखील शिवसेनेत जाहीर प्रवेश केला.

नांदेड जिल्ह्यातील प्रबळ ओबीसी नेते आणि विद्यमान कृषी उत्पन्न बाजार समिती कुंडलवाडीचे संचालक सुनील बाबाराव ऐबडवार यांनी देखील काल हाती भगवा झेंडा घेत शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला. यावेळी त्यांच्यासह उबाठा गटाचे उपतालुकाप्रमुख प्रल्हाद कदम, शिवकुमार पाटील कोंदळे यांनी तसेच सामाजिक कार्यकर्ते शेख माजीद यांनी देखील राष्ट्रवादी काँग्रेस मधून शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. यावेळी या सर्वांचे पक्षात स्वागत करून मुख्य नेते एकनाथ शिंदे यांनी त्यांना भावी यशस्वी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

महानगरपालिका, जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकांनंतरही शिवसेनेत हे इनकमिंग सुरू असल्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *