पुणे, दि. १५ ऑगस्ट : स्वातंत्र्यदिनानिमित्त शनिवार पेठेतील मोतीबागेत राज्याचे निवृत्त पोलिस महासंचालक जयंत उमराणीकर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. भारतीय संस्कृती संवर्धक संस्था आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कसबा भागाच्या वतीने आयोजित कार्यक्रमात एकता मासिकाच्या काश्मीर विशेषांकाचे प्रकाशन करण्यात आले. तसेच कै. दामूअण्णा दाते संदर्भ ग्रंथालयाचे उद्घाटन ज्येष्ठ प्रचारक, केंद्रीय कार्यकारिणी सदस्य सुहासराव हिरेमठ यांच्या हस्ते झाले.
यावेळी पुणे महानगर संघचालक रवींद्र वंजारवाडकर, कसबा भाग संघचालक प्रशांत यादव, भारतीय संस्कृती संवर्धक संस्थेचे अध्यक्ष राजीव जोशी उपस्थित होते. प्रमुख पाहुण्यांनी मनोगतात ऑपरेशन सिंदूरविषयी माहिती सांगितली व आपल्या देशापुढील आव्हाने काय आहेत याबाबत माहिती दिली. महानगर संघचालकांनी मनोगतात स्वातंत्र्यपूर्व व उत्तर काळातील संघ स्वयंसेवकांच्या योगदानाविषयी माहिती दिली. कसबा भाग संघचालक प्रशांत यादव यांनी संघप्रणालीतील पंचसूत्रीविषयी माहिती दिली. सुधीर पाचपोर यांनी म्हणलेल्या अखंड वंदे मातरम् ने कार्यक्रमांची सांगता झाली.