महाराष्ट्र राज्य
वीज कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित पगारवाढीचा प्रश्न सुटला, तब्बल दीड हजार कोटींची पगारवाढ जाहीर
उपमुख्यमंत्री व ऊर्जामंत्री देवेद्र फडणवीस यांच्यासमवेत यशस्वी वाटाघाटी मुंबई, दि. ७ जुलै : महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी लि., महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी लि., महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी लि. आदींमधील अधिकारी व कर्मचारी यांच्या मूळ वेतनात १९ टक्के व सर्व भत्त्यांमध्ये २५ टक्के वाढ देण्यात येत असल्याचे तसेच ऊर्जा विभागाच्या अधिपत्याखालील वीज कंपन्यांच्या
बारामती, पुरंदर, शिरूरमधील बारवांची स्वच्छता, सेवावर्धीनीच्या स्वयंसेवकांचे श्रमदान
पुणे, दि. १० जुलै : बारामती तालुक्यातील सुपे येथील ऐतिहासिक राखुंडी विहीर आणि स्वयंभू श्री सिद्धेश्वर महादेव मंदिरातील पायऱ्या असलेल्या विशिष्ट विहिरींची श्रमदानाने स्वच्छता केल्याने स्वच्छ पाण्याने विहिरी आणि परिसर खुलला आहे. पुण्यातील सेवावर्धिनी संस्थेच्या स्वयंसेवकांनी हा उपक्रम राबविला आहे. सेवावर्धीनीच्या वतीने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर बारव पुनरुज्जीवन व पुनर्वापर प्रकल्पांतर्गत विहिरी स्वच्छतेचा उपक्रम राबवला जात
धर्मवीर गडावर वृक्षारोपण करुन दुर्गदिन साजरा
पुणे, दि. 8 जुलै : ज्येष्ठ कादंबरीकार व दुर्गमहर्षी गो. नी. दांडेकर यांनी ऐतिहासिक दुर्ग वैभवाचा परिचय महाराष्ट्राला करून दिला. म्हणून त्यांची पुण्यतिथी गडप्रेमीं कडून “दुर्गदिन” म्हणून साजरी केली जाते. या वर्षी गोनीदांच्या 25 व्या पुण्यतिथीला इतिहास प्रेमी मंडळ आणि श्री शिवदुर्ग संवर्धन संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने धर्मवीरगड (बहादुर गड) येथे 30 चिंचेच्या झाडांचे वृक्षारोपण
जिहादी हल्ल्यांपासून संरक्षणासाठी पुण्यातील 5000 हिंदू शस्त्रास्त्र परवाना मागणार
जिहादी हल्ल्यापासून जीव वाचवण्यासाठी हिंदूंना शस्त्र परवाना तातडीने मिळावा, ‘एलआरओ’ची मागणी पुणे, दि. 8 जुलै : पुण्यात गेल्या काही दिवसांपासून पूर्व पुण्यात येरवडा, वडगाव शेरी, लोहियानगर, नागपूर चाळ, विमाननगर परिसरात हिंदूंवरील जिहादी हल्ल्यांत वाढ झाल्याचे दिसत आहे. त्यातही हिंदू-मुस्लिम एकत्र राहात असलेल्या वस्त्यांमध्ये हिंदूंना ठरवून लक्ष्य केले जात आहे. या पार्श्वभूमीवर अशा वस्तीत राहणाऱ्या हिंदूंना
विधान भवनात साजरा झाला ‘मिलेट महोत्सव – २०२४’
मुंबई, दि. ४ जुलै : यंदाचे वर्ष हे मिलेट वर्ष आहे. त्यामुळे विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशन दरम्यान आज विधान भवनातील कँटीनमध्ये खास ”मिलेट महोत्सव – २०२४”चे आयोजन करण्यात आले होते. विधिमंडळातील सर्व आमदारांसाठी मिलेट म्हणजे कडधान्य, भरडधान्य यापासून बनलेले जेवणही ठेवण्यात आले होते. यावेळी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्व आमदार सहकाऱ्यांच्या साथीने या भोजनाचा आस्वाद
कौशिक आश्रम’ म्हणजे सेवाव्रतींचा मुक्ताश्रम : भैय्याजी जोशी
पुनर्निर्माणाच्या भूमिपूजनप्रसंगी व्यक्त केल्या भावना पुणे, दि. २ जुलै : “‘कौशिक आश्रम’ हा काही पथिक आश्रम, वृद्धाश्रम अथवा वैद्यकीय सेवेचे ठिकाण नसून, तो एक मुक्ताश्रम आहे. गेल्या काही वर्षांपासून अधिक संख्येने ज्येष्ठ सेवाव्रतींची सोय करण्याची गरज निर्माण झाल्याने जुन्या वास्तूच्या जागी एक मोठी वास्तू उभारावी या विचाराने याच्या पुनर्निर्माणाचा निर्णय घेण्यात आला आहे,” असे प्रतिपादन
सुजाता सौनिक झाल्या राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव
मुंबई, दि. ३० जून : राज्याच्या मुख्य सचिवपदाची सूत्रे सुजाता सौनिक यांनी मावळते मुख्य सचिव डॉ. नितीन करीर यांच्याकडून आज स्वीकारली. राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव होण्याचा मानही श्रीमती सौनिक यांना मिळाला आहे. त्या १९८७ बॅचच्या आय.ए.एस. अधिकारी आहेत. सध्या त्या महाराष्ट्र शासनाच्या गृह विभाग आणि सामान्य प्रशासन विभागात अतिरिक्त मुख्य सचिव म्हणून कार्यरत होत्या.
विठुनामाच्या गजरात ज्ञानोबा-तुकोबांच्या पालख्या पुण्यात दाखल
दोन दिवस पुणे भक्तिरसात न्हाऊन निघणार कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज व जगद्गुरू तुकाराम महाराज यांच्या पालख्यांचे आज पुण्यनगरीत आगमन झाले. अखंड विठ्ठलनामाचा गजर करत लाखो वारकरी पायी चालत पालखीसोबत पुण्यात दाखल झाले. आज व उद्या दोन दिवस दोन्ही पालख्यांचे मुक्काम पुण्यात असणार आहेत. पुणेकरांना या दोन्ही संतांच्या सहवासाचे भाग्य लाभणार आहे. या
महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या विद्यार्थी निवडणुकीत अखिल भारतीय विद्यार्थी परिषद व निमा संघटनेचा बिनविरोध विजय
पुणे, दि. २८ जून : महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या निवडणुकीत अखिल भारतीय विद्यार्थी परिषद (अभाविप) व निमा विद्यार्थी संघटनेने अभूतपूर्व बिनविरोध विजय मिळवला आहे. या निवडणुकीत सर्व ९ उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. विद्यार्थी संघटनेच्या नेतृत्वात उमेदवारांनी आपले यश संपादन केले आणि संपूर्ण विद्यापीठात एकजुटीचा संदेश दिला आहे. या विजयामुळे विद्यापीठाच्या शैक्षणिक आणि सहशैक्षणिक क्रियाकलापांमध्ये
राज्यसभा पोटनिवडणूक : सुनेत्रा पवार यांची बिनविरोध निवड
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या बारामती लोकसभा उमेदवार राहिलेल्या सुनेत्रा पवार यांनी आज राज्यसभा उमेदवारीचा अर्ज भरला. पक्षाचे नेते प्रफुल पटेल यांच्या रिक्त झालेल्या जागेवर ही पोटनिवडणूक झाली. मात्र यावेळी सुनेत्रा पवार यांच्या व्यतिरिक्त अन्य कोणाचाही अर्ज न आल्यामुळे सुनेत्रा पवार बिनविरोध निवडून आल्या आहेत. आज हा अर्ज दाखल करत असताना प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, छगन भुजबळ