बातम्या
सेवा भारतीतर्फे वायनाडमध्ये बचावकार्य
आपत्कालीन मदतीपासून ते अत्यंसंस्कारापर्यंत स्वयंसेवकांची मदत मदत कार्यात दोन संघ स्वयंसेवकांचे बलिदान पुणे : केरळच्या वायनाड जिल्ह्यामध्ये 30 जुलै रोजी भूस्खलनामुळे 300 हून अधिक नागरिकांना प्राण गमवावे लागले आहेत. सैन्य, एनडीआरएफ आणि स्वयंसेवी संस्थांद्वारे युद्धपातळीवर मदतकार्य चालू असून, सेवा भारतीच्या वतीनेही अन्नधान्य वाटपापासून ते अत्यंसंस्कारापर्यंतची विविध मदतकार्य केली जात आहे. मदतकार्य सुरु असताना नागरिकांना
छोटे शेतकरी हेच भारताच्या अन्नसुरक्षेची सर्वात मोठी ताकद – पंतप्रधान
तब्बल 65 वर्षांच्या कालखंडानंतर भारतात प्रथमच कृषी अर्थतज्ज्ञांच्या 32व्या आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन देशभरातील 120 दशलक्ष शेतकरी, 30 दशलक्षाहून अधिक महिला शेतकरी, 30 दशलक्ष मच्छिमार, 80 दशलक्ष पशुपालक यांच्या वतीने पंतप्रधानांनी केले प्रतिनिधींचे स्वागत नवी दिल्ली, 3 ऑगस्ट : कृषी क्षेत्र हे भारताच्या आर्थिक धोरणांच्या केंद्रस्थानी आहे. भारतात छोट्या शेतकऱ्यांचे प्रमाणे 90 टक्के आहे, त्यांच्याकडची शेतजमीन
पूरग्रस्तांच्या मदतीसाठी धावले संघ स्वयंसेवक
सेवा भारती आणि विविध संघटनांच्या मदतीने मदतकार्य पुणे : अतिवृष्टीमुळे पुण्यातील नदीपात्रालगतच्या वस्तीत पाणी शिरले होते. त्यामुळे शेकडो कुटुंबांची अक्षरशः वाताहात झाली. पूरस्थितीचे गांभीर्य ओळखून संघ स्वयंसेवक त्यांच्या मदतीसाठी धावले. नागरिकांना सुरक्षित स्थळी नेण्यापासून ते साहित्य वाटपापर्यंत अनेक कामे स्वयंसेवकांनी विविध संघटनांच्या मदतीने केली. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, सेवा भारती आणि विविध सामाजिक संघटनांच्या सहकार्याने पूरग्रस्तांपर्यंत
छत्रपतीं शिवरायांमुळे देशात राष्ट्रप्रेमाचे स्फुल्लिंग : सरकार्यवाह दत्तात्रय होसबाळे
छत्रपती शिवाजी महाराजांवरील आठ पुस्तकांचे दिल्लीत प्रकाशन नवी दिल्ली : ‘छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेताच मनात राष्ट्रप्रेमाचे स्फुल्लिंग जागृत होते. गुलामगिरी कशी झुगारून द्यावी याचा आदर्श शिवाजी महाराज होते. त्यांचे जीवन केवळ भारतीयांसाठी नव्हे तर परदेशातीलही गुलामगिरीविरूद्धच्या लढ्यासाठी प्रेरणादायी ठरले आहे’, असे मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकार्यवाह दत्तात्रय होसबाळे यांनी व्यक्त केले. नवी दिल्ली येथे
बायडेन यांची अमेरिकी राष्ट्राध्यक्षपदाच्या शर्यतीतून माघार
कमला हॅरिस यांच्या नावाची पक्षाकडे केली शिफारस वॉशिंग्टन, दि. २१ जुलै : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांनी आज आगामी निवडणुकीतून आपण माघार घेत असल्याचे जाहीर केले. राष्ट्राला संबोधत त्यांनी एक पत्र आज जारी केले. त्यामध्ये त्यांनी ही घोषणा केली. गेल्या साडेतीन वर्षांपासून अमेरिकेच्या जनतेने आपल्याला साथ दिल्याबद्दल त्यांनी अमेरिकेच्या जनतेचे आपल्या पत्रातून आभार मानले. इतिहासात
अवघे गर्जे पंढरपूर | चालला नामाचा गजर
राज्यातील लाखो भाविकांच्या आगमनाने फुलली पंढरी पंढरपूर, 16 जुलै : आषाढी एकादशीच्या सोहळ्यामध्ये सहभागी होण्यासाठी राज्यातील विविध भागांसह, गोवा, कर्नाटक व तेलंगणा राज्यातील लाखो भाविकांच्या आगमनाने पंढरी नगरी फुलून गेली आहे. यंदा आषाढी नवमीच्या दिवशी सुमारे ५ लाखाहून अधिक भाविक विठ्ठल नगरीमध्ये दाखल झाले असून आषाढी एकादशीच्या दिवशी तर विक्रमी गर्दी होण्याची शक्यता आहे. दरम्यान
वीज कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित पगारवाढीचा प्रश्न सुटला, तब्बल दीड हजार कोटींची पगारवाढ जाहीर
उपमुख्यमंत्री व ऊर्जामंत्री देवेद्र फडणवीस यांच्यासमवेत यशस्वी वाटाघाटी मुंबई, दि. ७ जुलै : महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी लि., महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी लि., महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी लि. आदींमधील अधिकारी व कर्मचारी यांच्या मूळ वेतनात १९ टक्के व सर्व भत्त्यांमध्ये २५ टक्के वाढ देण्यात येत असल्याचे तसेच ऊर्जा विभागाच्या अधिपत्याखालील वीज कंपन्यांच्या
बारामती, पुरंदर, शिरूरमधील बारवांची स्वच्छता, सेवावर्धीनीच्या स्वयंसेवकांचे श्रमदान
पुणे, दि. १० जुलै : बारामती तालुक्यातील सुपे येथील ऐतिहासिक राखुंडी विहीर आणि स्वयंभू श्री सिद्धेश्वर महादेव मंदिरातील पायऱ्या असलेल्या विशिष्ट विहिरींची श्रमदानाने स्वच्छता केल्याने स्वच्छ पाण्याने विहिरी आणि परिसर खुलला आहे. पुण्यातील सेवावर्धिनी संस्थेच्या स्वयंसेवकांनी हा उपक्रम राबविला आहे. सेवावर्धीनीच्या वतीने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर बारव पुनरुज्जीवन व पुनर्वापर प्रकल्पांतर्गत विहिरी स्वच्छतेचा उपक्रम राबवला जात
धर्मवीर गडावर वृक्षारोपण करुन दुर्गदिन साजरा
पुणे, दि. 8 जुलै : ज्येष्ठ कादंबरीकार व दुर्गमहर्षी गो. नी. दांडेकर यांनी ऐतिहासिक दुर्ग वैभवाचा परिचय महाराष्ट्राला करून दिला. म्हणून त्यांची पुण्यतिथी गडप्रेमीं कडून “दुर्गदिन” म्हणून साजरी केली जाते. या वर्षी गोनीदांच्या 25 व्या पुण्यतिथीला इतिहास प्रेमी मंडळ आणि श्री शिवदुर्ग संवर्धन संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने धर्मवीरगड (बहादुर गड) येथे 30 चिंचेच्या झाडांचे वृक्षारोपण
जिहादी हल्ल्यांपासून संरक्षणासाठी पुण्यातील 5000 हिंदू शस्त्रास्त्र परवाना मागणार
जिहादी हल्ल्यापासून जीव वाचवण्यासाठी हिंदूंना शस्त्र परवाना तातडीने मिळावा, ‘एलआरओ’ची मागणी पुणे, दि. 8 जुलै : पुण्यात गेल्या काही दिवसांपासून पूर्व पुण्यात येरवडा, वडगाव शेरी, लोहियानगर, नागपूर चाळ, विमाननगर परिसरात हिंदूंवरील जिहादी हल्ल्यांत वाढ झाल्याचे दिसत आहे. त्यातही हिंदू-मुस्लिम एकत्र राहात असलेल्या वस्त्यांमध्ये हिंदूंना ठरवून लक्ष्य केले जात आहे. या पार्श्वभूमीवर अशा वस्तीत राहणाऱ्या हिंदूंना