बातम्या
“जगाला डाव्यांच्या संकटापासून मुक्त करण्याचे भारतावर दायित्व”: डॉ. मोहन जी भागवत
अभिजित जोग यांच्या पुस्तकाचे प्रकाशन सांस्कृतिक मार्क्सवादाच्या नावाखाली डाव्या विचारसरणीच्या लोकांनी जगभर विध्वंस सुरू केला असून, डाव्यांच्या या संकटापासून जगाला मुक्त करण्याचे दायित्व भारतावरच आहे, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी आज येथे केले. लेखक अभिजित जोग यांच्या ‘जगाला पोखरणारी डावी वाळवी’ या पुस्तकाचे प्रकाशन डॉ. भागवत यांच्या हस्ते सिम्बॉयोसिस विश्वभवन
पंतप्रधानांनी मराठवाडा मुक्ती दिनाच्या नागरिकांना दिल्या शुभेच्छा
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नागरिकांना मराठवाडा मुक्ती दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. स्वातंत्र्यलढ्यात प्राणांची आहुती देणाऱ्या हुतात्म्यांचा अदम्य ध्यास आणि शौर्याचेही त्यांनी स्मरण केले आहे. X समाज माध्यमावर पोस्ट केलेल्या संदेशात पंतप्रधान म्हणाले : “मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाच्या शुभेच्छा. मराठवाडा मुक्तिसंग्रामामध्ये आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या सर्वांच्या स्वातंत्र्यप्राप्तीच्या अदम्य ध्यासाचे आणि शौर्याचे स्मरण करतो. या भूमीसोबत आणि येथील
“समाजाच्या सर्व क्षेत्रांत महिलांचा सहभाग वाढवण्यासाठी संघप्रेरित संस्था काम करणार” – डॉ. मनमोहनजी वैद्य
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अखिल भारतीय समन्वय बैठक समारोपप्रसंगी सहसरकार्यवाहांनी दिली माहिती समाज परिवर्तनामध्ये महिलांची भूमिका महत्त्वाची आहे, त्यामुळे समाजाच्या सर्व क्षेत्रांत महिलांचा सहभाग वाढवण्यासाठी संघप्रेरित संस्था काम करणार आहेत. संघाच्या अखिल भारतीय समन्वय बैठकीमध्ये याबाबत चर्चा झाली, अशी माहिती राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सहसरकार्यवाह डॉ. मनमोहन वैद्य यांनी शनिवारी दिली. संघाच्या तीन दिवसीय समन्वय बैठकीचा समारोप
राष्ट्रउभारणीच्या कार्यात प्रसार माध्यमांची भूमिका महत्वाची असून त्यांच्यामध्ये वैचारिक मंथन
बारामतीच्या माध्यम संवाद परिषदेत उमटला सूर बारामती, १७ सप्टेंबर २०२३ : विश्व संवाद केंद्र, पुणे आणि तुळजाराम चतुरचंद महाविद्यालय, बारामती यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित माध्यम संवाद परिषद मोठ्या उत्साहात पार पडली. या कार्यक्रमासाठी जगद्गुरु तुकाराम महाराज यांचे ११ वे वंशज ह.भ. प. शिरीष महाराज मोरे, अनेकान्त एज्युकेशन सोसायटीचे राहुलशेठ वाघोलीकर, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते दिपकजी पेशवे
मराठा आरक्षणासाठी सरकार कटिबद्ध – मुख्यमंत्री
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीनंतर मनोज जरांगे यांचे आमरण उपोषण सुटले जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी उपोषणास बसलेल्या मनोज जरांगे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत सरबत घेऊन उपोषण सोडले. याबाबत मुख्यमंत्र्यांनी सर्वांना धन्यवाद दिले. यावेळी केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे, महसूल मंत्री राधाकृष्ण विखे- पाटील, ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन, उद्योग मंत्री उदय
काँग्रेसप्रणित ‘इंडी’ आघाडीकडून पुन्हा एकदा माध्यमांची गळचेपी, ‘प्रश्न विचारणाऱ्या’ पत्रकार-संपादकांवर बहिष्कार
माध्यम स्वातंत्र्य, अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाने नेहमी गळे काढणाऱ्या… मोदी-शाहांना हिटलर, हुकुमशाह म्हणणाऱ्या… उजव्या विचारसरणीच्या लोकांना प्रश्न नको असतात असा आरोप करणाऱ्या… सर्व डाव्या, तथाकथित पुरोगामी पक्ष आज पत्रकार-संपादकांची यादी जाहीर करून त्यांच्यावर बहिष्कार टाकत असल्याची घोषणा केली आहे. इंडी आघाडीची बैठक काल राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या दिल्ली येथील निवासस्थानी झाली. त्यानंतर सर्व पक्षांद्वारे
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अखिल भारतीय समन्वय बैठकीला पुण्यात प्रारंभ
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अखिल भारतीय समन्वय बैठकीला आज सकाळी ९ वाजता पुण्यात सुरूवात झाली. सरसंघचालक डॉ. मोहन भागवत आणि सरकार्यवाह दत्तात्रेय होसबाळे यांच्या हस्ते भारतमातेच्या प्रतिमेला पुष्पार्चन करून बैठकीस प्रारंभ झाला. बैठकीस ३६ संघटनांचे एकूण २६७ प्रमुख पदाधिकारी उपस्थित असून त्यातील ३० महिला आहेत. बैठकीस उपस्थित असलेल्यांमध्ये प्रामुख्याने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सर्व सह सरकार्यवाह डॉ.
ओबीसींच्या आरक्षणासाठी राष्ट्रवादीच्या देशमुखांचा मोर्चा
राज्यात सध्या सुरू असलेल्या आरक्षणाच्या मुद्द्याचा राजकीय फायदा सर्वच राजकीय पक्ष उठवू पाहात आहेत. ओबीसी, मराठा, धनगर, कुणबी अशा विविध समाजघटकांनी आरक्षणासाठी मोर्चे काढायला सुरुवात केली आहे. हजारोंनी समाजबांधव रस्त्यावर उतरत आहेत. स्वाभाविकच याचा राजकीय फायदा घेण्यासाठी राजकीय पक्षांनीही बाह्या सरसावलेल्या दिसत आहेत. वर्धा जिल्ह्यातील समुद्रपूर येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा एल्गार मोर्चा आयोजित करण्यात आला
एलियन्स … कल्पना नव्हे वास्तव ! मेक्सिकोच्या संसदेत अवतरले एलियन्स
गेल्या अनेक दशकांपासून पृथ्वीवरील मानवाला असे वाटत आले आहे की या विश्वात अन्यही काही जीव आहेत जे आपल्याला पाहात आहेत. कोणी त्याला एलियन्स म्हणतात तर कोणी परग्रहवासी. हाच विषय घेऊन अनेक कथा-कादंबऱ्या लिहिल्या गेल्या, चित्रपट बनले पण तरीही सामान्य माणसाला मात्र या सर्व भाकडकथाच वाटत आल्या आहेत. मात्र आज या सर्वांना छेद देणारी घटना घडली
‘आयुष्मान भव:’ मोहिमेत महाराष्ट्र उत्कृष्ट काम करून दाखवेल – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
आपल्याकडे निरोगी आयुष्यासाठी ‘आयुष्मान भव:’ असा आशीर्वाद दिला जातो. या भावनेतून देशवासीयांच्या निरोगी आयुष्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या ‘आयुष्मान भव:’ मोहिमेची सुरूवात राज्यभर करणार आहोत. या मोहिमेत महाराष्ट्र देशामध्ये उत्कृष्ट काम करून नागरिकांना उत्तम आरोग्य सेवा उपलब्ध करून देईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे दिली. ‘आयुष्मान भव:’ मोहिमेचा राष्ट्रपती द्रौपदी

