बातम्या
नोकरदार महिलांच्या सुरक्षिततेकरिता महाराष्ट्र राज्य महिला आयोग आयोग कटिबद्ध : रूपाली चाकणकर
पुणे, दि. ७ : महिलांना सुरक्षितता देण्यासाठी असलेल्या कामाच्या ठिकाणी लैंगिक छळ (प्रतिबंध, मनाई, निवारण) २०१३ या कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी आणि पर्यायाने नोकरदार महिलांच्या सुरक्षिततेकरिता महाराष्ट्र राज्य महिला आयोग कटिबद्ध असल्याचे आयोगाच्या अध्यक्ष रूपाली चाकणकर यांनी सांगितले. महाराष्ट्र राज्य महिला आयोग आणि एव्हीके पॉश ऍडव्हायझरी सर्व्हिसेस यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित पॉश कायदा जनजागृती कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी
सणासुदीच्या काळात महिलांची सुरक्षा हीच खरी संस्कृतीची ओळख : डॉ. नीलम गोऱ्हे
संवेदनशील प्रश्नांवर उपाय शोधताना स्त्री आधार केंद्राची भूमिका उल्लेखनीय : डॉ. पंकज देशमुख पुणे, दि. २ ऑगस्ट : महिलांच्या समस्यांवर गेल्या ४० वर्षांपासून काम करणाऱ्या स्त्री आधार केंद्राच्या अध्यक्षा आणि विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या अध्यक्षतेखाली पुण्यामध्ये महिलांच्या सुरक्षिततेसंदर्भात एक महत्त्वपूर्ण प्रशिक्षण कार्यशाळा नुकतीच पार पडली. सार्वजनिक सणांच्या वेळी महिलांच्या सुरक्षेची खात्री करण्यासाठी
कृतीतून माणुसकी व एकजुटीचा मंत्र देणारा मार्गदर्शक हरपला : रतन शारदा
पुणे, दि. २ ऑगस्ट : आपले जीवन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यासाठी सुनीलराव खेडकर यांनी समर्पित केले. त्यांचे संघटन कौशल्य, संवाद कौशल्य आणि प्रत्येक कामाचा पाठपुरावा करण्याची त्यांची वृत्ती ही आपल्या सर्वांसाठी प्रेरणादायी आहे. आपल्या कृतीतून माणुसकी आणि संघातून एकजुटीचा मंत्र देणारा मार्गदर्शक हरपला आहे पण त्यांचे समर्पण आपल्याला कार्याची प्रेरणा देते असे मत प्रसिद्ध लेखक
सेवाकार्यातूनच समरस समाज उभा राहील – दिलीप क्षीरसागर
सरस्वती मंदिर संस्थेतर्फे सुनीता रामचंद्र गोडबोले यांना जीवनगौरव पुरस्कार प्रदान पुणे, दि. १ ऑगस्ट : राष्ट्राला आपोआप परमवैभव प्राप्त होणार नाही. त्यासाठी सेवाकार्य ही पूर्वअट आहे. अशा सेवाकार्यांतूनच समरस समाज उभा राहील, असे प्रतिपादन रा. स्व. संघाचे पश्चिम महाराष्ट्र प्रांत कार्यकारिणी सदस्य दिलीप क्षीरसागर यांनी केले. सरस्वती मंदिर संस्थेच्या वतीने बस्तर (छत्तीसगड) या आदिवासीबहुल भागात
कौशिक आश्रमच्या शिबिरात 384 जणांचे रक्तदान
पुणे, २७ जुलै : कौशिक आश्रम आणि अक्षय सेवा संशोधन प्रतिष्ठान या संस्थांच्या वतीने रविवारी आयोजित रक्तदान शिबिरात ३८४ जणांनी रक्तदान केले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे चौथे सरसंघचालक प्रो. राजेंद्रसिंहजी उर्फ रज्जूभय्या यांच्या स्मृतिदिनानिमित्त प्रतिवर्षी हे शिबिर आयोजित करण्यात येते. मित्रमंडळ कॉलनीतील कौशिक आश्रम येथे हे शिबिर भरवण्यात आले होते. ज्येष्ठ ग्रामीण साहित्यिक बबन पोतदार, प्रथितयश
आपत्तीला तोंड देण्यासाठी एकात्म आणि जागरुक समाजाची आवश्यकता
महापालिका आयुक्त नवलकिशोर राम यांचे प्रतिपादन पुणे, दि. १२ : “निसर्गात बदल हे होतच राहणार त्यामुळे आपत्ती ही अपरिहार्य आहे. त्या अनुभवातून धडा घेऊन मूलगामी उपाय करण्याची गरज आहे. त्यासाठी एकात्म आणि जागरुक समाजाची आवश्यकता आहे. लोभ ही आपत्ती व्यवस्थापन करताना येणारी सर्वात मोठी अडचण असून संतुलित जीवन पद्धती हाच त्यावरील उपाय आहे. आपत्ती व्यवस्थापनाचा
युवकांना रोजगारक्षम करण्यासाठी उद्योगांनी पुढे यावे : मंगलप्रभात लोढा
पुणे, दि. १३ : उद्योग आणि राज्य शासन मिळून मोठ्या संख्येने युवकांना कौशल्य प्रशिक्षण देऊन रोजगारक्षम करणे शक्य आहे. त्यासाठी उद्योगांनाही मोठ्या प्रमाणात प्रशिक्षित मनुष्यबळाची आवश्यकता असतानाच तसेच एक सामाजिक जबाबदारी म्हणून युवकांना कौशल्य पुरविण्यासाठी पुढे यावे, असे आवाहन राज्याचे कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाचे मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी केले. महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स,
देशी गोवंशाच्या संरक्षण, संवर्धन व प्रचारासाठी व्यापक जनजागृती आवश्यक : सहकार मंत्री बाबासाहेब पाटील
देशी गोवंश जतन व संवर्धन सप्ताहाचा सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांच्या हस्ते शुभारंभ पुणे, दि. १४ : देशी गोवंशाच्या संरक्षण, संवर्धन व प्रचारासाठी व्यापक जनजागृती आवश्यक्य असल्याचे प्रतिपादन राज्याचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी पुणे येथे केले. डॉ. शिरनामे सभागृह, कृषी महाविद्यालय, पुणे येथे महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी आयोजित “देशी गोवंश जतन व संवर्धन
महिला जनसुनावणीच्या माध्यमातून पिडीत महिलांच्या चेहऱ्यावरील आनंद द्विगुणित करण्याचे काम : राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर
पुणे, दि. २ : राष्ट्रीय महिला आयोगाकडे प्राप्त झालेल्या तक्रारीचे जलद आणि प्रभावी निराकरण करण्यासाठी महिला जनसुनावणीचे आयोजन करण्यात येत असून प्रशासनाच्या माध्यमातून पिडीत महिलांना न्याय मिळवून देत त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद द्विगुणीत करण्याचे काम करण्यात येत आहे, असे प्रतिपादन राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांनी केले. जिल्हाधिकारी कार्यालय येथे आयोजित ‘महिला जन सुनावणी’ प्रसंगी
माऊलींचा सोहळा माळशिरस मुक्कामी
अश्वांच्या नेत्रदीपक दौडीने वारकऱ्यांत नवचैतन्य माळशिरस, दि. १ जुलै : आसमंत व्यापून टाकणारा चैतन्य स्वरूप टाळमृदुंगाचा नाद व त्यातून निर्माण होणारे माऊलीऽ माऊलीऽऽ नामाचे नादब्रह्म या सर्वांचा संगम म्हणजे रिंगण होय. वैष्णवांच्या या नादब्रह्माने जणु विठ्ठलाचे गोपुर निनादल्याचा भास झाला. पुरंदावडे गावच्या हद्दीत अश्वांनी नेत्रदिपक दौड करून लाखो वैष्णवांच्या डोळ्याचे पारणे फेडले. सायंकाळी हा सोहळा

