बातम्या
बाल स्वास्थ्य योजना ठरली संजीवनी, श्रवणशक्ती मिळाल्यानं आयुष्य पालटलं!
साडेपाच वर्षाच्या रूदुराज गांगुर्डेला जन्मत: दोन्ही कानांनी ऐकू येत नव्हते. खासगी रुग्णालयात त्याच्या कानाच्या शस्त्रक्रियेचा खर्च सुमारे सहा लाखापर्यंत होता. त्याच्या उपचाराची आम्हाला चिंता सतत सतावत होती. मात्र आमच्या मदतीला राष्ट्रीय बाल स्वास्थ्य अभियानाची योजना देवदूतासारखी धावून आली. या योजनेच्या माध्यमातून पुण्याच्या खाजगी हॉस्पिटलमध्ये काँक्रिलियर इम्प्लांटची अवघड शस्त्रक्रिया मोफत करण्यात आली. यामुळे माझ्या रुदुराजला
नवयुवकांना सैन्य दलात करिअर करण्यासाठी प्रोत्साहन द्यावे : मिलिंद वाईकर
अखिल भारतीय पूर्व सैनिक सेवा परिषद पुणे महानगरतर्फे पुण्यात वीर नारी, वीर पत्नी व वीर मातांसाठी सामाजिक रक्षाबंधन पुणे : “वीर पत्नी,वीर मातांसाठी सामाजिक रक्षाबंधन कार्यक्रम आयोजित करून अखिल भारतीय पूर्व सैनिक सेवा परिषदेने समाजभान ठेऊन एक आदर्श निर्माण केला आहे.सैनिक सीमेवर जीवावर उदार होऊन लढत असतो त्यांचे मनोबल वाढविण्यासाठी असे उपक्रम घेतले पाहिजे,”असे प्रतिपादन
संघाची अखिल भारतीय समन्वय बैठक १४ ते १६ सप्टेंबर दरम्यान पुण्यात
पुणे – दि. 4 सप्टेंबर – राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची दरवर्षी होणारी अखिल भारतीय समन्वय बैठक या वर्षी महाराष्ट्रातील पुणे येथे आयोजित करण्यात येत आहे. तीन दिवसांची ही समन्वय बैठक 14-15-16 सप्टेंबर 2023 रोजी होणार आहे. अखिल भारतीय पातळीवरची ही व्यापक समन्वय बैठक वर्षातून एकदा आयोजित होते. या बैठकीत पूजनीय सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत, माननीय
एम.ई.एस इंग्लिश मिडियम स्कूलच्या वतीने भव्य वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न
शिरवळ: एम.ई.एस इंग्लिश मिडीयम स्कूल व ज्युनिअर कॉलेज, शिरवळ आणि ग्रामपंचायत शिरवळ यांच्या संयुक्त विद्यमाने सामाजिक बांधिलकी जपत शिरवळ परिसरात ७५ हून अधिक देशी वृक्ष लावण्यात आले. आगामी काळात या सर्व वृक्षांच्या संवर्धनाचे नियोजनही शाळेमार्फतच केले जाणार असल्याची माहिती शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. स्वाती जोशी यांनी दिली. वृक्षारोपणाच्या या कार्यक्रमासाठी शिरवळ ग्रामपंचायतीचे शिरवळ विशेष सहकार्य लाभले.
अस्पृश्यता ही विकृतीच; ही विकृती दूर करण्यासाठी समाज एकत्रित येण्याची गरज – भैय्याजी जोशी
नागपूर,ता.३. : अस्पृश्यता ही सर्वात मोठी विकृती आहे. ही विकृती दूर करण्यासाठी सर्व समाज एकत्रित होण्याची गरज आहे. सर्व समाज एक झाला तर समाज शक्तिशाली होईल, समाज शक्तिशाली झाला तर राष्ट्र शक्तिशाली होईल, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी सरकार्यवाह भैय्याजी जोशी यांनी केले. विश्व हिंदू परिषद, सामाजिक समरसता अभियान तर्फे देवजी रावत लिखित ‘अस्पृश्यता
आशिया चषक क्रिकेट स्पर्धा आजपासून पाकिस्तान आणि श्रीलंकेत
आशिया चषक क्रिकेट स्पर्धेला आजपासून सुरुवात होत आहे. पाकिस्तान आणि श्रीलंका यांच्या संयुक्त विद्यमाने होणारी ही स्पर्धा १७ सप्टेंबरपर्यंत चालणार आहे. पाकिस्तान आणि नेपाळ यांच्यात मुलतान इथं पहिला सामना सुरू झाला. यात नाणेफेक जिंकून पाकिस्ताननं फलंदाजीचा निर्णय घेतला आहे. भारताचा पहिला सामना शनिवारी पाकिस्तानशी श्रीलंकेतील कँडी इथं होणार आहे. पहिल्या गटात पाकिस्तान, भारत आणि नेपाळ
देशभरात रक्षाबंधन आणि नारळी पौर्णिमेच्या सणाचा उत्साह
बहिण-भावाच्या अतूट प्रेमाची साक्ष जपणारा राखी पौर्णिमेचा सण आज देशभरात उत्साहात साजरा होत आहे. राष्ट्रपती, उपराष्ट्रपती आणि प्रधानमंत्र्यांनी नागरिकांना रक्षाबंधनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. हा सण बहीण भावाच्या प्रेमाच्या नात्याचं प्रतीक असून बहीण, भावाच्या आरोग्यासाठी, आनंदासाठी आणि भरभराटीसाठी प्रार्थना करते, असं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांनी शुभेच्छा संदेशात म्हटलं आहे. रक्षाबंधनाचा सण बहिण-भावाचं प्रेम आणि विश्वासाचं द्योतक
भारतीय भू-भागावर दावा सांगणारा चीननं प्रकाशित केलेला नकाशा भारतानं फेटाळला
भारताच्या हद्दीवर दावा सांगणारा नकाशा चीननं प्रसिद्ध केला आहे. परराष्ट्र मंत्री डॉ. एस. जयशंकर यांनी चीनचा हा दावा फेटाळून लावला आहे. असे दावे केल्यानं कुठलाही भुभाग एखाद्या देशाचा होत नसल्याचं त्यांनी सांगितलं. चीनला असे नकाशे प्रसिद्ध करण्याची सवय आहे. चीननं नकाशात दाखवलेला भारताचा भुभाग हा भारताचाच असल्याचं त्यांनी खासगी वृत्त वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं आहे.