बातम्या
देशांतर्गत विमान सेवेच्या प्रवासी संख्येत लक्षणीय वाढ
वर्ष २०२३ च्या पहिल्या आठ महिन्यांत देशांतर्गत विमान वाहतूक उद्योगाने प्रवासी वाहतुकीत लक्षणीय वाढ अनुभवली आहे. ताज्या उपलब्ध माहितीनुसार, जानेवारी ते ऑगस्ट २०२३ या कालावधीत देशांतर्गत विमान कंपन्यांकडून प्रवासी वाहतूक करणाऱ्यांची संख्या ११९०.६२ लाखांपर्यंत पोहोचली आहे, ज्यामुळे गेल्या वर्षीच्या याच कालावधीच्या तुलनेत प्रवासी संख्येत ३८.२७% ची लक्षणीय वाढ झाली आहे. केवळ एका ऑगस्ट २०२३ महिन्यात
ऐतिहासिक ‘नारी शक्ती वंदन अधिनियम’ लोकसभेत मंजूर
अनेक दशके प्रलंबित असलेले विधेयक ४५४ विरुद्ध २ मतांनी पारित गेल्या अनेक दशकांपासून प्रलंबित असलेले महिला आरक्षण विधेयक आज लोकसभेत बहुमताने मंजूर झाले. लोकसभा आणि राज्यांच्या विधानसभांमध्ये महिलांना एक तृतीयांश आरक्षणाची तरतूद या विधेयकात आहे. काल नवीन संसद भवनाच्या उद्घाटनानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याबाबत आपल्या भाषणातून सूचित केल्यानंतर केंद्रीय विधी व न्यायमंत्री अर्जुनराम मेघवाल
श्रीनगर येथील लाल चौकातील गणेशोत्सव मंडळास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट
जम्मू काश्मीरवरची सर्व प्रकारची विघ्ने दूर होऊ दे! – मुख्यमंत्र्यांची प्रार्थना श्रीनगर, दि. 18 : काश्मीरच्या दोन दिवसाच्या दौऱ्यावर आलेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज श्रीनगर येथील लाल चौकातील गणेशोत्सव मंडळाला भेट दिली. येथील स्थानिक मराठी सोनार समाजामार्फत गेल्या 24 वर्षांपासून येथे सार्वजनिक गणेशोत्सव साजरा केला जातो. मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी मंडळास गणेशमूर्ती भेट दिली.
‘ऑपरेशन विजय’ मधील शहिदांचा पराक्रम ऊर्जा आणि प्रेरणादायी – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
कारागिलमधील द्रास युद्ध स्मारकाला मुख्यमंत्र्यांची भेट; शहिदांच्या स्मृतीस अभिवादन मुंबई, दि. 18 : द्रास येथील युद्ध स्मारकाला भेट दिल्यावर आणि आपल्या शूर सैनिकांच्या पराक्रमाची गाथा जाणून घेतल्यानंतर खूप अभिमान वाटला. द्रास युद्ध स्मारकाला दिलेली भेट प्रेरणादायी आणि ऊर्जा देणारी असून देशभक्तीची भावना अधिक वृद्धिंगत करणारी आहे, या शब्दात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या भावना व्यक्त
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून गणेशोत्सवाच्या शुभेच्छा
महाराष्ट्र सुजलाम्, सुफलाम समृद्ध व्हावा,गणरायांना साकडे; बाप्पांकडून सकारात्मक, नवनिर्मितीची प्रेरणा घेऊया ! मुंबई, दि. १८ :- श्री गणेशाचं आगमन आपल्या सर्वांसाठी आशीर्वादच ठरेल. बाप्पांच्या कृपाछत्रामुळे महाराष्ट्र सुजलाम्, सुफलाम आणि समृद्ध व्हावा, असे साकडे घालत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी श्री गणेश आगमनाच्या पुर्वसंध्येला राज्यातीलच नव्हे, तर जगभरातील गणेश भक्तांना शुभेच्छा दिल्या आहेत. शुभेच्छा संदेशात मुख्यमंत्री शिंदे
आपल्या लोकशाहीचे यश हे “आम्ही भारताचे लोक” चा सामूहिक, एकत्रित प्रयत्न आहे – उपराष्ट्रपती
खुली आणि मोकळी चर्चा हे फुलणाऱ्या लोकशाहीचे वैशिष्ट्य – उपराष्ट्रपती रणनीती म्हणून व्यत्यय आणि अडथळ्यांचा शस्त्रास्त्र म्हणून वापर करण्याचे जनता कधीच समर्थन करणार नाही – उपराष्ट्रपती संविधान सभेत तीन वर्षे चाललेल्या चर्चेने सभ्यता आणि खुल्या चर्चेचे उदाहरण घालून दिले – उपराष्ट्रपती उपराष्ट्रपती आणि राज्यसभेचे सभापती जगदीप धनखड यांनी आज 75 वर्षांच्या संसदीय प्रवासाचे महत्त्व सांगितले
गणेश चतुर्थीच्या पूर्वसंध्येला राष्ट्र्पतींकडून शुभेच्छा
गणेश चतुर्थीच्या पूर्वसंध्येला देशवासियांना दिलेल्या शुभेच्छा संदेशात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी म्हटले आहे:- “गणेश चतुर्थीच्या शुभ प्रसंगी, भारतात आणि परदेशात राहणाऱ्या सर्व भारतीयांना हार्दिक शुभेच्छा देते आणि सदिच्छा व्यक्त करते. गणेश चतुर्थीचा हा उत्सव भगवान श्री गणेशाची जयंती म्हणून साजरा केला जातो जो ज्ञान, विवेक आणि समृद्धीचे प्रतीक आहे. उत्साह, उमेद आणि आनंदाचा हा उत्सव
संसदेच्या विशेष अधिवेशनाला सुरुवात, उद्यापासून नवीन संसदभवनात कामकाज सुरू
संसदेच्या पाच दिवसीय विशेष अधिवेशनाला आजपासून सुरुवात झाली. स्वातंत्र्यपूर्व काळापासून अस्तित्वात असलेल्या संसदेच्या सध्याच्या इमारतीमधून कामकाजाचा आजचा शेवटचा दिवस आहे. आजच्या कामकाजाच्या सुरुवातीला लोकसभा अध्यक्ष ओमप्रकाश बिर्ला यांनी जी20 च्या यशस्वी आयोजनाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अभिनंदन केले. यावर उत्तर देताना पंतप्रधानांनी लोकसभेत यावेळी यांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला व जी20 परिषदेच्या उपलब्धीबाबत विवेचन केले.
“जगाला डाव्यांच्या संकटापासून मुक्त करण्याचे भारतावर दायित्व”: डॉ. मोहन जी भागवत
अभिजित जोग यांच्या पुस्तकाचे प्रकाशन सांस्कृतिक मार्क्सवादाच्या नावाखाली डाव्या विचारसरणीच्या लोकांनी जगभर विध्वंस सुरू केला असून, डाव्यांच्या या संकटापासून जगाला मुक्त करण्याचे दायित्व भारतावरच आहे, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी आज येथे केले. लेखक अभिजित जोग यांच्या ‘जगाला पोखरणारी डावी वाळवी’ या पुस्तकाचे प्रकाशन डॉ. भागवत यांच्या हस्ते सिम्बॉयोसिस विश्वभवन
पंतप्रधानांनी मराठवाडा मुक्ती दिनाच्या नागरिकांना दिल्या शुभेच्छा
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नागरिकांना मराठवाडा मुक्ती दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. स्वातंत्र्यलढ्यात प्राणांची आहुती देणाऱ्या हुतात्म्यांचा अदम्य ध्यास आणि शौर्याचेही त्यांनी स्मरण केले आहे. X समाज माध्यमावर पोस्ट केलेल्या संदेशात पंतप्रधान म्हणाले : “मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाच्या शुभेच्छा. मराठवाडा मुक्तिसंग्रामामध्ये आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या सर्वांच्या स्वातंत्र्यप्राप्तीच्या अदम्य ध्यासाचे आणि शौर्याचे स्मरण करतो. या भूमीसोबत आणि येथील

