बातम्या
“चाईल्ड पोर्नोग्राफी” पाहणे पोक्सो अंतर्गत गुन्हा – सर्वोच्च न्यायालय
ठाणे, 28 सप्टेंबर : सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी एक महत्त्वपूर्ण निर्णय देत स्पष्ट केले आहे की, “चाईल्ड पोर्नोग्राफी” डाऊनलोड करणे, पाहणे किंवा बाळगणे, पोक्सो कायदा आणि माहिती तंत्रज्ञान कायद्यानुसार गुन्हा ठरतो. बालकांचे लैंगिक शोषण ही एक गंभीर विकृती आहे, जी भारतासह संपूर्ण जगासाठी चिंताजनक बाब आहे, असे सर्वोच्च न्यायालयाने या निकालामध्ये स्पष्ट केले आहे. मद्रास उच्च
कृषी पुरस्कारांचे उद्या राज्यपालांच्या हस्ते वितरण – कृषीमंत्री धनंजय मुंडे
मुंबई, दि. २८ : कृषी विभागामार्फत कृषी, फलोत्पादन आणि संलग्न क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शेतकरी, व्यक्ती, संस्था तसेच अधिकारी व कर्मचारी यांचा कृषी पुरस्कार प्रदान करून गौरव करण्यात येणार आहे. रविवार (२९) रोजी सायं. ५ वा. मुंबई येथील नॅशनल स्पोर्ट्स क्लब ऑफ इंडिया (डोम) वरळी येथे आयोजित केल्याची माहिती कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी दिली
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते करमाळा विधानसभा मतदासंघातील विविध विकास कामांचा शुभारंभ
सोलापूर, दिनांक २४ : राज्य शासनाने करमाळा विधानसभा मतदारसंघातील विविध विकास कामांसाठी भरघोस निधी मंजूर केलेला आहे. यामध्ये सोलापूर जिल्हा एकात्मिक पर्यटन विकास आराखडा अंतर्गत 282.75 कोटी निधी असलेली विविध कामे, 34 कोटी 68 लाख निधी मंजूर असलेल्या करमाळा शहरातील नवीन प्रशासकीय इमारत तर करमाळा तालुक्यात हॅम अंतर्गत 271 कोटीच्या रस्ते कामांचा समावेश आहे.
संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान पुरस्कार वितरण सोहळा
गाव आणि मन कायम स्वच्छ ठेवा – पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील छत्रपती संभाजीनगर, दि. २३ : स्वच्छता व त्यामाध्यमातून लोकांचे आरोग्य चांगले राखण्यासाठी संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान सुरु करण्यात आले. स्पर्धेमुळे गावा गावांत स्वच्छतेसाठी चढाओढ लागली, ही एक चांगली बाब आहे. मात्र केवळ स्पर्धेपुरते गाव स्वच्छ ठेवू नका. गाव आणि मन स्वच्छ
आबासाहेब मुजुमदारांचे कार्य दीपस्तंभासारखे – प्रदीप रावत
पुणे : थोर इतिहास संशोधक व कला, साहित्य संगीत क्षेत्रात मोलाचे कार्य करणारे सरदार कै. गंगाधर नारायण उर्फ आबासाहेब मुजुमदार स्मृती पुरस्कार वितरण सोहळा भारत इतिहास संशोधक मंडळात २० सप्टेंबर २०२४ रोजी पार पडला. ज्येष्ठ विचारवंत व माजी खासदार प्रदीपदादा रावत यांच्या हस्ते इतिहास संशोधक महेश तेंडुलकर यांना आबासाहेब मुजुमदारांच्या नावाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
सेवा वस्तीतील ३१ जोडप्यांनी केली गणपतीची सपत्नीक आरती
पुणे, दि. १९ सप्टेंबर : गणेशोत्सवानिमित्त पुणे महानगरातील सर्व भागातील सेवा वस्तीतील ३१ नागरिकांनी सपत्नीक समरसता आरती केली. महानगर समरसता गतिविधीच्या माध्यमातून या आरतीचे आयोजन करण्यात आले होते. कसबा, मंडई, केसरीवाडा, दगडूशेठ हलवाई, गुरुजी तालीम या मंडळांमध्ये ‘आरती समरसतेची’ या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. तसेच कुमठेकर रोड वरील ऐतिहासिक वारसा असलेल्या विंचूरकर वाड्यातील गणपती
संविधान अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त सातारा शहरात सामाजिक संवाद मेळावा संपन्न
सातारा, दि. १५ सप्टेंबर : भारतीय संविधानाच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्ताने विवेक विचार मंच आणि सहयोगी संघटनांच्या वतीने समाजातील वंचित घटकांमध्ये कार्य करणाऱ्या सामाजिक नेतृत्व व संस्था संघटनांच्या प्रतिनिधींचा “‘सामाजिक संवाद मेळावा” सातारा मध्ये संपन्न झाला. या मेळाव्यातून अनुसूचित जाती आणि वंचित घटकांचे प्रश्न, सद्यस्थिती, भारतीय संविधान, आरक्षण, सामाजिक न्याय तसेच अन्याय अत्याचारच्या विविध घटना, घडामोडी, शासकीय
धर्म हीच आपल्या राष्ट्राची जीवनशक्ती – सरसंघचालक डॉ. मोहन भागवत
तंजावरचे मराठे पुस्तकाचे प्रकाशन पुणे, दि. ९ सप्टेंबर : महाराष्ट्रातील मराठे तमिळनाडूत परके ठरले नाही. कारण स्थानिक समाजजीवनाला त्यांनी समृद्ध केले. आपल्यातील हा एकतेचा धागा धर्मातून येतो. सत्यातून येणारा हाच हिंदू धर्म भारतीय राष्ट्राची प्रेरणा आहे,तीच आपली जीवनशक्ती आहे असे मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी व्यक्त केले. कोथरूड येथील बालशिक्षण मंदिरात
समर्पित संघ स्वयंसेवकांमुळे पूर्वांचलातील स्थिती सुधारत आहे : सरसंघचालक डॉ. मोहन भागवत
भय्याजी काणे जन्मशताब्दी कार्यक्रम पुणे : मणिपूरमधील कठीण परिस्थितीतही संघाचे स्वयंसेवक सर्व बाजूंनी कणखरपणे उभे आहेत. संताप, क्रोध, द्वेष विसरुन नागरिकांतील संघर्ष थांबावा म्हणून सर्व घटकांशी संवाद साधत आहेत. गेली ४० ते ५० वर्षे समर्पित वृत्तीने कार्य करणारे संघ स्वयंसेवक आणि इतर संघटनांमुळेच पूर्वांचलाची आजची स्थिती सुधारत आहे, असा विश्वास राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ.
खंडोबा हे देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढणाऱ्यांचे दैवत : सरसंघचालक डॉ. मोहन भागवत
जेजुरी देवस्थानाकडून मानपत्र प्रदान पुणे : देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढणाऱ्यांचे दैवत म्हणजे खंडोबा. जेजूरी गडावर आल्यामुळे आज खऱ्या अर्थाने माझे देवदर्शन झाले आहे. समाज जागृतीचे हे श्रद्धा केंद्र असून, धर्म याच श्रद्धेमुळे टिकला आहे, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी व्यक्त केले. सरसंघचालकांनी गुरूवारी (ता.५) जेजूरी येथील श्री मार्तंड देव संस्थानाला