राष्ट्रीय
भारताला सर्वसमावेशक आणि विकसित राष्ट्र बनवणे हे तुमचे सामूहिक ध्येय आहे: राष्ट्रपती मुर्मू
भारतीय प्रशासकीय सेवेतील 2021 च्या तुकडीतील अधिकाऱ्यांनी राष्ट्रपतींची घेतली भेट भारतीय प्रशासकीय सेवेच्या 2021 च्या तुकडीतील 182 अधिकार्यांच्या गटाने, आज (25 सप्टेंबर, 2023) राष्ट्रपती भवनातील सांस्कृतिक केंद्रात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेतली. हे सर्व अधिकारी सध्या विविध केंद्रीय मंत्रालये आणि विभागांमध्ये सहाय्यक सचिव म्हणून कार्यरत आहेत. या अधिकार्यांना संबोधित करताना राष्ट्रपती म्हणाल्या की, या
मुख्य पर्यटन स्थळे म्हणून दीपगृहांबद्दल वाढता उत्साह पाहून आनंद – पंतप्रधान
गोव्यातील अगुआडा किल्ल्यावर भारतीय दीपगृह महोत्सवाच्या उद्घाटनाबद्दल पंतप्रधानांनी केला आनंद व्यक्त प्रमुख पर्यटन स्थळे म्हणून दीपगृहांबद्दल वाढता उत्साह पाहून मला आनंद होत आहे असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. आपल्या X वरील मनोगताच्या मालिकेत, केंद्रीय बंदरे, जहाजबांधणी आणि जलमार्ग मंत्री, सर्बानंद सोनोवाल यांनी सांगितले की, त्यांनी गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आणि केंद्रीय राज्यमंत्री श्रीपाद .
दीनदयाळजींचे व्यक्तिमत्व आणि कर्तृत्व देशवासीयांसाठी नेहमीच प्रेरणास्त्रोत – नरेंद्र मोदी
पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या जयंतीनिमित्त पंतप्रधानांनी आदरांजली वाहिली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंडित दीनदयाळ उपाध्याय यांना त्यांच्या जयंतीनिमित्त आदरांजली वाहिली आहे. भारत मातेच्या सेवेमध्ये आयुष्यभर समर्पित राहिलेले अंत्योदयाचे प्रणेते पंडित दीनदयाळ उपाध्याय यांचे व्यक्तिमत्व आणि कर्तृत्व देशवासीयांसाठी नेहमीच प्रेरणास्त्रोत राहील, असे पंतप्रधान मोदी म्हणाले. पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्याबद्दलही पंतप्रधानांनी आपले विचार मांडले. एका X पोस्टमध्ये
सहकार चळवळीचे भविष्य उज्ज्वल : केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शाह
मुंबई, दि. २३: सहकार चळवळीने कालानुरुप स्वत:ला बदलणे आवश्यक आहे. देशात रोजगारनिर्मिती सोबतच आर्थिक विकास वाढविण्याची ताकद सहकार क्षेत्रात आहे. केंद्र सरकारही सहकार विद्यापीठाची स्थापना करुन त्या माध्यमातून बॅंक, दुग्धव्यवसाय, कृषी, विपणन क्षेत्रासाठी प्रशिक्षित मनुष्यबळ निर्माण करणार आहे. ग्रामीण भागातील विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थांचे बळकटीकरण करण्याचा निर्णय केंद्र शासनाने घेतला आहे. त्यामुळे सहकार चळवळ
देशांतर्गत विमान सेवेच्या प्रवासी संख्येत लक्षणीय वाढ
वर्ष २०२३ च्या पहिल्या आठ महिन्यांत देशांतर्गत विमान वाहतूक उद्योगाने प्रवासी वाहतुकीत लक्षणीय वाढ अनुभवली आहे. ताज्या उपलब्ध माहितीनुसार, जानेवारी ते ऑगस्ट २०२३ या कालावधीत देशांतर्गत विमान कंपन्यांकडून प्रवासी वाहतूक करणाऱ्यांची संख्या ११९०.६२ लाखांपर्यंत पोहोचली आहे, ज्यामुळे गेल्या वर्षीच्या याच कालावधीच्या तुलनेत प्रवासी संख्येत ३८.२७% ची लक्षणीय वाढ झाली आहे. केवळ एका ऑगस्ट २०२३ महिन्यात
ऐतिहासिक ‘नारी शक्ती वंदन अधिनियम’ लोकसभेत मंजूर
अनेक दशके प्रलंबित असलेले विधेयक ४५४ विरुद्ध २ मतांनी पारित गेल्या अनेक दशकांपासून प्रलंबित असलेले महिला आरक्षण विधेयक आज लोकसभेत बहुमताने मंजूर झाले. लोकसभा आणि राज्यांच्या विधानसभांमध्ये महिलांना एक तृतीयांश आरक्षणाची तरतूद या विधेयकात आहे. काल नवीन संसद भवनाच्या उद्घाटनानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याबाबत आपल्या भाषणातून सूचित केल्यानंतर केंद्रीय विधी व न्यायमंत्री अर्जुनराम मेघवाल
आपल्या लोकशाहीचे यश हे “आम्ही भारताचे लोक” चा सामूहिक, एकत्रित प्रयत्न आहे – उपराष्ट्रपती
खुली आणि मोकळी चर्चा हे फुलणाऱ्या लोकशाहीचे वैशिष्ट्य – उपराष्ट्रपती रणनीती म्हणून व्यत्यय आणि अडथळ्यांचा शस्त्रास्त्र म्हणून वापर करण्याचे जनता कधीच समर्थन करणार नाही – उपराष्ट्रपती संविधान सभेत तीन वर्षे चाललेल्या चर्चेने सभ्यता आणि खुल्या चर्चेचे उदाहरण घालून दिले – उपराष्ट्रपती उपराष्ट्रपती आणि राज्यसभेचे सभापती जगदीप धनखड यांनी आज 75 वर्षांच्या संसदीय प्रवासाचे महत्त्व सांगितले
“जगाला डाव्यांच्या संकटापासून मुक्त करण्याचे भारतावर दायित्व”: डॉ. मोहन जी भागवत
अभिजित जोग यांच्या पुस्तकाचे प्रकाशन सांस्कृतिक मार्क्सवादाच्या नावाखाली डाव्या विचारसरणीच्या लोकांनी जगभर विध्वंस सुरू केला असून, डाव्यांच्या या संकटापासून जगाला मुक्त करण्याचे दायित्व भारतावरच आहे, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी आज येथे केले. लेखक अभिजित जोग यांच्या ‘जगाला पोखरणारी डावी वाळवी’ या पुस्तकाचे प्रकाशन डॉ. भागवत यांच्या हस्ते सिम्बॉयोसिस विश्वभवन
“समाजाच्या सर्व क्षेत्रांत महिलांचा सहभाग वाढवण्यासाठी संघप्रेरित संस्था काम करणार” – डॉ. मनमोहनजी वैद्य
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अखिल भारतीय समन्वय बैठक समारोपप्रसंगी सहसरकार्यवाहांनी दिली माहिती समाज परिवर्तनामध्ये महिलांची भूमिका महत्त्वाची आहे, त्यामुळे समाजाच्या सर्व क्षेत्रांत महिलांचा सहभाग वाढवण्यासाठी संघप्रेरित संस्था काम करणार आहेत. संघाच्या अखिल भारतीय समन्वय बैठकीमध्ये याबाबत चर्चा झाली, अशी माहिती राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सहसरकार्यवाह डॉ. मनमोहन वैद्य यांनी शनिवारी दिली. संघाच्या तीन दिवसीय समन्वय बैठकीचा समारोप
काँग्रेसप्रणित ‘इंडी’ आघाडीकडून पुन्हा एकदा माध्यमांची गळचेपी, ‘प्रश्न विचारणाऱ्या’ पत्रकार-संपादकांवर बहिष्कार
माध्यम स्वातंत्र्य, अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाने नेहमी गळे काढणाऱ्या… मोदी-शाहांना हिटलर, हुकुमशाह म्हणणाऱ्या… उजव्या विचारसरणीच्या लोकांना प्रश्न नको असतात असा आरोप करणाऱ्या… सर्व डाव्या, तथाकथित पुरोगामी पक्ष आज पत्रकार-संपादकांची यादी जाहीर करून त्यांच्यावर बहिष्कार टाकत असल्याची घोषणा केली आहे. इंडी आघाडीची बैठक काल राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या दिल्ली येथील निवासस्थानी झाली. त्यानंतर सर्व पक्षांद्वारे