हर्षवर्धन सपकाळ यांच्याविरोधात पुण्यात गुन्हा दाखल

पुणे, दि. १५ फेब्रुवारी : हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची हिंदूविरोधी टिपू सुलतान याच्याशी तुलना करून समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याबद्दल तसेच चिथावणीखोर वक्तव्य केल्याप्रकरणी दत्तवाडी पोलिस स्थानकामध्ये काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पुणे शहर भाजप अध्यक्ष नगरसेवक धीरज घाटे यांनी यासंदर्भात तक्रार दाखल केली आहे.

पुणे शहर भाजपकडून सपकाळ यांच्या वक्तव्याचा तीव्र निषेध करण्यात आलेला आहे. पर्वती पोलीस स्थानकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र सहाणे यांच्याकडे आज हा गुन्हा नोंदवण्यात आला. यावेळी युवा मोर्चा शहर अध्यक्ष दृष्यत मोहोळ, नगरसेविका स्मिता वस्ते, नगरसेवक राघवेंद्र बापू मानकर, महेश वाबळे, अमर आवळे, नगरसेविका सई थोपटे, माजी सरचिटणीस गणेश घोष, विशाल पवार, योगेश जावीर उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *