सब गोविंद बनो!!!!!
निषेध आंदोलन
पुणे, दि. २२ ऑगस्ट : कोलकाता, पश्चिम बंगाल येथील आर जी कर वैद्यकीय महाविद्यालयात एमडी करत असलेल्या महिला डाॅक्टरांवर विकृत अत्याचार आणि निर्घृण खुनाच्या दुर्दैवी घटनेचा निषेध म्हणून पुणे शहरातील आरोग्य सेवा क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या विविध संघटनांतर्फे जिल्हाधिकारी कार्यालय येथे गुरुवार दि २२ आँगस्ट रोजी दुपारी १२.०० वाजता निषेध आंदोलन करण्यात आले.
या वेळेस आरोग्य भारती पश्चिम पुणे संयोजक दिपक अष्टपुत्रे यांनी प्रथम प्रास्ताविक केले. यानंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे महानगर सेवा प्रमुख महेशराव मानेकर, वैद्यकीय सेवा व संशोधन प्रतिष्ठानचे श्री बद्री मूर्ती, सेवा आरोग्य फाऊंडेशनचे सतीश जोशी, आयुर्वेद व्यासपीठच्या डाॅ उल्का फडके, महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठचे (एमयुएचएस) सिनेट स्टॅडींग कमिटी सदस्य आणि आरोग्य भारती पश्चिम महाराष्ट्र प्रांत सचिव वैद्य संतोष गटणे, एडव्होकेट वर्षाताई डहाळे यांची संबंधित विषयावर भाषणे झाली.
या निषेध आंदोलनासाठी आरोग्य भारतीच्या पुढाकाराने, जिज्ञासा, एन एम ओ, निरामय, वैद्यकीय सेवा व संशोधन प्रतिष्ठान, सेवा आरोग्य फाऊंडेशन, आयुर्वेद व्यासपीठ, सेवांकुर, जनकल्याण समिती, जनकल्याण रक्तपेढी, सुदर्शन हाॅस्पिटल व कॅन्सर रिसर्च फाऊंडेशन, नाना पालकर स्मृती समिती, डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे ब्रिजलाल जिंदाल काॅलेज आँफ फिजिओथेरपी, सुभद्रा के जिंदाल काॅलेज आँफ नर्सिंग, श्रीमती काशीबाई नवले डेंटल काॅलेज, अष्टांग आयुर्वेद अशा आरोग्य सेवा क्षेत्रातील अनेक संस्था, संघटना, वैद्यकीय महाविद्यालये अशांचे प्रतिनिधी, पदाधिकारी, वैद्यकीय शिक्षण घेणारे विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते.
तसेच विनायकराव डंबीर, डाॅ. गिरिष कामत, डाॅ. नायर, नरेश करपे, राजन गोरे, चंदन कटारिया, डाॅ. आशुतोष काळे, अष्टांग आयुर्वेद काॅलेजचे वैद्य मनोज चौधरी, डाॅ. चिरायु जैन, सोमनाथ कांबळे, जिंदाल काॅलेज आँफ फिजिओथेरपीच्या असिस्टंट प्रोफेसर डाॅ. अश्विनी कांबळे, आदी मान्यवर उपस्थित होते.
‘अब गोविंद न आएँगे ‘ असा विचार न करता स्वसंरक्षणासाठी ‘सब गोविंद बने ‘ असा निर्धार या वेळी सर्वांच्या वतीने करण्यात आला. त्यानंतर विविध संस्थांच्या आणि वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रतिनिधींनी उपजिल्हाधिकारी मा. ज्योती कदम यांना निवेदन दिले.