छत्रपतीं शिवरायांमुळे देशात राष्ट्रप्रेमाचे स्फुल्लिंग : सरकार्यवाह दत्तात्रय होसबाळे

छत्रपती शिवाजी महाराजांवरील आठ पुस्तकांचे दिल्लीत प्रकाशन

नवी दिल्ली : ‘छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेताच मनात राष्ट्रप्रेमाचे स्फुल्लिंग जागृत होते. गुलामगिरी कशी झुगारून द्यावी याचा आदर्श शिवाजी महाराज होते. त्यांचे जीवन केवळ भारतीयांसाठी नव्हे तर परदेशातीलही गुलामगिरीविरूद्धच्या लढ्यासाठी प्रेरणादायी ठरले आहे’, असे मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकार्यवाह दत्तात्रय होसबाळे यांनी व्यक्त केले.

नवी दिल्ली येथे छत्रपती शिवाजी महाराजांवरील विविध आठ पुस्तकांच्या प्रकाशन कार्यक्रमात ते बोलत होते. माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि सरकार्यवाह होसबाळे यांच्या हस्ते केदार फाळके लिखित ‘छत्रपती शिवाजी महाराज’, गजानन मेहंदळे लिखित ‘छत्रपती शिवाजी महाराज न होते तो’, आणि पांडुरंग बलकवडे, सुधीर थोरात, मोहन शेटे लिखित ‘स्वराज्य संरक्षण का संघर्ष’ व ‘अठरहवी सताब्दी का हिंदवी साम्राज्य’ या पुस्तकांचे प्रकाशन करण्यात आले. हिंदी अनुवादीत या मुळ मराठी पुस्तकांचे प्रकाशन श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळ आणि श्री भारती प्रकाशनतर्फे करण्यात आले आहे.

चिरंजीवी विचार :
“छत्रपती शिवाजी महाराजांचा जेव्हा उल्लेख होतो, तेंव्हा प्रत्येक भारतीयांत राष्ट्रप्रेमाचे स्फुल्लिंग जागृत होते. छत्रपती शिवाजी महाराज संपूर्ण राष्ट्राची प्रेरणा आहेत. आपल्या जीवनकाळात अनेक उदात्त विचार त्यांनी राष्ट्राला दिले. शिवाजी महाराज केवळ मराठ्यांचा गौरव नाही, तर संपूर्ण राष्ट्राचा गौरव आहेत. देशासाठी जगावे, देशासाठी मरावे, असा चिरंजीवी विचार त्यांनी दिला,” अशी भावना होसबाळे यांनी व्यक्त केली.

भारताचे भाग्यविधाता :
छत्रपती शिवाजी महाराज हे भारताचे भाग्यविधाता होते, अशी भावना माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी व्यक्त केली. ते म्हणाले, “छत्रपती शिवाजी महाराज भारतातील सर्वोत्कृष्ट राजे होते. पारतंत्र्य आणि आक्रमणांच्या कालखंडात त्यांनी स्वराज्य निर्माण केले. त्यामुळेच भारतीय संस्कृती सुरक्षित राहिली. शिवचरित्र शक्य तेवढे आत्मसात करणे आणि त्याचा प्रसार करणे आपले कर्तव्य आहे.” असेही ते म्हणाले.

प्रकाशित एकूण आठ पुस्तके :
1. छत्रपति महाराज
2. स्वराज संरक्षण का संघर्ष
3. अठारहवीं शताब्दी का हिंदवी साम्राज्य
4. छत्रपति शिवाजी न होते तो…
English books :
1. Chhatrapati Shivaji
2. The Fight For Defending The Swaraj
3. Maratha Empire (Hindavi Samrajya) During the Eighteenth Century
4. Chhatrapati Shivaji : Savior of Hindu India

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *