मुंबई, दि. ४ जुलै : यंदाचे वर्ष हे मिलेट वर्ष आहे. त्यामुळे विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशन दरम्यान आज विधान भवनातील कँटीनमध्ये खास ”मिलेट महोत्सव – २०२४”चे आयोजन करण्यात आले होते. विधिमंडळातील सर्व आमदारांसाठी मिलेट म्हणजे कडधान्य, भरडधान्य यापासून बनलेले जेवणही ठेवण्यात आले होते.
यावेळी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्व आमदार सहकाऱ्यांच्या साथीने या भोजनाचा आस्वाद घेतला. यावेळी मिलेटचे फायदे तसेच राज्य शासनाने प्रोत्साहन दिलेल्या बांबूपासून बनवण्यात आलेले टॉवेल, कि-होल्डर, कौले यांसह ठेवण्यात आलेल्या विविध उत्पादनांची माहिती मुख्यमंत्री व अन्य नेत्यांना देण्यात आली.
यावेळी कृषी मंत्री धनंजय मुंडे, मंत्री संजय राठोड, मंत्री दादाजी भुसे, राज्य कृषिमूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल, खासदार श्रीरंग बारणे, आमदार आशिष जयस्वाल, आमदार संतोष बांगर, आमदार गोपीचंद पडळकर तसेच विधिमंडळातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.