राज्यसभा पोटनिवडणूक : सुनेत्रा पवार यांची बिनविरोध निवड

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या बारामती लोकसभा उमेदवार राहिलेल्या सुनेत्रा पवार यांनी आज राज्यसभा उमेदवारीचा अर्ज भरला. पक्षाचे नेते प्रफुल पटेल यांच्या रिक्त झालेल्या जागेवर ही पोटनिवडणूक झाली. मात्र यावेळी सुनेत्रा पवार यांच्या व्यतिरिक्त अन्य कोणाचाही अर्ज न आल्यामुळे सुनेत्रा पवार बिनविरोध निवडून आल्या आहेत. आज हा अर्ज दाखल करत असताना प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, छगन भुजबळ यांच्यासह राष्ट्रवादी कांग्रेस पक्षाचे नेते व पदाधिकारी उपस्थित होते.

नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत सुनेत्रा पवार यांचा राष्ट्रवादी कांग्रेस शरदचंद्र पवार गटाच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी दीड लाखांच्या फरकाने परभव केला होता. सुनेत्रा पवार यांनी अर्ज भरल्यानंतर व बिनविरोध निवड झाल्यानंतर जनतेची व पक्षाच्या पदाधिकाऱ्यांचे आभार मानले आहेत. लोकसभा व राज्यसभा या दोन्ही उमेदवारी जनतेच्या आग्रहास्तव स्वीकारल्याचे त्या यावेळी म्हणाल्या.

दरम्यान या पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस होता. त्यासाठी गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार आणि ओबीसी नेते छगन भुजबळ यांची नावे चर्चेत होती. मात्र अखेर सुनेत्रा पवार यांना पक्षाने झुकते माप देत दिल्लीत संसदेत पाठवण्याचा निर्णय घेतला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *