भारताची अर्थव्यवस्था जगातील तिसऱ्या स्थानावर नेण्याचा संकल्प – पंतप्रधान
देशात ‘गरिबी हटाव’ च्या अनेकदा केवळ घोषणा देण्यात आल्या; पण गरिबी कधीच हटली नाही. ‘आर्धी भाकरी तरी खायला मिळेल’ असेही बोलले जायचे; पण का? आता मोदी आहे, तुम्हाला पूर्ण भाकरी मिळेल, गेल्या नऊ वर्षात देशातील २५ कोटी लोक गरिबीतून बाहेर आले आहेत. हे २५ कोटी लोक आता माझे साथीदार आहेत. तिसऱ्या टर्ममध्ये भारताची अर्थव्यवस्था जगातील तिसऱ्या स्थानावर नेण्याचा संकल्प पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला.
सोलापुरातील रे नगर येथील कामगारांच्या घरांच्या लोकार्पण सोहळ्यात ते बोलत होते. या कार्यक्रमास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, राज्यपाल रमेश बैस, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, गृहनिर्माण मंत्री अतुल सावे, पालकमंत्री चंद्रकांत पाटील, प्रकल्पाचे संकल्पक नरसय्या आडम व्यासपीठावर उपस्थित होते.
Key development initiatives are being launched from Solapur today, which will benefit the citizens. https://t.co/J82WbVNoYu
— Narendra Modi (@narendramodi) January 19, 2024
सोलापूर येथील कुंभारीच्या रे नगर येथे असंघटित कामगारांसाठी पहिल्या टप्प्यात पंधरा हजार घरे बांधण्यात आली आहेत. त्याचे लोकार्पण आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले. पाच कामगारांना मोदी यांच्या हस्ते चाव्यांचे वाटप करण्यात आले.सोलापूर अन् स्वत:चं नातं सांगताना मोदी म्हणाले, सोलापूर ही श्रमिकांची नगरी आहे. माझं कार्यक्षेत्र अहमदाबाद आहे. तीही श्रमिकांची नगरी आहे. यंत्रमाग कामगार तेथेही आहेत. पद्मशालीे कुटुंबं अहमदाबादमध्येही आहेत. मी अनेकदा त्यांच्याकडे जेवायचो. छोट्या घरात राहायचे; पण जेऊ घालायचे. कधी त्यांना स्वत:ला जेवण मिळाले नाही;पण मला रात्री उपाशी झोपू दिले नाही, असेही मोदी म्हणाले.
२२ जानेवारीला आपण नवीन घरात गेल्यानंतर रामज्योती प्रज्ज्वलित कराव्यात. रामलला आपल्या भव्य मंदिरात विराजमान होत असताना सोलापुरात एक लाख लोकांचा नवीन गृहप्रवेश होत आहे. २२ जानेवारीला आपण नवीन घरात गेल्यानंतर रामज्योती प्रज्ज्वलित कराव्यात, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे. मोदी यांच्या हस्ते शुक्रवारी कुंभारी येथील रे नगरात १५ हजार कामगारांना घरांचे वाटप झाले. यावेळी ते बोलत होते.