माध्यमांचे व राजकीय विश्लेषकांचे सर्व अंदाज उधळून लावत पुन्हा एकदा भाजपने नवीन चेहरा राज्याचे प्रमुखपद भूषविण्यासाठी दिला आहे. भाजप आमदार मोहन यादव मध्यप्रदेशचे नवे मुख्यमंत्री होणार असल्याची घोषणा नुकताच करण्यात आली आहे. त्याच बरोबर जगदीश देवडा व राजेश शुक्ला हे दोघे उपमुख्यमंत्रीपदासाठी निवडले गेले आहेत. तर केंद्रीय मंत्री व भाजप नेते नरेंद्र सिंह तोमर विधानसभा अध्यक्ष म्हणून कार्यभार पाहणार आहेत. भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने पुन्हा एकदा धक्कातंत्राचा वापर केला आहे. गेल्या वीसहून अधिक वर्षांच्या शिवराज सिंह चौहान यांच्या नेतृत्वात यंदा बदल करण्यात आला आहे. शिवराज सिंह चौहान यांना येत्या काळात अधिक मोठी जबाबदारी पक्ष सोपविण्याची शक्यता वर्तविली जात आहे.