महाराष्ट्र आणि गुजरातमधील समान धागा म्हणजे सहकार चळवळ होय. त्यामुळे लक्ष्मणराव इनामदार हे या दोन्ही राज्यातील संवादाचा सेतू होते. त्यांनी सहकार चळवळीला व्यापक स्वरूप प्राप्त करून दिले असे प्रतिपादन राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. मुंबई विद्यापीठ आणि सहकार भारती यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवारी विद्यापीठाच्या फोर्ट येथील कावसजी जहागीर दीक्षांत सभागृहात लक्ष्मणराव इनामदार यांच्या स्मृतीनिमित्त आयोजित व्याख्यानमालेत ते बोलत होते. यावेळी केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शाह , राज्यपाल रमेश बैस, विधानसभेचे अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील, मुंबई उपनगरचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा, विद्यापीठाचे कुलगुरु प्रा. रवींद्र कुलकर्णी, सहकार भारतीचे अध्यक्ष दीनानाथ ठाकूर, राष्ट्रीय महामंत्री उदय जोशी आदी उपस्थित होते.
#सहकार चळवळ हा महाराष्ट्र आणि गुजरात मधील महत्वाचा दुवा आहे. तळागाळापर्यंत चळवळ रुजविण्याचे काम इनामदार यांनी केले. त्यामुळेच त्यांच्या कामाने प्रभावित होऊन आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी जी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह जी हे दोघेही लक्ष्मणरावांना आपला मार्गदर्शक मानत होते.… pic.twitter.com/SZ8zP6UGDq
— Eknath Shinde – एकनाथ शिंदे (@mieknathshinde) September 23, 2023
सहकार क्षेत्रातील लक्ष्मणराव इनामदार यांचे कार्य अनुकरणीय आहे. त्यांच्या कार्याची आठवण म्हणून जिहे कठापूर पाणीपुरवठा योजनेला त्यांचे नाव देण्यात आले आहे. सहकार चळवळीचा सर्वसामान्य नागरिकांना लाभ होण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले, असे त्यांनी सांगितले.
सहकार चळवळीने कालानुरुप स्वत:ला बदलणे आवश्यक आहे. देशात रोजगारनिर्मिती सोबतच आर्थिक विकास वाढविण्याची ताकद सहकार क्षेत्रात आहे. केंद्र सरकारही सहकार विद्यापीठाची स्थापना करुन त्या माध्यमातून बॅंक, दुग्धव्यवसाय, कृषी, विपणन क्षेत्रासाठी प्रशिक्षित मनुष्यबळ निर्माण करणार आहे. ग्रामीण भागातील विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थांचे बळकटीकरण करण्याचा निर्णय केंद्र शासनाने घेतला आहे. त्यामुळे सहकार चळवळ ही कालबाह्य होणार नसून या चळवळीचे भविष्य उज्ज्वल आहे, असे प्रतिपादन केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शाह यांनी यावेळी केले.
#मुंबई विद्यापीठाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या लक्ष्मणराव इनामदार स्मृती व्याख्यानासाठी केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री मा.श्री. @AmitShah जी आज उपस्थित होते. यावेळी राज्यपाल रमेश बैस हेदेखील उपस्थित होते.
याप्रसंगी सहकार मंत्री @Dwalsepatil, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री… pic.twitter.com/7XGLGF2AUR
— Eknath Shinde – एकनाथ शिंदे (@mieknathshinde) September 23, 2023
कृषी आणि श्वेत क्रांती सहकाराच्या माध्यमातून शक्य झाली आहे. शेतकरी आणि सर्वसामान्यांच्या विकासाचा मार्ग सहकाराच्या माध्यमातूनच जातो. साखर कारखानदारी, दूध व्यवसायाबारोबरच वेगवेगळ्या क्षेत्रात सहकाराच्या माध्यमातून प्रगती होत आहे. सहकारातून राज्यात महाबळेश्वरजवळ उभ्या राहिलेल्या मधाच्या गावाची माहिती राज्यपाल बैस यांनी यावेळी दिली.