लक्ष्मणराव इनामदार सहकार क्षेत्राचे आधारस्तंभ आणि मार्गदर्शक होते. समाजात आमुलाग्र बदल घडविण्यासाठी आवश्यक बदल सहकार क्षेत्राच्या माध्यमातून घडू शकतील, असा त्यांचा विश्वास होता असे प्रतिपादन राज्यपाल रमेश बैस यांनी केले आहे. मुंबई विद्यापीठ आणि सहकार भारती यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवारी विद्यापीठाच्या फोर्ट येथील कावसजी जहागीर दीक्षांत सभागृहात लक्ष्मणराव इनामदार यांच्या स्मृतीनिमित्त आयोजित व्याख्यानमालेत ते बोलत होते. यावेळी केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शाह , मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, विधानसभेचे अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील, मुंबई उपनगरचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा, विद्यापीठाचे कुलगुरु प्रा. रवींद्र कुलकर्णी, सहकार भारतीचे अध्यक्ष दीनानाथ ठाकूर, राष्ट्रीय महामंत्री उदय जोशी आदी उपस्थित होते.
Governor Ramesh Bais, Chief Minister @mieknathshinde, Ministers @Dwalsepatil, @ChDadaPatil and @MPLodha, Speaker @rahulnarwekar, Vice-Chancellor Dr. Ravindra Kulkarni, National President of @Sahakar_Bharati Dinanath Thakur and Mahamantri Dr Uday Joshi were present. pic.twitter.com/aw1VVqL7rP
— Governor of Maharashtra (@maha_governor) September 23, 2023
कृषी आणि श्वेत क्रांती सहकाराच्या माध्यमातून शक्य झाली आहे. शेतकरी आणि सर्वसामान्यांच्या विकासाचा मार्ग सहकाराच्या माध्यमातूनच जातो. साखर कारखानदारी, दूध व्यवसायाबारोबरच वेगवेगळ्या क्षेत्रात सहकाराच्या माध्यमातून प्रगती होत आहे. सहकारातून राज्यात महाबळेश्वरजवळ उभ्या राहिलेल्या मधाच्या गावाचीही माहिती राज्यपाल बैस यांनी यावेळी दिली. भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात सहकार क्षेत्रातील बदल शेवटच्या घटकाच्या जीवनात मैलाचा दगड ठरेल, असेही त्यांनी सांगितले.
सहकार चळवळीने कालानुरुप स्वत:ला बदलणे आवश्यक आहे. देशात रोजगारनिर्मिती सोबतच आर्थिक विकास वाढविण्याची ताकद सहकार क्षेत्रात आहे. केंद्र सरकारही सहकार विद्यापीठाची स्थापना करुन त्या माध्यमातून बॅंक, दुग्धव्यवसाय, कृषी, विपणन क्षेत्रासाठी प्रशिक्षित मनुष्यबळ निर्माण करणार आहे. ग्रामीण भागातील विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थांचे बळकटीकरण करण्याचा निर्णय केंद्र शासनाने घेतला आहे. त्यामुळे सहकार चळवळ ही कालबाह्य होणार नसून या चळवळीचे भविष्य उज्ज्वल आहे, असे प्रतिपादन केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शाह यांनी यावेळी केले.